किक बॉक्सिंग किंवा इतर फीटनेस वाढवणार्या अॅक्टीव्हिटीज तुम्ही करत असाल तर त्याची सुरवात हलक्या फुलक्या व्यायामांनी, वॉर्म अप प्रकारांनी होते. योगावर्गात तुम्ही केलेले अनेक स्ट्रेचिंगचे प्रकार तुम्हांला या वर्गातही आढळतील. पण योगा आणि स्ट्रेचिंग यामध्ये साम्य वाटत असले तरीही ते एकमेकांपेक्षा वेगळे आहे. योगा केल्याने स्नायूंचा व्यायाम होतो तसेच अनेक आरोग्यदायी फायदे होतात. म्हणूनच योगा आणि स्ट्रेचिंगमधील नेमका फरक जाणून घेण्यासाठी योगा एक्सपर्ट नीता शर्मा यांचा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
- बॉडी अलाईन्मेंट
योगा करताना तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये बसता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. प्रत्येक आसनात शरीराची एक विशिष्ट स्थिती असते. जसे वृक्षासन करताना पाठीचा कणा ताठ असणे गरजेचे आहे. योगा करताना शरीराची विशिष्ट लवचिकता असणे गरजेचे आहे. तसेच विशिष्ट आसनातून अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी ते आसन योग्यरित्या करणंदेखील गरजेचे आहे.
- वेळ
स्ट्रेच करताना तुम्ही फार काळ एकाच स्थितीत नसता. पण योगासन करताना त्या आसनामध्ये किमान काही वेळ ( अंदाजे 20-30 सेकंद) राहणं गरजेचे आहे. स्ट्रेचिंग हे अत्यल्प काळासाठी असते.
- श्वसनावरील नियंत्रण
योगा करताना तुमच्या श्वसनावरील नियंत्रणही गरजेचे असते. त्यावर एकाग्रता अवलंबून असते. स्ट्रेचिंग करताना दीर्घ श्वासाची गरज नसते. मन शांत करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि उच्छवास बाहेर सोडा.
- फायदे
व्यायामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्हांला स्ट्रेचिंग करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे इजा / अपघात होण्याची शक्यता कमी होते. योगासनांमुळे केवळ स्नायू स्ट्रेच होत नाहीत तर कोअर स्ट्रेन्थ सुधारते, सांधे मोकळे होतात. योगामुळे शरीर अधिक आरामदायी राहण्यास मदत होते. योगा केल्यानंतर फारसा थकवा जाणवत नाही. स्ट्रेचिंग सोबतच श्वासावरील नियंत्रण तुम्हांला अधिक आरोग्यदायी ठरण्यासाठी फायदेशीर ठरते.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock