Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दूर करा प्रोस्टेट कॅन्सर बाबतचे हे 6 गैरसमज

पुरूषांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक कॅन्सर म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. मात्र हा सुरवातीच्या टप्प्यावर ओळखणं कठीण असल्याने त्याचा धोका वाढवल्यावरच त्याचे संकेत मिळतात. अनेकांना वाटते की वयोवृद्ध लोकांमध्येच प्रोस्टेट कॅन्सर आढळून येतो. पण हा केवक गैरसमज आहे. प्रोस्टेट कॅन्सरबद्दलचे लोकांच्या मनातील असेच काही समज -गैरसमज Medical Oncology, Cytecare चे  Senior Consultant डॉ प्रसाद नारायणन यांनी दिला आहे.

#1: मी अजून पन्नाशीत पोहचलो नाही. मग मलाही प्रोस्टेट कॅन्सरचा धोका आहे का?

तथ्य : प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण हे प्रामुख्याने 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील असतात. मात्र हा त्रास 35-45 वयोगटातील लोकांमध्येही आढळून येऊ शकतो. अनेकांमध्ये   PSA test झाल्यानंतरच अंतिम टप्प्यात पोहचलेला कॅन्सर आढळतो. अनेकदा कॅन्सरची वाढ होत असूनही मुत्रविसर्जनाच्या वेळेस त्रास, जळजळ किंवा वेदना असा त्रास होत नाही. म्हणूनच त्याचे निदान खूप उशिरा आणि अंतिम टप्प्यात पोहचल्यावर होते.

#2: मला प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं आढळत नाहीत.म्हणजे मला चिंता करायची गरज नाही.

हा एक गैरसमज प्रामुख्याने पुरूषांमध्ये आढळतो. इतर कॅन्सरप्रमाणेच प्रोस्टेट कॅन्सरही सुरवातीच्या टप्प्यांत कोणतीच ठळक लक्षण दाखवत नाही. सुरवातीच्या टप्प्यांत फारच सौम्य प्रमाणात त्रास होतो. पाठीजवळ  खालच्या बाजूला वेदना जाणवण्यासारखी लक्षणं दिसतात.

#3: सेक्सश्युअली अधिक अ‍ॅक्टीव्ह असल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो.

सेक्श्युअल लाईफवर प्रोस्टेट कॅन्सर मूळीच अवलंबून नसतो. किती वेळ किंवा तुम्ही कोणत्या वयापर्यंत सेक्सचा अनुभव घेताय यावर प्रोस्टेट कॅन्सरचा धोका मूळीच अवलंबून नसतो.

#4 : प्रोस्टेट कॅन्सर प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांमध्ये आढळतो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रोस्टेट कॅन्सर हा भारतात विरळ आढळत होता. मात्र आता हे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. येत्या २०२० पर्यंत प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांच्या प्रमाणात दुप्पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई बॅंगलोर सारख्या शहरात आढळण्यार्‍या कॅन्सरच्या वेगवेगळ्या प्रकारात प्रोस्टेट कॅन्सर हा तिसर्‍या क्रमाकांवर आहे. तर दिल्ली, कोलकत्ता, पुणं. तिरुअनंतपुरम येथे दुसर्‍या क्रमाकांवर आढळतो.

#5:डाएट आणि लाईफस्टाईलचा प्रोस्टेट कॅन्सरशी संबंध नाही.  

खाण्याच्या किंवा जीवनशैलीतील सवयींचा प्रोस्टेट कॅन्सरवर कोणताही परिणाम नसतो. ताजी फळं आणि भाज्या खाणार्‍यांमध्ये हा धोका 35% कमी असतो. कमीत कमी कार्बोहायड्रेट्स, टॉमेटो आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आहारात असल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा धोका आणि वाढ इतरांच्या तुलनेत कमी होतो. हळदीतील क्युरक्युमिन घटकही कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतो. योग्य व्यायामानेदेखील कॅन्सरचा धोका आटोक्यात ठेवता येतो.

#6 माझी PSA पातळी अधिक आहे, म्हणजे मला प्रोस्टेट कॅन्सरचा धोका आहे का ?

वयानुसार PSA पातळी देखील वाढते. कॅन्सर व्यतिरिक्तदेखील शरीरातील PSA पातळी वाढू शकते. अनेकदा युरीनरी ट्र्क इन्फेंक्शन, प्रोस्टेटजवळ होणारी जळजळ यामुळेदेखील त्रास होऊ शकतो. म्हणूनच खात्री करून घेण्यासाठी बायोप्सी करणं गरजेचे असते.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>