Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सांधेदुखीचा त्रास कमी करणारे ‘हेल्दी घरगुती पेय’

$
0
0

सांधेदुखीचा  हा अतिशय त्रासदायक आणि दीर्घकाळ चालणारा आजार आहे. मग हा त्रास थोडा कमी करण्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. चौकस आणि काही विशिष्ट आहाराने तुम्ही हा त्रास थोडा कमी करू शकता. ‘हळदीचा रस’ हा असाच एक पर्याय. यामुळे गुडघ्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.

  • हळद आणि लिंबू का आहे फायदेशीर ? 

हळदीतील क्युरक्युमिन घटकामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स आणि दाहशामक घटक असतात. तसेच हा उपाय नैसर्गिक असल्याने त्याचे दुष्परिणाम नसतात. हळद गुडघेदुखीबरोबरच हृद्यविकार, अल्झायमर यांवरदेखील फायदेशीर ठरते. वेदना कमी करण्यासोबतच संधीवाताचे दुखणे वाढण्याची शक्यतादेखील कमी होते. लिंबातील व्हिटामिन सी हाडांना आणि स्नायूंना बळकट करण्यास मदत करतात.

  • हळकुंडांचा रस 

साहित्य :

  • 4-5 ओली हळकूंड
  • 1 लिंबू
  • आल्याचा तुकडा
  • 2 चमचे मध
  • 2 कप थंड पाणी किंवा बर्फ

कृती :

  • ओल्या हळकुंडांचा रस काढून घ्यावा.
  • त्यातील 2-3 चमचे रस एका ग्लासमध्ये घेऊन त्यात मध, लिंबाचा रस व किसलेले आलं एकत्र करावे.
  • त्यात आवश्यकतेनुसार पाणी व बर्फ मिसळावा.

मधामुळे हळदीचा उग्रपणा कमी होण्यास मदत होते. तसेच हे पेय चविष्ट होते. हळदीचे दुध हे आरोग्यदायी असते मात्र तुम्हांला दूध पिणे आवडत नसल्यास हे पेय नक्कीच फायदेशीर ठरेल.

हळदीचा पल्प तुम्ही 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. तसेच याचा वापर तुम्ही कढीमध्ये करू शकता.


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Sourece - Bid adieu to arthritic pain with this natural juice

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>