Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या कारणांमुळे केस विरळ होण्यावर घरगुती उपाय फायदेशीर ठरत नाहीत !

$
0
0

आजकाल विसीतल्या लोकांमध्ये देखील केस गळणे अथवा केस पातळ होण्याच्या समस्या आढळतात.केस गळून टक्कल पडल्यामुळे पुरुष अथवा महिला दोघांच्याही सौदर्यांत बाधा येते.समाजामध्ये केसांमधील हे टक्कल लपवणे शरमेचे वाटू लागते.असे केसगळणे किंवा टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास गमावलेले अनेक लोक यावर इंटरनेटवर उपाय शोधतात,महागडे उपचार करतात अथवा घरगुती उपाय करणे सुरु करतात.

केसगळतीचे प्रकार व कारणे विविध असू शकतात.आमच्या अनेक वाचकांकडून केसगळतीवर  घरगुती उपाय कोणते करावेत ही विचारणा आम्हाला सतत करण्यात येते.

हेअर ट्रान्सप्लांट आणि प्लेटलेट रीच प्लाझमा थेरपी सारख्या वेळकाढू व महागडया उपचारांपेक्षा घरगुती उपाय करणे सोपे असू असते.मात्र टक्कल पडले असल्यास केस पुन्हा उगवण्यासाठी घरगुती उपचार प्रभावी ठरु शकत नाहीत.

अंडी,ग्रीन-टी,कांदा,मेथी आणि आवळा या घरगुती वापरातील पदार्थांचा केसांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो.फोर्टीस हॉस्पिटलच्या Consultant Dermstologist डॉ.स्म्रीती नसवा यांच्या मते जाणून घेऊयात या घरगुती औषधांचा केसगळतीवर काय परिणाम होतो.

डॉ.नसवा यांच्या मते नारळाचे तेल व ऑलिव्ह ऑईल केसांसाठी उत्तम असते कारण त्यामुळे केसांची त्वचा कोरडी होत नाहीत. मात्र यामुळे फक्त तुमच्या डोक्यावर असलेल्या केसांचीच गुणवत्ता सुधारणे शक्य होते.या तेलांमुळे तुमच्या केसांच्या मुळांना नवीन केस उगवण्यासाठी उत्तेजना मिळत नाही कारण तुमच्या केसांची मुळे व फॉलिकल्स केसातील त्वचेच्या खालच्या भागात असतात.त्यामुळे या घरगुती उपायांचा गळलेले केस परत उगवण्यासाठी कोणताही फायदा होत नाही.

त्याचप्रमाणे जर तुमच्या केसांची त्वचा खुप संवेदनशील असेल तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची आवशक्यताआहे.अंडे,मध आणि हेअर ऑईल वापरणे अशा त्वचेसाठी योग्य नाही.या गोष्टींच्या सततच्या वापरामुळे तुम्हाला केसांच्या त्वचेमध्ये दाह होण्याची शक्यता असते.

बेंगलोर मधील Dermstologist डॉ,शुभा धर्माना यांनी डॉ.नसवा यांच्या मताला दुजोरा देत असा सल्ला दिला आहे की, “केस गळण्यासोबत जर तुमच्या केसांची त्वचा कोरडी व लालसर असेल व त्यामध्ये खाज व वेदना होत असेल तर असे घरगुती उपाय केल्याने ही समस्या अधिक बळावू शकते.डॉक्टरांच्या मते असे घरगुती उपाय करुनही जर तुमचे ८० ते १०० केस दररोज गळत असतील तर तुम्ही तुमच्या Dermstologist  चा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.कारण तुमच्या केस गळण्याचे कारण तुमच्या शरारातील काही आरोग्य समस्या,हॉर्मोनल समस्या अथवा लोहाची कमतरता देखील असू शकते.त्यामुळे डॉ.शुभा यांच्या मते जर तुमच्या केसांची त्वचा निरोगी असेल व तुमच्या केसगळण्याचे कारण फक्त तुमच्या जीवनातील ताणतणाव असेल तरच तुम्ही घरगुती उपाय करणे योग्य असू शकते.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>