Appendicitis या समस्येमध्ये अॅपेन्डीक्स म्हणजेच आंत्रपुच्छाचा दाह होतो अथवा त्याला सूज येते.अॅपेन्डीक्स अथवा आंत्रपुच्छ म्हणजे मोठ्या आतड्याच्या टोकाकडील नळीसारखा एक भाग. हा भाग त्याच्या टोकाच्या दिशेने बंद असल्यामुळे जर त्या भागात अन्नपदार्थ अथवा शरीरातील टाकाऊ पदार्थ गेले ते तिथे अडकून राहतात त्यामुळे इनफेक्शन होते व आंत्रपुच्छाचा दाह होऊन त्याला सूज येते.
अपेंडिसायटिसचे निदान झाल्यावर उपचार कधी करण्यात येतात किंवा याबाबत इमरजन्सी कधी असू शकते?
अपेंडिसायटिस असल्यास तात्काळ उपचार करण्याची गरज असू शकते.उपचार करण्यास उशीर झाल्यास अॅपेन्डीक्स फुटते व इनफेक्शन परसल्यास भयंकर वेदना होतात.योग्य वेळी उपचार न मिळाल्यास आतड्याच्या आजूबाजूच्या अवयवांना देखील इनफेक्शन होते व त्यातून पू येतो.अशा वेळी ही समस्या प्राणघातक असू शकते.कधीकधी सूजलेल्या भागातून येत असल्यास तो भाग फुटू नये यासाठी आधीच त्याला प्रतिबंध करुन योग्य काळजी घेतल्यास होणारा त्रास कमी करता येऊ शकतो.
अपेंडिसायटिस वर काय उपाययोजना केल्या जातात?
अपेंडिसायटिस वर Appendectomy अथवा शस्त्रक्रिया करुन आंत्रपुच्छ काढून टाकणे हाच योग्य उपाय असू शकतो.या उपचारामध्ये अॅन्टीबायोटीक्स खुप महत्वाची भूमिका बजावतात.शस्त्रक्रियेआधी इनफेक्शन होऊ नये यासाठी काही अॅन्टीबायोटीक्स औषधे देण्यात येतात.अपेंडिसायटिस वर काय उपचार करावेत हे सर्वस्वी या समस्येच्या त्यावेळी असलेल्या स्थितीवर अवलंबून असते. Appendectomy नंतर पेनकीलर घेण्याचा सल्ला देण्यात येतो.
शस्त्रक्रिया-
अॅपेनडेक्टोमी ही अपेंडिसायटिसवर करण्यात येणारी एक उत्तम उपचार पद्धती आहे.कारण आंत्रपुच्छ फुटण्यापेक्षा ते वेळेवर काढून टाकणेच योग्य असते.जर या भागात पू झाला तर प्रथम तो काढून टाकण्यात येतो.यासाठी कधीकधी ४-८ आठवडे अॅपेनडेक्टोमी पुढे ढकलण्यात येते.
अॅपेनडेक्टोमी मध्ये ओपन सर्जरी अथवा लेप्रोस्कोपिक सर्जरी करण्यात येते.ओपन सर्जरीमध्ये पोटामध्ये ५ ते १० सेमीचा छेद करण्यात येतो.अॅपेन्डीक्स फुटल्यास अथवा सापडत नसल्यास ही ताबडतोब ओपन सर्जरी करण्यात येते.तर लेप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजेच दुर्बिणीच्या सहाय्याने अगदी छोटा छेद करुन ही शस्त्रक्रिया करण्यात येते.लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमुळे वेदना कमी होतात व रुग्ण लवकर बरा होतो.
अॅन्टीबायोटीक्स-
अपेंडिसायटिस ची लक्षणे आढल्यास शस्त्रक्रिये आधी तो फुटू नये व पू पसरु नये तसेच इतर समस्या टाळण्यासाठी रुग्णाला अॅन्टीबायोटीक्स देण्यात येतात.त्याचप्रमाणे त्वरीत शस्त्रक्रिया करता येणे शक्य नसल्यास अथवा शस्त्रक्रिया करण्यात धोका असल्यास औषधे देऊन तात्पुरते उपचार करण्यात येतात.किंवा समस्या गंभीर नसल्यास तोंडावाटे देखील औषधे देण्यात येऊन आराम मिळू शकतो.आंत्रपुच्छामध्ये पू झाल्यास प्रथम तो काढून टाकण्यात येतो अशावेळी शस्त्रक्रिया ४ ते ८ आठवड्यांनी पुढे ढकल्यात येते.त्याचप्रमाणे काही परिस्थिती त अॅन्टीबायोटीक्स घेतल्याने शस्त्रक्रिया टाळता देखील येऊ शकते.एका संशोधनानूसार अपेंडिसायटिसची गंभीर समस्या असलेल्या ९०० रुग्णांपैकी ७८ टक्के रुग्णांना अॅन्टीबायोटीक्स देऊन उपचार करण्यात आले एक वर्षांनंतर नियमित चेकअप केल्यानंतर यापैकी ६३ टक्के रुग्णांना या उपचारांनी कोणतीही गंभीर समस्या न होता बरे करण्यात यश आले असे आढळले आहे.
अपेंडिसायटिस वर काही इतर उपचार आहेत का?
काही संशोधनात लहान मुलांना अॅक्यूपंक्चर उपचारांनी या समस्येतील वेदना व दाह कमी झाल्याचे आढळले आहे.त्यामुळ अॅक्यूपंक्चर उपचारांनी देखील या समस्येवर उपचार करता येऊ शकतात.
अपेंडिसायटिस वरील उपचारांनंतर रुग्णांमध्ये वेदना झाल्यास त्यांनी काय करावे?
शस्त्रक्रियेनंतर काही काळ रुग्णांमध्ये वेदना होण्याची शक्यता असते पण काही दिवसांनी ही समस्या आपोआप कमी होते.यासाठी वेदनाशामक औषधांचा उपयोग होऊ शकतो.मात्र जर तीव्र तापासह वेदना वाढत असतील तसेच शस्त्रक्रिया केलेल्या भागात सूज येत असेल तर मात्र त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
References:
1. Bickell NA, Aufses AH Jr, Rojas M, Bodian C. How time affects the risk of rupture in appendicitis. J Am Coll Surg. 2006 Mar;202(3):401-6. Epub 2006 Jan 18. PubMed PMID: 16500243.
2. Salminen P, Paajanen H, Rautio T, Nordström P, Aarnio M, Rantanen T, Tuominen R, Hurme S, Virtanen J, Mecklin JP, Sand J, Jartti A, Rinta-Kiikka I, Grönroos JM. Antibiotic Therapy vs Appendectomy for Treatment of Uncomplicated Acute Appendicitis: The APPAC Randomized Clinical Trial. JAMA. 2015 Jun 16;313(23):2340-8. doi: 10.1001/jama.2015.6154. PubMed PMID: 26080338.
3. Antibiotic therapy for acute appendicitis in adults. Fewer immediate complications than with surgery, but more subsequent failures. Prescrire Int 2014 Jun;23(150):158-60. Review. PubMed PMID: 25121154.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock