Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ५ घरगुती उपायांनी कमी करा कांजण्यांचे डाग !

$
0
0

कांजण्यांचे (चिकन पॉक्सचे) डाग जात नसल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. पण काही नैसर्गिक उपाय यापासून आपल्याला मुक्तता मिळवून देतील. काही लोकांनी स्वतःचे अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय:

नारळाचं पाणी : त्वचेचा पोत सुधारण्यासाठी नारळाचं पाणी अतिशय उत्तम. त्वचेवरील डाग, पॅचीनेस दूर करण्यासाठी नारळाच्या पाण्याचा फायदा होतो. नारळाचं पाणी अंगाला लावल्याने रक्तप्रवाह सुधारतो. त्वचा मोकळा श्वास घेऊ लागते. आणि त्वचा नितळ, मुलायम होते. तसचं मृत त्वचा निघून जाऊन नवीन त्वचा अधिक छान दिसते. तानिया म्हणते, कापसाच्या बोळ्याने नारळाचे पाणी आवश्यक ठिकाणी लावून रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी कोमट पाण्याने धुवून टाका. नारळाचं पाणी सौंदर्यवर्धक तर आहेच पण त्याचबरोबर त्यात आरोग्यदायी गुणधर्म ही आहेत. नक्की वाचा: नारळ्याच्या पाण्याने कायमस्वरूपी दूर करा पित्ताचा त्रास.

मध: हे नैसर्गिक मॉइश्चरायझर असून त्यामुळे त्वचेवरील व्रण, डाग दूर होण्यास मदत होते. मी ओट्स पावडर मध्ये मध घालून ते मिश्रण डागांवर लावते आणि अर्धा तासानंतर गार पाण्याने धुवून टाकते. २-३ दिवसात डाग कमी झाल्याचं मला जाणवलं, असं अंकिता सांगत होती.

पपई: पपईने त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. तसेच मृत त्वचा निघून जाऊन त्वचेला नवा तजेला मिळतो. पपईचा गर दुधात घालून ते मिश्रण कांजण्यांच्या डागांवर लावा. ५-१० मिनिटांनी गर पाण्याने धुवून टाका. या उपायाने त्वचा अतिशय नितळ, सुंदर होते. असे निकिता सांगत होती. तसेच पपई अतिशय पौष्टीक आहे. पपई खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे !

कोरफड: सूज आल्यावर, भाजल्यावर किंवा जळजळ होत असल्यास कोरफडीमुळे आराम मिळतो. अनन्या म्हणते, मी कोरफड कापून डागांवर लावते. सुकल्यावर थंड पाण्याने धुते. असे मी दिवसातून तीनदा करते. आणि मला फरक दिसू लागला आहे. कोरफडीचे अन्य फायदे जाणून घेण्यासाठी वाचा: बहुगुणी कोरफडीचे आरोग्यदायी फायदे

कोको बटर Cocoa butter: यात फॅटी असिड असते जे त्वचा मॉइश्चराइज  ठेवण्यास मदत करते. तसेच त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचेची झालेली झीज भरून काढण्यास मदत होते. पुर्बा म्हणत होती, माझ्या फ्रेंडने सांगितल्यावर मी कोको बटर त्वचेवर लावण्यास सुरुवात केली आणि मला याचा खूप छान फायदा झाला. कोको बटर लावून त्वचेत मुरेपर्यंत मी ते ठेवते आणि मग पाण्याने स्वच्छ करते. असं मी दिवसातून ३-४ वेळा करते. नक्की जाणून घ्या  : कांजण्या आल्यावर आंघोळ का टाळावी ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>