कधीकधी अचानक केस खुप गळत असल्याचे तुमच्या लक्षात येते.केस गळण्याचे कारण शोधताना मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.सर्वसाधारणपणे आपण रोज केस स्वच्छ धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करतो.त्यामुळे आपण वापरत असलेल्या शॅम्पूच्या वापराने तर केस गळत नाहीत का? किंवा कोणता शॅम्पू आपल्या केसांसाठी योग्य असू शकतो? हे प्रश्न आपल्याला पडू शकतात.
केस गळणे ही अनेकांना भेडसावणारी एक गंभीर समस्या आहे.मात्र केस गळण्याची कारणे प्रत्येक व्यक्तीमध्ये निरनिराळी असू शकतात.
Trichologist डॉ.अपुर्वा शाह यांनी त्यांच्या ‘ हॅव अ ग्रेट हेअर डे’ या पुस्तकामध्ये त्यांनी शॅम्पू केल्यामुळे केस गळत नाहीत किंवा तेलांमुळे केसांच्या त्वचेतील मुळे बंद होत नाहीत असे मत मांडले आहेत.त्याचप्रमाणे हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी देखील त्यांच्या ‘हेअर योगा’ या पुस्तकामध्ये शॅम्पूच्या वापरामुळे केस गळत नाहीत या सत्याचा उलगडा केला आहे.
अयोग्य शॅम्पू वापरल्यामुळे मात्र तुमच्या केसांची मुळे नक्कीच कमजोर होऊ शकतात.त्यामुळे बरेच दिवस तुमचे केस गळत राहतात व केसांचे खुप नुकसान होते.यासाठी तुमच्या केसांच्या प्रकारानूसार योग्य शॅम्पूचा वापर करणे गरजेचे आहे.
योग्य शॅम्पूची निवड करण्यासाठी आधी तुमच्या केसांचा प्रकार ओळखा-
ऑईली हेअर-काही दिवस केसांंमधील त्वच्या तेलकट असते पण केसांची शेवटची टोके कोरडी असतात.
ड्राय हेअर-केस खरखरीत असतात जे लवकर गंुततात व कुरळे किंवा फ्रिजी असतात.
नॉर्मल हेअर-केसांचा पोत अती कोरडा अथवा अती तेलकटही नसतो.
डॅमेज हेअर-या केसांमध्ये कोंडा किंवा केस दुभंगण्याची(स्प्लीट एन्ड)समस्या असते.
लीम्प हेअर-केस सपाट असतात ज्यांचा वॉल्यूम जास्त नसतो किंवा केस फुललेले नसतात.
योग्य शॅम्पू कसा निवडाल?
तुमच्या केसांचा प्रकार ओळखून योग्य शॅम्पूची निवड करा.बाजारात अनेक ब्रॅन्डचे शॅम्पू उपलब्ध असले तरी त्यातून तुमच्यासाठी योग्य प्रकार च्याच शॅम्पूची निवड करा.त्याचप्रमाणे दर ४ ते ५ आठवड्यांनी तुमच्या शॅम्पूचा ब्रॅन्ड बदला.सतत एकाच ब्रॅन्डचा शॅम्पू वापरल्यामुळे तुमच्या केसांमधील त्वचेवर त्याचा दुष्परिणाम होतो व तुम्हाला हवा तसा योग्य बदल दिसून येत नाहीत. नक्की वाचा केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा
जावेद हबीब यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेल्या मतानूसार शॅम्पूचा वापर केसांची त्वचा स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी करण्यात येतो.ज्याप्रमाणे आपण अंघोळ करुन शरीरावरचा मळ काढून टाकतो त्याचप्रमाणे शॅम्पू केल्याने केस स्वच्छ होतात.अनेकदा जाहीरातीमध्ये दाखविण्यात आल्याप्रमाणे शॅम्पू हा कोणतीही जादू करणारा घटक नाही.केस अथवा केसांच्या त्वचेला हानी होऊ नये म्हणून ते नेहमी ५-७ पीएच लेवल असलेला व केसांसाठी हानिकारक अमोनिया हा घटक नसलेला शॅम्पू घेण्याचा ते आवर्जून सल्ला देतात.
ऑईली हेअर साठी शॅम्पू-
डॉ.शाह यांनी पुस्तकात दिलेल्या सल्ल्यानूसार तेलकट केसांसाठी माईल्ड व हर्बल शॅम्पूने रोज केस धुणे योग्य ठरेल.या शॅम्पूच्या वापरामुळे केसांच्या त्वचेवर जास्त तेल जमा होत नाही.
ड्राय हेअर साठी शॅम्पू-
ड्राय केस असलेल्यांनी माईल्ड क्लिनजर चा वापर करावा.अधिक गुंता न होण्यासाठी त्यांनी शॅम्पूनंतर चांगल्या कंडिशनर व सिरमचा वापर करावा.मात्र केस कोरडे असल्यामुळे रोज केस धुऊ नयेत. जाणून घ्या एका रात्रीत हटवा केसांचा निस्तेजपणा !
नॉर्मल हेअरसाठी शॅम्पू-
नॉर्मल केस असणा-या लोकांनी कोणताही शॅम्पू वापरण्यास काहीच हरकत नाही.केसांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी व केस स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी वारंवार केस धुवावे.त्याचप्रमाणे डॉ.शाह यांच्या मतानूसार अशा लोकांनी केसांच्या आरोग्यासाठी केसांना वरचेवर ऑईलींग-क्लीनसींग-कंडीशनींग करावे.
डॅमेज हेअरसाठी शॅम्पू-
जर तुमचे केस दुभंगलेले असतील तर प्रथम केस ट्रीम करा.केसांच्या मजबूती साठी केराटीन घटक असलेले शॅम्पू वापरा.जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर त्यासाठी डॅन्ड्रफ दूर करणारा शॅम्पू वापरा.पण लक्षात ठेवा हा शॅम्पू आठवड्यातून फक्त एकदा किंवा फारतर दोनदा वापरा.कारण या शॅम्पूच्या अधिक वापरामुळे तुमचे केस रफ अणि ड्राय होतील.त्याच प्रमाणे कोंडा दूर झाल्यानंतर ताबडतोब कोंड्यावरचा शॅम्पू वापरणे थांबवा. हे नक्की वाचा केसगळती रोखण्यासाठी दिवसातील ’5 मिनिटं’ हा उपाय नक्की करा
लीम्प हेअरसाठी शॅम्पू-
मरगळलेले केस असलेल्या लोकांनी केसांनी अधिक वॉल्युम मिळेल असे शॅम्पू वापरावेत मात्र ते वापरताना त्यांची पीएच पातळी जरुर तपासावी.त्याचप्रमाणे केसांना गरज नसल्यास कंडिशन करु नये.
जर तुम्ही केसांना कलर केले असेल तर त्यासाठी सांगण्यात आलेल्या स्पेशल शॅम्पूचा वापर करा.ज्यामुळे तुमच्या केसांचा रंग फिकट होणार नाही.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock