किडनी विकार अथवा पोटाचे विकार असल्यास डॉक्टर तुम्हाला अल्ट्रासाउंड टेस्ट करण्याचा सल्ला देतात.एक्स-रे मशीन मध्ये रेडीएशन द्वारे शरीराच्या अवयवांची प्रतिमा घेतली जाते तर अल्ट्रासाउंड मध्ये ध्वनिलहरी द्वारे अवयवांच्या आतील भागाचे परिक्षण केले जाते.त्यामुळे तुमच्या पोटाच्या अवयवांचे अल्ट्रासाउंड करण्यापुर्वी ही माहीती जरुर वाचा.
मुंबईतील बाळाभाई नानावटी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट रेडीओलॉजीस्ट डॉ.रश्मी पारेख यांच्या मते अल्ट्रासाउंड स्कॅन करण्यापुर्वी व नंतरही या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.
पोटाच्या वरच्या भागात अल्ट्रासाउंड केल्याने काय होते?
यकृत,किडनी,पित्ताशय,स्वादुपिंड व प्लीहा या अवयवांची स्थिती पहाण्यासाठी व त्यांमधील विकारांचे निदान करण्यासाठी अल्ट्रासाउंड टेस्ट केली जाते.पोटदुखत असल्यास किडनी विकार,यकृताचे विकार,पित्ताशयाचे खडे किंवा किडनी स्टोन या समस्यांचे निदान करण्यासाठी अल्ट्रासाउंड टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात येतो.
अल्ट्रासाउंड टेस्ट करण्यापुर्वी कोणती काळजी घेणे गरजेचे असते?
अल्ट्रासाउंड टेस्ट पुर्वी रुग्णांना आदल्या दिवशीच्या रात्रीपासून किंवा त्या दिवशी ८ ते १० तास उपाशी राहण्यास सांगण्यात येते.काही वेळा परिक्षणापुर्वी फक्त ४ ते ६ तास काहीही न खाण्याचा सल्ला देण्यात येतो.तर काही रुग्णांना त्यांच्या आरोग्य स्थितीनूसार फक्त फॅट्स फ्री आहार घेण्यास सांगण्यात येते.किडनीसाठी करण्यात येणा-या अल्ट्रासाउंड टेस्टमध्ये मूत्राशय भरण्यासाठी परिक्षणापुर्वी चार ते सहा ग्लास पाणी पिण्यास सांगण्यात येते.यासोबत सैल कपडे घालण्याचा सल्ला देण्यात येतो.
अल्ट्रासाउंड कसे कार्य करते?
अल्ट्रासाउंड इमेजिंग हे सोलार इमेजिंग या तत्वानूसार कार्य करते.यामध्ये ट्रान्सड्यूसर मधून ध्वनीलहरी शरीरात प्रवेश करतात व परावर्तीत होऊन पुन्हा कॅमेरामध्ये कॅप्चर होतात. ट्रान्सड्यूसर च्या सहाय्याने परावर्तीत झालेल्या ध्वनीलहरीचे रुपांतर पडद्यावर उमटते त्यामुळे अवयवाची स्कॅन प्रतिमा दिसू लागते.
अल्ट्रासाउंड टेस्ट कशी करतात?
अल्ट्रासाउंड टेस्ट करण्यासाठी रुग्णाला टेस्ट करण्यासाठी टेबलावर पाठीवर झोपण्यास सांगण्यात येते.कधीकधी कुशीवर देखील वळण्यास सांगण्यात येते.त्यानंतर पोटातील ज्या अवयवाचे परिक्षण करायचे असेल तिथे रेडीओलॉजिस्ट एक जेल लावतात.जेल मुळे परिक्षणासाठी वापरण्यात येणा-या ट्रान्सड्यूसर हे साधन व रुग्णाच्या त्वचेमधील हवा दूर होते सहाजिकच त्यामुळे टेस्ट करणे सोपे जाते.परिक्षणासाठी वापरण्यात येणारे ट्रान्सड्यूसर हे साधन योग्य इमेज येईपर्यंत पोटावरुन फिरवण्यात येते.परिक्षण केल्यानंतर त्वचेवरील जेल पूसून टाकण्यात येते. जाणून घ्या पोटात वेदना होणार्या जागा देतात या ’5′ आजाराचे संकेत
परिक्षणासाठी वापरण्यात येणारी जेल हानिकारक असू शकते का?
परिक्षणासाठी वापरण्यात येणा-या जेल ला कपलींग जेल असे म्हणतात.या जेल मुळे पोटातील अवयवांची योग्य प्रतिमा घेण्यासाठी त्वचा व ट्रान्सड्यूसर यामध्ये योग्य संबध जोडला जातो.हे जेल विषारी नसून त्यामुळे कोणतीही त्वचेची समस्या होत नाही.परिक्षणानंतर ती पूसून टाकल्यामुळे तीचे डाग देखील कपड्यांवर पडत नाहीत.
अल्ट्रासाउंड परिक्षण करताना वेदना होतात का?
एक्स-रे परिक्षणाचे दुष्परिणाम कमी होतात.मात्र अल्टासाउंड परिक्षण करणे हे पुर्णपणे सुरक्षित आहे.अल्ट्रासाउंडमुळे कोणत्याही वेदना होत नाहीत.मात्र कधी कधी हे परिक्षण करताना रुग्णाला थोडेसे अस्वस्थ वाटू शकते.त्याचप्रमाणे हे परिक्षण करताना चांगल्या परिणामांसाठी काही वेळा रुग्णांना त्यांचा श्वास काही क्षण रोखण्यासाठी सांगण्यात येते.
अल्ट्रासाउंड परिक्षणासाठी किती वेळ लागतो?
अल्ट्रासाउंड टेस्ट करण्यासाठी ३० मिनीटे लागतात.कधीकधी दोन वेळा टेस्ट करण्याची वेळ आल्यास दुसरी टेस्ट करण्यापुर्वी तुम्हाला थोडा वेळ बाहेर बसण्यासाठी सांगण्यात येते.त्याचप्रमाणे अचूक प्रतिमा येण्यासाठी तुम्हाला काही हालचाली करण्यास सांगण्यात येते.
अल्ट्रासाउंड टेस्टचा रिझल्ट कधी मिळतो?
रेडिओलॉजिस्ट तुम्हाला त्याच दिवशी तुमच्या टेस्टचा रिझल्ट देतात.त्यासाठी टेस्ट नंतर तुम्हाला १० ते २० मिनीटे थांबावे लागते.काही समस्या असल्याच किंवा एखाद्या समस्येवर उपचार सुरु असल्यास तुम्हाला वारंवार अल्ट्रासाउंड परिक्षणासाठी जावे लागते.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock