PCOS ही भारतीय स्त्रियांमधील वाढती समस्या आहे. याचा परिणाम स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे उद्भवणाऱ्या नानाविध समस्यांना सामोरे जाताना तुमची सेक्स लाईफ धोक्यात येते. Polycystic Ovarian Syndrome (PCOS) मुळे हार्मोनल इम्बॅलन्स चा त्रास होतो ज्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो. त्याचबरोबर सेक्स लाईफवर ही याचा परिमाण होतो. फोर्टीज हेल्थकेअर हॉस्पिटल दिल्ली च्या स्त्री रोग तज्ञ डॉ. शालिनी गुप्ता यांनी यावर अधिक मार्गदर्शन केलं. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा: PCOS च्या या ’7′ लक्षणांकडे दुर्लक्ष मूळीच करू नका !
- बाळासाठी प्रयत्न करताय: जर तुम्ही बाळासाठी प्रयन्त करताय तर सेक्स हा त्याचा अभिवाज्य भाग आहे. जेव्हा ओव्हरीमधून अंड्याची निर्मिती होते तेव्हा ठेवलेल्या संबंधाचे फलित होते. परंतु PCOS मुळे असंतुलित झालेल्या हार्मोन्समुळे अंड्यांची निर्मिती नियमित होत नाही. आणि याचा परिणाम आनंदाऐवजी नैराश्यात होतो.
- अनावश्यक केसांची वाढ: शरीरात testosterone ची निर्मिती झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर, गळ्यावर, पाठीवर अनावश्यक केसांची वाढ होते. त्याचबरोबर पिंपल्स येणे, वजन वाढणे हे PCOSचे दुष्परिणाम आहेत. या सगळ्यामुळे तुम्हाला बुजल्यासारखं वाटतं. तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावता आणि साहजिकच याचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफ वर होतो. अनावश्यक केस काढण्यासाठी घरगुती उपचार: घरगुती उपचारांनी मिळवा, चेहर्यावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती!
- सेक्स करण्याची इच्छा कमी होणे: यामुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा आणि एक्ससाईटमेन्ट कमी होते. Iranian Journal of Reproductive Medicine च्या अहवालानुसार मुळे साधारण ६०% स्त्रियांमध्ये sexual dysfunction दिसून येते.
- अनियमित मासिकपाळी: PCOS चा परिणाम तुमच्या मासिक पाळीवर होतो. मासिक पाळीचे चक्र पूर्णपणे बिघडते. त्यामुळे अचानक येणारे पिरियड त्रासदायक होऊ शकतात. शक्यतो पाळीच्या काळात सेक्स करणे टाळा. त्याचा त्रास होईल. जरूर वाचा: दर महिन्याला मासिकपाळी लवकर येण्यामागील कारण काय ?
- नैराश्य आणि चिंता: PCOS मुळे तुम्हाला नैराश्य येते आणि तुमची चिंता करण्याची प्रवृत्ती वाढते. तुम्ही सतत चिंतेने, नैराश्याने ग्रस्त राहता. आणि त्याचा परिणाम निश्चितच तुमच्या सेक्स लाईफ वर होतो. त्यामुळे तुच्यात अशी काही लक्षणे आढळली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. PCOS आणि PCODच्या समस्येवर नैसर्गिक उपचार फायदेशीर ठरतात का ?
Reference:1. Eftekhar, T., Sohrabvand, F., Zabandan, N., Shariat, M., Haghollahi, F., & Ghahghaei-Nezamabadi, A. (2014). Sexual dysfunction in patients with polycystic ovary syndrome and its affected domains. Iranian Journal of Reproductive Medicine, 12(8), 539–546
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock