प्रत्येक नववधुला वाटते की तीने तिच्या लग्नात सर्वांत सुंदर दिसावं.यासाठी ती लग्नाअगोदर अनेक ब्युटी ट्रिटमेंट करुन घेते.काही खास सौदर्यप्रसाधनांची खरेदी करते.पण हे करण्याआधी तुम्हाला हे माहीत असायला हवे की कधाकधी या ट्रिटमेंट्समुळे होणारे साईड इफेक्टस तुमच्या सौदर्यावर विपरित परिणाम देखील करु शकतात.
Marvie Ann Beck Academy च्या ब्युटी एक्सपर्ट नंदीनी अग्रवाल यांच्या मते, ‘जर तुमचे लग्न ठरले असेल तर त्वचेची काळजी घेण्यासाठी या पाच चुका तुम्ही कटाक्षाने टाळायला हव्या.’
१.नवीन फेशीयल किंवा केमिकल पील ट्राय करणे-
चेह-यावर हवा तसा ग्लो व तेज येण्यासाठी नेहमी नववधु चेह-यावर केमिकल पील किंवा खास फेशियल ट्रिटमेंट करुन घ्यायला तयार होतात.पण जर तुम्ही यापुर्वी कधीही अश्या ट्रिटमेंट केल्या नसतील व ऐन लग्न जवळ आले असताना तुम्ही त्या केल्या आणि त्या ट्रिटमेंट तुम्हाला सुट झाल्या नाहीत तर तुम्हाला वाईट परिणांमांना सामोरे जावे लागु शकते.त्यापेक्षा अशावेळी तुम्ही नियमित करीत असलेले फेशियल किंवा ब्युटी ट्रिटमेंटच करा. जाणून घ्या थंडीच्या दिवसात नववधूंचे सौंदर्य खुलवण्यास मदत करतील शहेनाज हुसेन यांच्या या ६ टीप्स
२.चेहरा सारखा चोळणे-
चेहरा सतत रगडल्यामुळे चेह-यावरील डेड स्कीन निघुन जातात हा एक गैरसमज आहे.काही जणींना तर चेहरा जोरात घासण्याची देखील सवय असते.यामुळे तुमच्या चेह-यामधील नैसर्गिक तेल निघुन जाते व चेहरा निस्तेज व कोरडा होतो.त्यामुळे मुरुम व पुरळ येण्याची देखील शक्यता वाढते.त्यामुळे चेहरा सतत चोळु नका.चेहरा धुताना चेह-यावर हलक्या हाताने मसाज करा.स्क्रबचा वापर आठवड्यातून दोन पेक्षा अधिक वेळा करु नका. नक्की वाचा झटपट टीप्स – कसा कराल घरच्या घरी चेहरा स्वच्छ ?
३.मॉश्चराईजरचा कमी वापर करणे-
नेहमी चेहरा मॉश्चराईज करणे गरजेचे आहे.जर तुम्हाला लग्नात सतेज दिसायचे असेल तर तुमचा चेहरा सतत मॉश्चराईज करा.मात्र यासाठी वॉटरबेस मॉश्चराईजरचाच वापर करा.जर तुम्ही ते करीत नसाल तर लगेच तसे करण्यास सुरुवात करा.चांगल्या परिणामांसाठी दिवसातुन कमीतकमी दोन वेळा तुमचा चेहरा मॉश्चराईज करणे गरजेचे आहे. जाणून घ्या या ’5′ संकेतांवरून ओळखा तुमचे मॉईश्चरायझर झाले ‘Expire’ !
४.घरगुती उपाय करणे-
सौदर्य खुलवण्यासाठी काही वेळा नववधु घरगुती नैसर्गिक उपाय करतात.जर तुम्ही यापुर्वी कधीही ते केले नसतील तर मात्र सावध रहा.कारण ते तुम्हाला सुट होतील का हे सांगता येत नाही.नवीन घरगुती उपाय वापरण्यापुर्वी प्रथम त्याची पॅच टेस्ट करुन बघा.हे उपाय सुट होत नसतील तर मात्र त्याच गोष्टी वापरा ज्या तुम्ही आतापर्यंत सौदर्यासाठी वापरत आला आहात. नक्की वाचा लग्नसोहळ्यामध्ये नववधुला मेहंदी का काढतात?
५.अपचन होईल असे खाणे-
लग्नापुर्वी तुम्ही तुमच्या आहाराविषयी खुप जागरुक असायला हवे.कारण तुमच्या आहारात पी.एच. चे संतुलन असणे अत्यंत गरजेचे आहे.हा पी.एच.असंतुलित झाल्यास चेह-यावर सुरुकुत्या,मुरुमे येतात व त्वचा सेनसेटिव्ह होते.साखर आणि अंडयातील पिवळ्या भागासारखे अपथ्य पदार्थ पी.एच चे प्रमाण कमी करतात.ताज्या हिरव्या भाज्या व फळे पी.एच.चे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करतात.तेव्हा असाच आहार घ्या ज्यामुळे पी.एच संतुलित राहील. जाणून घ्या तुळस, आलं व मध – अपचनाचा त्रास कमी करणारे घरगुती चाटण
Read this in English
Translated By –Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Facebook