Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

नैसर्गिक प्रसुतीनंतर योनीमार्ग शिथील होतो का?

$
0
0

लग्नानंतर पहिल्या बाळाची चाहूल लागताच तुमच्या घरातील सर्वांचाच आनंद द्विगुणीत होतो.पहीलेच गरोदरपण असल्याने मनात अनेक शंका निर्माण होतात.भविष्यातील सृदुढ प्रकृतीसाठी सी-सेक्शन पेक्षा नैसर्गिक व सुलभ प्रसुती चांगली असा सल्ला अनुभवी महिला देतात.मात्र अशावेळी नैसर्गिक प्रसुती नंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल दिसू लागतात.नैसर्गिक प्रसुतीमुळे योनीमार्ग सैल  किंवा शिथील पडतो का ? प्रसुतीनंतर पुर्ववत सेक्सचा आनंद मिळतो का ? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात

जाणून घेऊयात तज्ञांचे याबाबतीत काय मत आहे Head of the Department of Sexual Medicine at KEM Hospital चे डॉ.प्रकाश कोठारी यांच्या मते, ‘नैसर्गिक प्रसुतीनंतर योनीमार्ग सैल पडतो अथवा शिथिल होतो हे सत्य आहे.नैसर्गिक प्रसुतीमध्ये योनीमार्गातील स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणामुळे असे होणे स्वाभाविक आहे.मात्र यासाठी घाबरण्याचे काहीच कारण नाही.कारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.तसेच Kegel exercises मुळे योनीमार्ग पुर्ववत होण्यास मदत होते.’

किगल व्यायाम तुम्हाला सहज करता येतो.दिवसभरात तुम्ही हा व्यायाम कधीही करु शकता.हा व्यायाम करण्यासाठी मूत्रविर्सजन करताना मूत्रप्रवाह थोड्यावेळ आतमध्ये अर्ध्यावर रोखावा त्यामुळे योनीमार्गातील स्नायूंना मसाज होतो.डॉ.कोठारी यांच्या मते ‘वज्रोली मुद्रा केल्यानेही योनीमार्गातील स्नायूंना चांगला मसाज मिळतो.केगल मसाज व वज्रोली मुद्रा वरवर दिसायला सारख्याच असल्यातरी वज्रोली मुद्रेने अधिक चांगला परिणाम दिसून येतो.यासाठी प्रसुतीनंतर आठ आठवडे दररोज सकाळी वज्रोली मुद्रा कमीतकमी दहा वेळा करा.’ जाणून घ्या खूप दिवस सेक्स न केल्यास योनीमार्ग आकुंचित होतो का ?

वज्रोली मुद्रा कशी करावी?

डॉ.कोठारी यांच्या सल्ल्यानुसार वज्रोली मुद्रा करताना शांतपणे दिर्घ श्वास घ्या व तो थोडावेळ आत रोखा.श्वास रोखताना तुमची जननेद्रिंये आतल्या बाजूने ओढा.(किगल एक्सरसाईज मध्ये युरीन आत रोखून धरताना हीच स्थिती असते.)पुन्हा श्वास बाहेर सोडत पुर्वस्थितीत या.याच प्रमाणे पुन्हा दहा वेळा करा.आठ आठवडे ही मुद्रा केल्यास तुमची जननेद्रिंये पुर्ववत होतात.या दोन्ही व्यायामामुळे तुम्ही पुन्हा तुमच्या आयुष्यात सेक्सचा पुर्वीप्रमाणे आनंद उपभोगू शकाल.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>