Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

नवीन वर्षात मधुमेहींनी या ८ गोष्टींंची काळजी घेतलीच पाहिजे !

$
0
0

बऱ्याच काळापासून डॉक्टर्स मधुमेह नियंत्रित ठेवण्याचे महत्त्व सांगत आहेत. योग्य वेळी योग्य गोष्टी केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकते आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या समस्या टाळता येतील. अपोलो शुगर दिल्लीचे Consultant Diabetologists डॉ. संजय वर्मा (MD) यांनी नवीन वर्षात बल्ड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन केले. नवीन वर्षात आपल्यासाठी काही बदलावे असे तुम्हाला वाटत असेल तर दिलेल्या सल्ल्यांचे पालन करा.

 

  1. साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवा: पुन्हा पुन्हा तेच तेच ऐकून थोडं कसंतरी वाटू शकतं पण तरीही साखरेची पातळी वाढू देऊ नका. मधुमेह नियंत्रणासाठी सगळ्यात आधी काय कराल तर एक चांगला ग्लुकोमीटर विकत घ्या. आणि दिवसातून ४ वेळा शरीरातील साखरेचे प्रमाण चेक करा. नाश्त्याआधी, नाश्त्या नंतर २ तासाने, रात्रीच्या जेवणाआधी आणि जेवणानंतर २ तासाने. वीकेंडला कामाप्रमाणे टेस्टला सुट्टी देऊ नका. शुगर चेक न विसरता करा. खरंतर याकडे इतक्या बारकाईने कोणी लक्ष देत नाही. पण साखरेचे प्रमाण सतत बदलत असेल आणि 200 mg/dL पर्यंत पोहचले तर ते नियंत्रित करणे कठीण होईल. त्यामुळे वेळीच काळजी घेतली तर योग्य ठरेल. त्याचप्रमाणे HbA1C ही टेस्ट ३ महिन्यातून एकदा करून घ्या. त्यामुळे साखरेचे योग्य प्रमाण समजण्यास मदत होईल. नक्की वाचा: मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय
  2. नियमित युरीन टेस्ट करा: रक्तातील ग्लुकोजच्या  अतिरिक्त प्रमाणामुळे किडनी फेल होऊ शकते. कारण ग्लुकोजच्या अति प्रमाणामुळे किडनीवर अधिक भार पडतो. रक्तातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास किडनीला अधिक काम करावे लागते. त्यामुळे छोट्या रक्तवाहिन्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम म्हणजे युरिनमधून अतिरिक्त पाणी, मीठ आणि प्रोटिन्स बाहेर पडतात. युरीन मधील प्रोटीन किडनीला हानी पोहचवते. त्यामुळे ६ ते ८ महिन्यातून एकदा युरीन टेस्ट करून घ्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या युरीन मध्ये microalbuminuria (protein remnant) चे प्रमाण टेस्ट करून घ्या. त्यावरून तुम्हाला किडनीचे आरोग्य अधिक स्पष्ट होईल.
  3. cardiologistची भेट घ्या: फक्त साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे नाही. कारण अतिरिक्त मधुमेह हृदय, मेंदू, किडनी, पाय, डोळे यांच्या रक्तवाहिन्या कठीण (हार्ड) करतात. यामुळे हृदयाला धक्का पोहचतो. जर तुम्हाला हृदयाचा कोणताही त्रास नसेल तर तो मधुमेहामुळे होऊ शकतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. जर तुम्ही आतापर्यंत हृदयाचे आरोग्य तपासले नसेल तर यंदाच्या वर्षी ते जरूर करा.
  4. डोळे तपासा: मधुमेहामुळे मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यांचे आरोग्य बिघडणे तसेच diabetes retinopathy असे डोळ्यांच्या विकारांना सामोरे जावे लागते. तसंच दृटीवरही त्याचा परिणाम होतो. म्हणून काही समस्या नसेल तरी न चुकता डोळे तपासून घ्या. नक्की वाचा: कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?
  5. glycemic index बद्दल माहिती करून घ्या: फक्त पिष्टमय पदार्थ खाणे टाळल्याने मधुमेहावर काही परिणाम होणार नाही. पिष्टमय पदार्थ अधिक खाल्ल्यामुळे साखरेचे प्रमाण वाढते हे glycemic index (GI) वरून दिसून येते. काही पिष्टमय पदार्थांमध्ये कमी, मध्यम किंवा अधिक प्रमाणात GI तत्त्व असतात. त्यामुळे कोणत्या पदार्थात किती प्रमाणात GI तत्त्व आहे हे जाणून घेतल्याने साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
  6. पायाकडे दुर्लक्ष करू नका: खूप काळापासून तुम्हाला मधुमेह असेल तर एकदा पायांचे आरोग्य तपासण्यासाठी podiatrist ची भेट घ्याच. podiatrist तुम्हाला सांगतील की पायाला कोणत्या ठिकाणी जखम झाली तर ती भरून निघणार नाही. त्यामुळे पायाची योग्य काळजी तुम्ही घेऊ शकाल. तसंच टाईट शूज घालणे टाळा, अनवाणी चालू नका, नखं कापताना काळजीपूर्वक कापा. या लहान सहन गोष्टी पाळल्यास फूट इन्फेकशन दूर राहील. जर तुमच्या पायांना अधिक धोका असेल तर customised foot sole वापरणे योग्य राहील. काळजी कशी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा: मधूमेहींनी पायांची काळजी घेण्यासाठी या ’7′ गोष्टींकडे अवश्य लक्ष द्यावे
  7. व्यायामात सातत्य राखा: चालणे हा मधुमेहावर उत्तम व्यायाम आहे. पण काम करत करत चालू नका. उदा. भाजी घेणे, मुलांना शाळेत सोडणे, दुकान व इतर ठिकाणी जाणे, वगैरे. एका तासात ६ किलोमीटर चालणे हा योग्य वेग आहे. पण हे चालणे म्हणजे धावणे किंवा आळशासारखे चालणे नाही. सकाळी चालायला जाणे मधुमेहींसाठी अतिशय उत्तम. चालण्याव्यतिरिक्त ऐरोबिए ऍक्टिव्हिज करणं किंवा एखादा खेळ तुम्ही खेळू शकता. तसेच योगसाधनेमुळे होणारे फायदे जाणून घेण्यासाठी वाचा: योगासनांनी करा ‘मधुमेहा’वर मात !
  8. डॉक्टरांचा सल्ला घेण्यास टाळाटाळ करू नका: रक्तातील साखरेच्या प्रमाणाच्या अस्थिरतेमुळे neurotransmitters like serotonin and 5HT ची पातळी ही बदलते. याचा परिणाम म्हणजे मूड स्विनग्स, चिंता, नैराश्य याला अधिक काळ सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी करणे विसरून जाता. यामुळे शरीरातील ग्लुकोज प्रमाणाबाहेर वाढते आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम करते. हा टप्पा गाठण्याआधी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>