मी लहानपानपासूनच शाकाहारी आहे. अगदी ५ वर्षाचा असल्यापासूनच. आता माझे वय ५२ वर्षे आहे. फळे, भाज्या, डाळी, कडधान्य, सुकामेवा अशा घटकांचा माझ्या आहारात समावेश असतो. मी माझे जेवण स्वतःच बनवतो.माझ्या जेवणात कमी प्रमाणात साखर, मीठ आणि तेल असते. मी असा वाचाल आहे की पिष्टमय पदार्थांचं कमी सेवन केल्याने prostate cancer होण्याची संभावना कमी होते. या उलट जास्त फॅट्स असलेले किंवा high beta carotene content असलेले पदार्थ खाल्ल्याने prostate cancer होण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ असा होतो का की या सगळ्यासाठी पिष्टमय पदार्थ कारणीभूत आहेत? फक्त मांसाहारमध्येच अधिक प्रमाणात फॅट्स असतात.?
या प्रश्नावर Medical Oncology, Cytecare चे Senior Consultant डॉ.प्रसाद नारायणन यांनी हा खास सल्ला दिला आहे.
तुम्ही वाचलेलं अगदी योग्य आहे पिष्टमय पदार्थांचं कमी सेवन केल्याने प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. कारण त्यात इन्सुलिन चे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्याच्या कमी सेवनाने फायदाच होतो. कारण त्यात इन्सुलिन चे प्रमाण कमी असते. जर serum insulin कमी झालं तर प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता ही कमी होते. परंतु कोणत्या प्रकारचे कार्ब्स घेल्याने प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता कितपत असते, हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्सचे कमी प्रमाणात घेतले तर योग्यच ठरेल.
परंतु कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहारात नक्की घ्या. ते शरीरात ग्लुकोज निर्माण करते आणि प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता ही कमी होते.जितकं तुम्ही हाय फॅट्स फूड खाल तितके अधिक प्रमाणात स्याच्युरेटेड फॅट्स शरीरात जमा होऊ लागतील. मांसाहारी पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स (saturated fats) असल्याने त्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. दूध, दही यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन्स आणि कमी प्रमाणात फॅट्स असतात. त्यामुळे prostate cancer ची भीती ना बाळगता तुम्ही दही, दूध आहारात घेऊ शकता. high-carotene असलेले पदार्थ टाळावे कारण त्यात व्हिटॅमिन ए असल्याने ते घातक ठरू शकते. आपल्या शरीरात beta-carotene पदार्थांचे रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होते. पण हेच पदार्थ जर भाज्या आणि फळ्यांच्या स्वरूपात असेल तर मात्र ते हानिकारक ठरत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन ए युक्त भाज्या म्हणजे ब्रोकोली, गाजर, कांदा, पालक यांचा आहारात समावेश करू शकता. याचा त्रास तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्सच्या रूपात घेता. काही अहवालातून असे दिसून आले आहे की high beta-carotene पदार्थांचे सेवन सप्लिमेंट्स रूपात झाले किंवा beta-carotene पदार्थांची serum लेवल वाढली तर PCA ची भीती वाढते. त्यामुळे अशा प्रकारच्या सप्लिमेंट्स घेताना विचार करा.
Carotene and Retinol Efficacy Trial आणि the National Institutes of Health-American Association of Retired Persons (NIH-AARP) Diet and Health prospective cohort यांच्या अहवालावरून असे दिसून येते की, अतिरिक्त प्रमाणात केलेले मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट्सच्या सेवनामुळे PCA होण्याचा धोका वाढतो. विशेषतः β-carotene सप्लिमेंट्स घेणाऱ्यांना हा धोका अधिक असतो. अधिक माहितीसाठी नक्की वाचा: दूर करा प्रोस्टेट कॅन्सर बाबतचे हे 6 गैरसमज
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock