टंग अल्सर मध्ये जीभेवर फोड येतात जे खुप वेदनादायक असतात.या फोडांचा आकार प्रत्येकवेळी वेगळा असू शकतो.जरी हे फोडांमुळे काही नुकसान होत नसले तरी त्यांच्या वेदना असह्य असल्याने साधे अन्न खाणे देखील कठीण होते.
जाणून घेवूयात टंग अल्सर होण्यामागची काही कारणे-
टंग अल्सरची कारणे निरनिराळी असू शकतात.
१.जखम-
एखादा कठीण पदार्थ चावताना,अन्न खाताना,दात घासण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे किंवा न बसणा-या कवळीमुळे तोंडात जखम होते व त्यामुळे टंग अल्सर होतो.कधीकधी वाकडे-तिकडे अथवा तिरकस दात जीभेवर घासले गेल्यास देखील जीभेचा अल्सर होण्याची शक्यता असते.
२.ताण-तणाव
मनावरील ताण-तणावाचा संपुर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम होत असतो.ताणामुळे शरीरात जी रसायने निर्माण होतात त्यांचा दुष्परिणाम जीभवर होतो व टंग अल्सर होण्याची शक्यता वाढते.
३.काही फळे-
संत्र,लिंबू यांसारख्या आबंट फळांमुळे व टोमेटो सारख्या आंबट भाज्यांमुळे जीभेचा अल्सर होण्याची शक्यता असते.त्याच प्रमाणे चॉकलेट,शेंगदाणे,बदाम खाल्याने टंग अस्लरचा धोका वाढू शकतो.विटामिन बी६ च्या अभावामूळे जीभेला वारंवार अल्सर होण्याची शक्यता असते.
४.धुम्रपान-
धुम्रपानामुळे जीभेला जळजळ होते व फोड येतात.त्याचप्रमाणे धुम्रपान सोडताना देखील अशाच प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.पहिल्यांदा स्मोक केल्यास तात्पुरता टंग अल्सर होण्याची शक्यता असते.
५.हॉर्मोनल बदल-
हॉर्मोनल बदलामुळे टंग अल्सर होण्याची शक्यता असते.ब-याचदा महीलांमध्ये त्यांच्या मासिक पाळीमध्ये हा त्रास उद्भवतो.
६.काही ठराविक आजार-
नागीण या आजारातील इनफेक्शनमुळे जीभेवर फोड येतात.काही हात,पाय आणि तोंडातील आजारांमध्ये सुद्धा जीभेवर लालसर जखम होते ज्यामुळे असह्य वेदना होतात.क्षयरोगामध्ये देखील क्वचित जीभेचा अल्सर होण्याची शक्यता असते.बेहसट डिसीज,क्रोन्स डिसीज,किलीएक डिसीज,पॅमफिगस व व्हगरस या विकारांमध्ये देखील तोंडांचा व जीभेचा अल्सर होतो.रोगप्रतिकारक शक्ती कार्यक्षम नसल्यास आणि ग्रॅस्ट्रोइनटेस्टीनल विकार असल्यास जीभेचा अल्सर होण्याचा धोका अधिक असतो.
७.काही औषध-उपचार-
कधीकधी काही रोगउपचारातील पेनकिलर्स किंवा बीटा-ब्लॉकर्स या औषधांमुळे टंग अल्सर होऊ शकतो.
८.ओरल कॅन्सर-
तोंडांच्या कर्करोगामुळे जीभेवर फोड येतात.काही वेळा तोंडाच्या कर्करोगाचे प्हे एक प्राथमिक लक्षण असू शकते.कर्करोगाच्या सुरुवातीला हे फोड वेदनादायक नसतात.मात्र या आजाराच्या पुढील टप्प्यात त्यामुळे होणा-या वेदना असह्य असू शकतात.वारंवार असे व्रण जीभवर दिसत असतील तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टंग अल्सरवर करण्यात येणारे उपचार-
ब-याचदा टंग अल्सर दोन ते तीन आठवडयांनी आपोआप बरा होतो.मात्र काही वेळा त्यावर विशेष उपचार करण्याची आवश्यक्ता असू शकते.टंग अल्सरची समस्या उपचार व तोंडाची योग्य स्वच्छता राखून सोडवणे शक्य आहे.काही विशिष्ठ प्रकारच्या जेल व स्प्रे चा वापर करुन टंग अल्सरमधील वेदना कमी करता येते.एन्टीमायक्रोबीयल माऊशवॉशच्या वापराने यामध्ये अधिक आराम मिळतो तसेच इनफेक्शनचा धोका कमी होतो.अपुरे पोषण असल्यास मल्टी विटामिन्स घेणे फायदेशीर ठरु शकते.टंग अल्सरची समस्या असल्यास मसालेदार व आंबट पदार्थ खाणे टाळा.तीव्र तापासह जीभेवर सुजे व फोड आल्यास त्वरीत वैद्यकीय मदत घ्या.कारण हे एका तीव्र संसर्गाचे लक्षण असू शकते.त्याचप्रमाणे वारंवार टंग अल्सरचा त्रास होत असेल तर ओरल कॅन्सरची टेस्ट जरुर करुन घ्या.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock