Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

नवीन वर्षात व्यायामात या १० चुका करणे टाळा!

$
0
0

व्यायामाला नव्याने सुरुवात करणाऱ्यांच्याच चुका होतात असे नाही तर आधीपासून व्यायाम करणारेही चुकतात. पण त्यामुळे होणारे नुकसान टाळायचे असल्यास त्या चुकांची सवय होण्याआधी त्या बदलायला हव्यात. या वर्षी या चुका टाळा आणि व्यायामाचे अधिक फायदे मिळवा.

 

  1. व्यायामाचा अतिरेक टाळा: तुम्हाला माहित आहे का की व्यायामाचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक असतो. त्यामुळे  cortisol किंवा stress hormone ची निर्मिती होते. त्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येते.  strength coach and fitness trainer अर्णव सरकार यांच्या सल्ल्यानुसार सिक्स पॅक अ‍ॅब्स आणि परफेक्ट बायसेप्स मिळवण्यासाठी केलेला अधिक व्यायाम चांगला असतो. झटपट परिणामासाठी अति व्यायाम करण्यापेक्षा व्यायाम योग्य वेळी करणे आणि त्यात सातत्य राखणे हे महत्त्वाचे आहे.
  2. teady state cardio करणे टाळा: हे एक्सरसाइज करणे टाळा कारण त्यामुळे फारसा फायदा होत नाही. तुम्हाला जर कॅलरीज बर्न करायच्या असतील तर high intensity interval training (HIIT) घ्या. Peter Davison, Physique Elite personal trainer आणि Advanced Nutritionalist यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार  steady state cardio पेक्षा HIIT मुळे ५०% अधिक फॅक्टस बर्न व्हायला मदत होईल.
  3. चुकीच्या वेळी व्यायाम करणे टाळा: व्यायाम योग्य वेळी करणे हे फार महत्त्वाचे असते. जर तुम्हाला एखाद्या दिवशी तुमच्या ठरलेल्या वेळी व्यायाम करण्याची सवड मिळाली नाही तर थोडा वेळ व्यायाम करा. पण चुकीच्या वेळी व्यायाम करू नका. सकाळची वेळ ही व्यायामासाठी अतिशय उत्तम असते.
  4. अयोग्य पदार्थ काणे टाळा: तुम्ही दररोज व्यायाम करता ही खर्च खूप चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकता. कारण बर्न केलेल्या कॅलरीज फ्राईड चिकन, फास्ट फूडने पुन्हा गेन होतील. त्यामुळे असे काही पदार्थ खाण्यापूर्वी विचार करा.
  5. फक्त मशीन्सवर अवलंबून राहू नका: जिम मध्ये गेल्यानंतर फक्त मशीनस वर व्यायाम करणे टाळा. कारण फ्री वेट्स आणि फ्लोअर एक्सरसाईझ मुळे स्नायूंना अधिक बळकटी येते. तसंच फॅट्स बर्निंगसाठी आणि स्ट्रेंथ वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जरूर वाचा: gym exercise करताना केलेल्या या ५ चुकांमुळे वाढतात केसांच्या व त्वचेच्या समस्या
  6. व्यायाम केल्यानंतर: व्यायाम केल्यानंतर प्रोटीन शेक्स किंवा पोस्ट वर्कआऊट ड्रिंक्स घेणे योग्य नाही. योग्य खाण्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंना बळकटी येते आणि शरीरातील ग्लुकोजची कमतरता भरून निघते. जर तुम्हाला फॅट्स बर्न करायचे असतील तर व्यायाम केल्यानंतर प्रोटीन शेक, चॉकलेट मिल्क जरूर घ्या. त्यामुळे कार्ब्स-प्रोटीन बॅलन्स राखला जाईल. अधिक माहितीसाठी वाचा: जीम प्रोटीन्स घेणं योग्य की अयोग्य ?
  7. दोन सेट्सच्या मध्ये छोटा ब्रेक घ्या: एक्ससरसाईझच्या दोन सेट्स मध्ये ब्रेक घेणे गरजेचे आहे. पण हा ब्रेक ६०-९० सेकंदांचाच असावा. त्याच्यापेक्षा मोठा ब्रेक घेतल्यास पुढचा सेट कमी प्रभावी होईल. ब्रेकमध्ये फ्रेंड्स सोबत गप्पा मारू नका. ब्रेकचा वेळ मोजण्यासाठी स्टॉपवॉचचा उपयोग करा. तुम्हाला दोन सेट्सच्या मध्ये किती वेळ ब्रेक हवाय ते जाणून घ्या. त्याचप्रमाणे काही आठवड्यांनंतर एक्ससरसाईझ रुटीन चेन्ज करा.
  8. काही आठवड्यांनंतर एक्ससरसाईझ रुटीन चेन्ज करा: जर तुम्ही काही आठवड्यांनंतर एक्ससरसाईझ रुटीन बदलत नसाल तर तोच तोच व्यायाम करून तुम्ही कंटालाळ. आणि त्या व्यायामाचा ही फार परिणाम तुमच्यावर होणार नाही. त्यामुळे काही आठवड्यांनंतर एक्ससरसाईझ रुटीन चेन्ज करा आणि सेट्स चे प्रमाण वाढवा. त्याचबरोबर त्याचा तुमच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांकडे ही लक्ष द्या.
  9. पोटाचे आणि कठीण व्यायामप्रकार शेवटी करू नका: कार्डिओ किंवा स्ट्रेन्थ ट्रेनिन्ग केल्यानंतर व्यायामाच्या शेवटच्या टप्प्यात शरीर थकते. त्यामुळे पोटाचे व्यायामप्रकार करू नका. कोणत्यातरी दोन व्यायामप्रकारांच्या मध्ये पोटाचे व्यायाम केल्याने जास्तीत जास्त फायदा मिळतो. नक्की वाचा: पोटाची चरबी कमी करण्यात, ‘ कडूलिंबाची फुले’ गुणकारी !
  10. जिम पार्टनरवर पूर्णपणे विसंबून राहू नका: जिम पार्टनर असण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. तुम्हाला व्यायामाची इच्छा नसताना तो/ती तुम्हाला व्यायाम करण्याची जबरदस्ती करू शकेल. आणि तुम्हाला इच्छा असताना तुमचा पार्टनर जागेवर नसेल. त्यामुळे स्वतःच स्वतःला प्रोत्साहन द्या आणि फिट राहणे हे उद्दिष्ट समोर ठेवा. जिमवरून आल्यानंतर या ५ चुका टाळाच !

 

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>