अनेक मुली दर महिन्याला फेशिअल करतात. चांगले सलोन आणि ब्युटीशिअन असतील तर फेशिअल करणे हा अनुभव आनंददायी, रिफ्रेशिंग आणि तुम्हांला तजेलदार करणारा ठरतो. मात्र दर महिन्याला फेशिअलवर हजारो रुपये उडवण्याआधी त्याच्या फायाद्यांप्रमाणे त्वचेला होणारे नुकसान जाणून घेणेही आवश्यक आहे.
Fortis Hospital Mumbai च्या Consultant Dermatologist डॉ. स्मृती नस्वा सिंग यांच्या सल्ल्यानुसार, दर महिन्याला फेशिअल करण्यापूर्वी नीट विचार करा. तसेच गरज असली तरच या पर्यायाची निवड करा. कारण फेशिअल नंतर चेहरा तजेलदार किंवा उजळलेला किंवा तरूण वाटत असला तरीही फेशिअल हा उपाय नसून ते एक गिमिक आहे. हे समजून घ्या.
महिन्याभरात एकापेक्षा अधिकवेळा फेशिअल केल्यास यामुळे चेहर्यांचे नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. अनेकदा लोकल पार्लरमधील मुलींना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने नेमका मसाज कसा करावा याबाबत त्यांना माहिती नसते. चूकीचा मसाज आणि स्क्रबिंग केल्याने डार्क स्पॉट्स वाढतात, त्वचेचे पिंगमेंटेशन अधिक वाढण्याची शक्यता असते.असा सल्ला डॉ. नस्वा देतात.
अनेकदा फेशिअल नंतर केवळ 1-2 दिवस त्वचेवर तजेला दिसतो. फेशिअलमधील मॉईश्चराईझिंग घटक चेहरा उजळवतात. फेशिअल करताना मसाज हा चेहर्याच्या खालच्या बाजूने वर पर्यंत करावा. मात्र यादरम्यान चेहर्यावर अतिप्रमाण दाब येणार नाही याची काळजी घ्या. याप्रमाणेच चेहर्यावरील ब्लॅकहेड काढताना अति प्रमाणात दाब देणे हेदेखील त्रासदायक ठरू शकते. ब्लॅकहेड काढण्यासाठी अति दाब दिल्यास बॅक्टेरिअल इंफेक्शन पसरून अॅक्नेचा त्रास अधिक वाढू शकतो.
अनेकदा फेशिअल चूकीच्या पद्धतीने केल्याने त्वचेला त्रास झाल्याचे, जखम झाल्याचे आढळून येते. तसेच प्रत्येक सलूनमध्ये वापरली जाणारी उपकरणं ही स्टरलाईझ असणं गरजेचे आहे. अन्यथा त्यामुळे इंफेक्शन अधिक वाढते.
बॅंगलोर स्थित डरमॅटोलोजिस्ट डॉ. शुभा धर्मना यांच्या म्हणनानुसार, फेशिअल अतिप्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने केल्याने अनेकांमध्ये त्वचेवर अॅक्ने ब्रेकआऊट्स वाढल्याचे, प्री मॅच्युअर स्क्रिन एजिंगचा त्रास वाढल्याच्या समस्या घेऊन आलेले रुग्ण आहेत. अनेकदा ब्युटीशियन त्यांच्या समोर आलेल्या क्लाएंटच्या त्वचेची पुरेशी तपासणी करत नाहीत. काही संवेदनशील त्वचेच्या लोकांमध्ये क्रीमची अॅलर्जिक रिअॅक्शन झाल्याने काही त्रास वाढतात. यासोबतच मसाज करायची पद्धत चूकीची असल्यास फेशिअल बुमरॅंग सारखे पलटून त्यामुळे त्वचेला फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock