जर तुम्हाला रात्रभर नीट झोप लागली नाही तर दुस-या दिवशी अस्वस्थ वाटते. कमी झोपेमुळे तुमचेे डोके जड होते व संपुर्ण दिवस कंटाळवाणा जातो. रात्री झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा.दुस-या दिवशी महत्वाची मिटींग असणे, क्रेडीट कार्डचे भरमसाठ बिल येणे, वैवाहिक जीवनातील समस्या, वेळेअभावी दुर्लक्षित झालेली कामे अशी झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. झोपमोड झाल्यास अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
यासाठी जाणून घ्या झोप न येण्याची ही काही कारणे-
पौडांगवस्था -
वयात येण्याच्या कालावधीमध्ये ४० टक्के लहान मुलांमध्ये झोपेच्या समस्या निर्माण होतात.संशोधकांना वयात येणा-या मुलींमध्ये मानसिक व शारीरिक बदलांसोबत निद्रानाश होण्याचे लक्षणही आढळून आले आहे.पौडांगवस्थेत मुलींमध्ये झोपेच्या समस्या या त्यांच्यामध्ये होणा-या हॉर्मोनल बदलामुळे निर्माण होतात.एका संशोधनानूसार निद्रानाशाची समस्या मुलींच्या मासिक पाळी सुरु होण्याच्या काळात म्हणजेच ११ ते १४ या वयात दिसून येते. तर एका संशोधनानूसार मासिक पाळीच्या काळात मुलींमध्ये हे प्रमाण २.७५ पट वाढलेले आढळले आहे.
मॅनोपॉज-
झोप न येण्याची समस्या स्त्री व पुरुष दोघांमध्येही आढळते. मात्र मॅनोपॉजच्या दरम्यान स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण मॅनोपॉजच्या काळात स्त्रीयांमधील अॅस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे झोपेची समस्या निर्माण होते. झोपेच्या समस्येसोबत काही महीलांचे यामुळे वजन देखील वाढते.
कर्करोग-
कर्करोगाच्या रुग्णांंमध्ये झोपेची समस्या दिसून येतात. कर्करोगावरील उपचारांची कमतरता,पुन्हा कर्करोग होण्याची भीती, मानसिक अस्वास्थ्य ,कर्करोगामुळे कार्यक्षमता कमी होणे, सुरक्षेच्या समस्या, औषधांचा गैरवापर व दुरुपयोग, नातेसंबधातील ताण, उपचारांसाठी होणारा खर्च यामुळे झोप कमी लागण्याची समस्या निर्माण होते. अनेक संशोधनात निरनिराळ्या कर्करोगाचे निदान होण्यापुर्वी ६ महिने व निदान झाल्यावर १८ महिने कमी झोप व थकवा ही लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात.
शहरी जीवनशैली-
कॉर्पोरेट जगातील ताणामुळे देखील तुम्हाला झोप कमी येण्याची समस्या होऊ शकते. दिवसभरातील कामाच्या ठिकाणी असणारा ताण, रात्री उशीरापर्यंत काम करणे, खुप वेळ टीव्ही पहाणे, सकाळी लवकर उठावे लागणे व पुन्हा रात्री एखाद्या पार्टीला जाणे, रात्रभर व्हॉट्सअपवर गप्पा मारणे यामुळे झोप कमी मिळते.
सफदारचंद हॉस्पिटलच्या श्वसन व झोप औषध विभागाचे हेड व प्रोफेसर डॉ.जे.सी.सुरी यांच्या मते आपली जीवनशैली सुर्यप्रकाशाद्वारे नियंत्रित केली जाते. अशा प्रकारे काम केल्याने आपल्या जैविक घड्याळावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे रात्र झाल्यानंतर शरीराला झोपण्याचा संदेश मिळतो व त्यावेळी आपण झोपणे अपेक्षित असते. पण आजकाल असे घडताना दिसत नाही व लोकांमध्ये झोपेच्या समस्या निर्माण होतात.
गाल ब्लेडर सर्जरी-
गाल ब्लेडर सर्जरी मध्ये पित्ताचे खडे झाल्यास तुमचे गाल ब्लेडर अथवा पित्ताशय काढून टाकण्यात येते. पित्ताशय जड अन्नाच्या पचनासाठी अतिशय उपयुक्त असते.जेव्हा तुम्ही रात्री बराच वेळ उपाशी रहाता तेव्हा पित्ताशय पित्त साठवून ठेवते.पण पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेमुळे हा ताण लहान आतड्यावर येतो.त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर ब-याचदा झोपेच्या समस्या निर्माण होतात.
टीथ ग्राईंडींग-
दात कराकरा वाजवण्याच्या समस्येमुळे रात्री तुमची झोपमोड होऊ शकते. ही समस्या ब-याचदा ताण-तणावामुळे होऊ शकते. या समस्येत दातांवर पडणारा दाब इतका असतो की कधीकधी यामुळे दात तुटू देखील शकतात. यामुळे मज्जासंस्थेवर व तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सवर परिणाम होऊन झोपेची समस्या निर्माण होते.
विटामिन्स-
आपण निरोगी रहाण्यासाठी अनेक विटामिन्स घेतो पण आश्चर्याची बाब म्हणजे या विटामिन्स मुळे तुम्हाला झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. स्लीप मेडीसिन या जर्नल मध्ये छापून आलेल्या एका संशोधनानूसार एक किंवा अधिक विटामिन घेतल्याने तुम्हाला झोपेची समस्या, झोपमोड होणे अथवा निद्रानाश होऊ शकतो. झोप येणे अथवा जाग येणे यावर आपल्या मज्जासंस्थेचे नियंत्रण असते.पण विटामिन घेतल्याने हे संतुलन बिघडते व झोपमोड होते.
तुमच्या झोपमोडीचे कारण वर दिलेल्या कारणांपैकी एखादे असेल तर तुमच्या डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या.
झोपेच्या समस्येबाबत काही समज-गैरसमज
Attention Deficit Hyperactivity Disorder मुळे झोपेची समस्या होते-
एडीएचडी अवस्थे सारख्या समस्या-
- थकवा, दिवसा झोप येणे व रात्री झोप कमी येणे
- कंडक्ट डिसॉर्डर
- डिप्रेशन,बायपोलर डिसॉर्डर
काही संशोधनानूसार झोपेची समस्या ही स्वतंत्र समस्या असून तिचा एडीएचडी समस्येशी काहीही सबंध नाही. लहान मुलांमधील चिडचिड, विस्मरण,एकाग्रतेचा अभाव या लक्षणांमुळे या दोन्ही समस्यामध्ये निदान करताना गोंधळ होत असावा.
मद्यपानामुळे झोप लागण्यास मदत होते-
मद्यपानामुळे झोप लागण्यास मदत होते हा एक गैरसमसज आहे.मद्य घेतल्यानंतर थोडावेळ झोप येेते मात्र झोपमोड झाल्यास पुन्हा झोप येत नाही. झोपच्या दुस-या प्रहरातील झोप पुर्ण न झाल्यास दुस-या दिवशी ताजे वाटत नाही.
संशोधनानूसार मद्यामधील उत्तेजीत प्रभावामुळे ही झोप लागते. तसेच हे तुम्ही घतलेल्या मद्याच्या प्रमाणावर व झोपेआधी कितीवेळ तुम्ही मद्य घेतले आहे यावर अवलंबून आहे.
कधीकधी काही आरोग्य समस्येमुळे अथवा त्यावरील उपचारांच्या दुष्परिणांमामुळे देखील झोपेची समस्या निर्माण होते.
- हार्टबर्न-यासाठी जड पदार्थ खाणे टाळा. ह्रदयात जळजळ होत असल्यास शरीराचा वरच्या भागाखाली उशी घ्या. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
- मधूमेह-रात्री अंगाला घाम येणे, वारंवार लघवीला होणे, पाय दुखणे, रक्तात साखरेचे प्रमाण कमी असणे या मधूमेहातील समस्येमुळे रात्री कमी झोप लागते.
- Obstructive sleep apnea या समस्येमध्ये टॉन्सिल्सची वाढ अथवा घशातील मांसल भागात वाढ झाल्याने श्वसनसमस्या निर्माण होतात.यामध्ये घोरणे, थकवा, कमी झोप, लक्ष देणे अथवा एकाग्र करणे यामध्ये समस्या होणे ही लक्षणे आढळतात.
- Nocturia अथवा लघवीची समस्या- या विकारात लघवीसाठी वारंवार उठावे लागते. वयस्कर लोकांमध्ये हार्टफेल, मधूमेह, मूत्रमार्गातील इनफेक्शन, यकृताच्या समस्या,यामध्ये घेण्या-या औषधांमुळे त्या रुग्णांना, तसेच ड्रग्ज घेणारे लोक अशा लोकांना ही समस्या अधिक जाणवते.
- कार्डिओ व्हॅस्क्यूलर डिसिस, आर्थ्राटीस, किडनी विकार, मनोविकार, श्वसनाच्या समस्या, थायरॉईड या आरोग्य समस्या असलेलेल रुग्णांना झोप कमी लागते. काही ओव्हर-दी-काउंटर औषधे व उपचारांनी ही समस्या दूर करता येते.
Read this in English
Translated By –Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock