डाएट न करता किंवा वजन कमी करण्याचे कोणतेही प्रयत्न न करता कधीकधी अचानक तुमचे वजन कमी होऊ लागते.सुरुवातीला त्याबाबत काळजी न वाटता तुम्हाला आनंदच वाटू शकतो.मात्र काहीही प्रयत्न न करता वजन कमी होणे व थकवा जाणवणे ही लक्षणे गंभीर असू शकतात. अचानक वजन कमी होणे हे एखाद्या आजाराचे देखील हे पूर्वलक्षण असू शकते.त्यामुळे तुमचे वजन का कमी होत आहे हे जरुर तपासा.
यासाठी जाणून घेऊयात कोणत्या विकारांमुळे वजन अचानक कमी होऊ शकते-
१.मधूमेह-
मधूमेह हा असा एक मेटाबॉलिक विकार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते.शरीरात पुरेसे इन्सुलीन निर्माण न झाल्यामुळे अथवा तुमच्या शरीराने इन्सुलीनला योग्य प्रतिसाद दिल्यामुळे किंवा या दोन्ही कारणांमुळे तुम्हांंला मधूमेह होऊ शकतो. जाणून घ्या रक्तातील साखरेवर लक्ष ठेवण्यासाठी glucometerचा वापर करण्यापूर्वी या ’5′ गोष्टींकडे लक्ष द्या
लक्षणे-
वारंवार लघवीला होणे,सतत लहान लागणे,खुप भूक लागणे,वजन वाढणे(टाईप २ मधूमेह),अचानक वजन कमी होणे(विषेशत: टाईप १ मधूमेह),थकवा,जखमा लवकर न भरणे,हातपायांना मुंग्या येणे किंवा बधीर होणे.
२.डिप्रेशन-
डिप्रेशन हा एक मनाचा विकार आहे.ज्यामध्ये दु:ख,राग,चीडचीड या भावना दिवसेंदिवस वाढत जातात.
लक्षणे-
झोप न येणे अथवा फक्त झोपून रहावेसे वाटणे,मन एकाग्र न होणे,नकारात्मक विचार येणे,निराशावाद,उदासिनता येणे ,चीडचीड होणे,आत्महत्या करण्याचा विचार मनात येणे आणि वजन खुप कमी होणे.
३.ओव्हर अॅक्टीव्ह थायरॉईड-
थायरॉईड ग्रंथीचे कार्य शरीरातील मेटाबॉलिजमला नियंत्रित करण्या-या थायरॉईड हॉर्मोन्स निर्माण करणे हे असते.उदा.तुमच्या ह्रदयाचे ठोके,त्वरीत कॅलरीज कमी करणे व पचनक्रिया या कार्यावर नियंत्रण ठेवणे.त्याच प्रमाणे ही ग्रंथी तुमच्या रक्तातील कॅल्शियमची पातळी देखील नियंत्रित करते.जर या ग्रंथीने अती थायरॉईड हॉर्मोन्स निर्माण केले तर तिचे कार्य अधिक सक्रिय होते व तुम्हाला हायपोथायरॉईडीझम या समस्येला तोंड द्यावे लागते.
लक्षणे-
ह्रदयाची धडधड जोरजोरात व अनियमित होणे,घाम न येणे,अचानक वजन कमी होणे,धाप लागणे,पॅनिक अॅटेक,डोळे सूजणे,थकवा,मूड स्वींग,वंधत्व.प्रत्येक व्यक्तीमध्ये ही सर्व लक्षणे दिसतीलच असे नाही.काही लोकांमध्ये कमी जास्तप्रमाणात ही लक्षणे आढळू शकतात.
४.टीबी अथवा क्षयरोग-
टीबी हा एक संक्रमक रोग असून तो मायक्रो बॅक्टेरीयम ट्यूबरक्लूओसिस या विषांणू पासून होतो.याचा दुष्परिणाम फुफ्फुसांवर होतो.टीबीचा किडनी,पाठीचा कणा आणि मेंदूच्या कार्यावर देखील दुष्परिणाम होतो.सहा महिने अॅन्टी बायोटीक्सचा कोर्स घेऊन यावर उपचार केले जातात. जाणून घ्या क्षयरोग – एक गंभीर मात्र आटोक्यात येणारा आजार !
लक्षणे-
खोकला,कफातून कधीकधी रक्त येते,छातीत दुखणे,थकवा,अचानक खुप वजन कमी होणे,ताप व रात्रीचा घाम येणे
५.सीपीओडी अथवा फुफ्फुसांचा गंभीर विकार-
सीपीओडी(Chronic obstructive pulmonary disease)या फुफ्फुसांच्या विकारांमध्ये श्वासनलिकेमध्ये अडथळा झाल्यामुळे श्वास घेताना त्रास होतो.श्वासनलिकेत सूज आल्यामुळे फुफ्फुसांच्या कार्यात अडथळा येतो.
लक्षणे-
फुफ्फुसांचे खुप मोठे नुकसान होईपर्यंत विशेष लक्षणे आढळून येत नाहीत.साधारणात: घरघर होणे,धाप लागणे,छाती जखडणे,श्वासनलिकेत इनफेक्शन,ओठ व हाताच्या बोटांची नखे निळसर पडणे,थकवा येणे व शेवटच्या टप्प्यात अचानक वजन कमी होणे.
