Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदरपणात चायनीज पदार्थ खाण्याआधी हे नक्की वाचा!

$
0
0

गर्भारपणात काहीतरी आंबट-गोड किंवा चमचमीत असं खावंस वाटतं. ही आवड व्यक्तिपरत्वे बदलते. कोणाला कशाचे डोहाळे लागतील सांगता येत नाही. पण अशा वेळी तुम्हाला चायनीज खाण्याची इच्छा झाली तर? तरीही या मोहाला बळी पडू नका कारण ते आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. जरूर वाचा: चटकदार डोहाळ्यांवर मात करा या ’10′ हेल्दी पदार्थांनी !

गर्भारपणात आपण कोणत्या प्रकारचा आहार घेतो हे फार महत्त्वाचे असते. कारण आपण जे खातो त्यातून मिळणाऱ्या पोषकघटकांवर बाळाची वाढ व विकास अवलंबून असतो. त्यामुळे गर्भारपणात कितीही आवडत असले तरी चायनीज खाणे टाळावे.  कारण चायनीज पदार्थांमध्ये Monosodium glutamate (MSG) आणि सोडियमचे प्रमाण अधिक असल्याने गर्भारपणात ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. जरूर वाचा: गर्भारपणात काय खाणे टाळाल ?

चायनीजमध्ये असलेले MSG चे अधिक प्रमाण बाळ आणि मातेच्या आरोग्यासाठी घातक असते. हे सिद्ध करणारे ठोस संशोधन आपल्याकडे उबलब्ध नसले तरी एका उंदरावर केलेल्या प्रयोगातून असे सिद्ध झाले की प्रेग्नसी मध्ये MSG युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे बाळाची वाढ मंद गतीने होते आणि बाळ झाल्यांनंतरही त्याचे वजन वाढण्यात अडथळा येतो. MSG नाळ ओलांडून आत जाते व बाळाच्या मज्जासंस्थेच्या विकासात अडथळा निर्माण करतात. असे काही एक्सपर्टचे म्हणणे आहे. जरी तुम्ही प्रेग्नेंट नसाल तरी या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

या व्यतिरिक्त चायनीज मध्ये सोडियमचे प्रमाणही अधिक असते. अति प्रमाणात सोडियमच्या सेवनामुळे bloating, pre-eclampsia हे विकार उद्भवतात. म्हणूनच तुम्ही चायनीज खात नसलात तरी नियमित सोडियमचे प्रमाण तपासून पहा.

MSG नसलेले चायनीज कधीतरी खाल्याने बाळाला व तुमच्या आरोग्याला घातक ठरणार नाही. पण एक्स्पर्ट सोनाली शिवलानी यांच्या सल्ल्यानुसार भारतीय रेस्टोरंन्टमध्ये ज्या पद्धतीने चायनीज बनवले जाते ते कोणासाठी ही हानिकारकच आहे. तसेच या पदार्थात सोडियमचे प्रमाण आणि कॅलरीज अधिक असतात.  त्यामुळे प्रेग्नेंसीच्या काळात भात, भाज्या, फळे, मासे, दूध असे पौष्टिक आणि संतुलित पदार्थ आहार घ्या. बाहेरचे आणि तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळा. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा: गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’

 

Reference

1. von Diemen V, Trindade MR. Effect of the oral administration of monosodium glutamate during pregnancy and breast-feeding in the offspring of pregnant Wistar rats. Acta Cir Bras. 2010 Feb;25(1):37-42. PubMed PMID: 20126886.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>