६.आतड्यांमध्ये सूज येणे-
या समस्येला आईबीडी (Inflammatory bowel disease) असे म्हणतात.ज्यामध्ये आतड्यांमध्ये सूज आल्यामुळे पोटात दुखते व कुपोषण होते.
लक्षणे-
डायरिया,पोटात दुखणे,क्रॅम्प येणे,भूक कमी लागणे,वजन कमी होणे,थकवा,अल्सर आणि शौचावाटे रक्त येणे.
७.अॅडीसन डिसीस-
अॅडीसन डिसिस हा एक हॉर्मोनल विकार आहे.ज्यामध्ये मूत्रपिंडाजवळील अॅड्रीनल ग्रंथी अपू-या हॉर्मोन्सची निर्मिती करते.याचा दुष्परिणाम सर्व वयोगटातील स्त्री व पुरुष वर होतो.
लक्षणे-
वजन कमी होणे,थकवा,कमी रक्तदाब,स्नायू कमजोर होणे.
८.कर्करोग-
कर्करोग या आजारात शरीरामध्ये कुठल्याही अवयवात कर्करोगाच्या पेशींमध्ये अवास्तव वाढ होत जाते.कर्करोगाची लागण त्वचेतील पेशींपासून सुरु होऊन पुर्ण शरीरात पसरु शकते.कर्करोग जेव्हा मेंदू अथवा पाठीच्या कण्यामध्ये असतो तेव्हा त्याला सेंट्रल नर्व्हस सिस्टिम कॅन्सर असे म्हणतात.
लक्षणे-
प्रत्येक कर्करोगामध्ये रुग्णामध्ये वेगवेगळी लक्षणे आढळून येतात.मात्र काही लक्षणे सर्व कॅन्सर मध्ये समान असतात.जसे की वजन कमी होणे,थकवा,स्नायू व सांध्यांमध्ये वेदना,रात्री घाम येणे,त्वचेमध्ये बदल होणे.
९.एचआयव्ही किंवा एड्स-
ह्यूमन इ्म्युनोडेफिशियंसी व्हायरस म्हणजेच एचआयव्ही हा इतर विषाणूंप्रमाणेच होणारा संसर्गजन्य विकार आहे.फक्त या विकारामध्ये मानवी रोगप्रतिकारक शक्ती इतर विषाणूंप्रमाणे या विषाणूंना नष्ट करु शकत नाही.उलट या विषाणूंमुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.त्यामुळे रुग्णाला रोगामध्ये तग धरणे व संसर्गाला प्रतिबंध करणे शक्य होत नाही.एडस् हा एचआयव्ही संसर्गाच्या शेवटचा टप्पात होणारा भयंकर रोग आहे. जाणून घ्या HIV/AIDS बाबत या ’33′ प्रश्नांंबाबतचे समज-गैरसमज आजच दूर करा !
लक्षणे-
एचआयव्ही चा संसर्ग बळावून एड्स होण्याच्या टप्प्यामध्ये ताप,घशामध्ये वेदना,स्नायू दुखणे,नाकपूड्या सूजणे,तोंडाचा अल्सर,थकवा जाणवतो.यासोबत वजन कमी होणे,खोकला,धाप लागणे,डायरिया,दृष्टी अंधूक होण्याची समस्या देखील आढळते.
१०.पार्किसन डिसीस-
पार्किसन डिसिस हा एक प्रगत मज्जासंस्था विकार असून यामध्ये चेहरा आणि शरीर जखडते व हालचाल मंद होते.हा विकार पुर्ण बरा होऊ शकत नसला तरी औषधउपचारांमुळे यात आराम मिळतो.
लक्षणे-
शरीराचा तोल सांभाळता न येणे,डोळ्यांची उघडझाप,हसणे,हात पसरणे या आपोआप होणा-या क्रिया करणे कठीण होते.चालताना सांधे जखडतात,बोलणे व लिहणे कठीण होते,अचानक वजन कमी होते.असे असले तरी वजन कमी होणे हे या विकाराच े प्रमुख लक्षण नाही.Dr. Melessa Nirenberg’s यांच्या वक्तव्यानूसार या विकाराचे निदान होताना प्रथम लोकांचे वजन कमी होते त्यामागे त्यांची चव व गंध घेण्याची क्षमता कमी होणे हे कारण देखील असू शकते.औषधउपचारांची सुरुवात झाल्यावर वजन कमी होणे बंद होते.त्यामुळे या विकारात वजन कमी होणे हे कर्करोग व डिप्रेशन सारख्या आजारा इतपत गंभीर नाही असे त्यांचे मत आहे.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल?
तुमच्या मते इतर कोणतेही कारण नसताना सहा ते बारा महिन्यांमध्ये जर तुमचे वजन ४.५ ते ५ किलोने किंवा तुमच्या वजनाच्या पाच टक्क्यांनी कमी झाले असेल तर तुम्ही याबाबत सावध होणे गरजेचे आहे.वर सांगितल्या पैकी कोणतीही लक्षणे तुमच्यामध्ये आढळली तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.कारण वजन कमी का होत आहे याचे निदान लवकर झाले तरच तुम्हाला उपचार करुन पुन्हा पुर्ववत होणे शक्य आहे.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock