Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्रेगन्सीमध्ये चक्कर येण्याची कारणंं आणि उपाय

$
0
0

प्रेगन्सीमध्ये चक्कर येणे हे सामान्य आहे.गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत किंवा कधीकधी संपूर्ण गरोदरपणात चक्कर येण्याची समस्या जाणवते. मुंबईतील Cloudnine Hospital च्या Consultant Gynaecologist and obstetrician डॉ.मेघना सरवैया यांच्या मते,’प्रेगन्सी मध्ये होणा-या हॉर्मोन्सच्या बदलामुळे व सतत बदलणा-या रक्तदाबामुळे गरोदर महीलांना चक्कर येते.त्याचप्रमाणे गरोदर महीलेचा रक्तदाब कमी असणे हे देखील चक्कर येण्यामागचे एक कारण असू शकते.जर गरोदर महिलांना प्रेगन्सीच्या पाचव्या महीन्यानंतरही वारंवार चक्कर येत असेल तर त्याचे कारण हायपरटेंशन असण्याची शक्यता आहे.’

चक्कर आणि रक्तदाबातील होणारे बदल-

प्रेगन्सीमध्ये शरीरातील कार्डिओ वैस्क्युलर सिस्टीममध्ये बदल होतात.गरोदरपणात रक्तवाहीन्यांमध्ये काही ठराविक बदल होतात ज्यामुळे बाळाला पुरेसे पोषणमुल्य व रक्ताचा पुरवठा होतो.स्त्रीच्या ह्रदयाचे ठोके वाढतात.रक्ताचे प्रमाण देखील बाळाच्या व आईच्या पोषणासाठी दुप्पट होते. ह्रदयाला नेहमापेक्षा अधिक रक्त पंप करावे लागते.सहाजिकच या कारणांमुळे नसांमधून रक्ताच्या वाहण्याची गती मंदावते व रक्तदाब कमी होतो. जाणून घ्या गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत

डॉ.सरवैया यांच्या मते प्रेगन्सीमध्ये कधीकधी जर रक्तदाब खुपच कमी झाला तर तो इलेक्ट्रोलाईट बॅलन्सच्या आधाराने पुन्हा संतुलित करण्यात येतो.

स्त्रीच्या या नैसर्गिक बदलांना सामोरे जाण्यास तीचे ह्रदय व मेंदू सक्षम असले तरी या परिस्थितीसोबत लगेच जुळवून घेण्यास या अवयवांना थोडा वेळ लागतो ज्यामुळे त्या स्त्रीला चक्कर येण्याचा त्रास होतो.

कधीकधी पहिल्या तिमाही नंतर शरीराला या बदलांची सवय होते रक्तदाब पुर्ववत होऊ लागतो.मात्र कधीकधीतर गरोदर महीलांना या समस्येला संपुर्ण गरोदरपणात तोंड द्यावे लागते.शहरी भागातील गरोदर महीलांना हायपरटेंशन मुळे पाचव्या महीन्यानंतर देखील हा त्रास जाणवतो.चक्कर येण्यामागची  कारणे हायपरटेंशन ची फॅमिली हिस्ट्री,मल्टिपल प्रेगन्सी किंवा IVF गर्भधारणा असू शकतात. जाणून घ्या IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणेसाठी काय कराल ?

डॉ.सरवैया यांनी दिलेल्या माहीतीनूसार गरोदरपणात चक्कर येण्याचे कारण उच्च रक्तदाब किंवा preeclampsiaमुळे बाळ लहान असणे,गर्भाशयात रक्तस्त्राव अथवा प्रसुतीपुर्व कळा येणे असू शकते.

गरोदरपणात तुम्हाला वारंवार चक्कर येण्याची समस्या असेल तर यासाठी तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन नियमित रक्तदाब तपासणे गरजेचे आहे.

प्रेगन्सीमधील चक्कर येण्याच्या समस्येवर उपाययोजना-

१. तुम्ही जेव्हा खाली बसता त्यावेळी तुमच्या शरीरातील रक्त पाय व शरीराच्या खालील भागात जमा होते.पण गरोदरपणी तुम्ही अचानक उठला तर रक्त ह्रदय व मेंदूला पोहचण्यास थोडा विलंब होतो व तुम्हाला चक्कर येते.यासाठी उठताना घाई करु नका हळूवार पणे उठा.

२. याच प्रमाणे जास्त वेळ उभे राहील्यास देखील चक्कर येण्याची शक्यता असते.यासाठी जास्त वेळ उभे राहणे टाळा.अशा परिस्थिती बसणे शक्य नसल्यास उभे राहण्यापेक्षा थोडा वेळ फे-या मारा. हे नक्की वाचा गरोदरपणात पोटदुखीच्या त्रासाची कधी घ्यावी गंभीर दखल

३. प्रेगन्सीच्या दुस-या व तिस-या तिमाही मध्ये पाठीवर झोपणे टाळा.गर्भाशयाच्या वाढीमुळे ह्रदय,फुफ्फुसे आणि किडनीवर अतिरिक्त ताण येत असतो.त्यामुळे रक्तप्रवाहाची गती कमी होते.या अवस्थेत अचानक उठल्यामुळे चक्कर येण्याची व पडण्याची भिती असते.म्हणून गर्भवती महीलांना कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो.

४. प्रेगन्सीमध्ये जास्त वेळ उपाशी राहील्यास किंवा पाणी कमी प्रमाणात घेतल्यास चक्कर येण्याची शक्यता अधिक असते.चक्कर येणे टाळण्यासाठी दररोज आठ ग्लास पाणी प्या व ठराविक वेळेत काहीतरी पौष्टीक खात रहा.

५. गरोदरपणातील अशक्तपणामुळेही चक्कर येणे शक्य आहे.यासाठी नियमित तुमची आर्यन कॅप्सुल घ्या.तसेच आहारात पालक,मेथी व बीट सारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. हे नक्की वाचा Morning Sickness तुमच्या बाळासाठी धोकादायक ठरु शकते का ?

६. चक्कर येण्याचा त्रास कमी करण्यासाठी वजन उचलणे किंवा अती व्यायामासारखे श्रम व ताण आणणारे काम करणे टाळा.अती घट्ट कपडे घातल्याने,सोनाबाथ किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्याने देखील शरीरात उष्णता निर्माण होऊन चक्कर येण्याची शक्यता असते.यासाठी गरोदरपणात या गोष्टींपासून दूर रहा.

चक्कर येत असल्यास डॉक्टर कडे कधी जावे-

गरोदरपणी चक्कर येणे स्वाभाविक आहे.मात्र जर चक्कर येण्यासोबत तुम्हाला अंधूक दिसत असेल,ओटीपोटात दुखत असेल,बोलण्यास त्रास होत असेल,छातीत दुखत असेल,योनीमार्गातून रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. हे नक्की वाचा या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या

चक्कर आल्यास काय काळजी घ्याल-

घराबाहेर असताना तुम्हाला चक्कर येत असेल आणि तुमच्या मदतीसाठी कोणीही जवळ नसेल तर काळजी करु नका.

प्रथम खाली बसा व शांतपणे दीर्घ श्वास घ्या.जमल्यास साखर व मीठाचे पाणी घ्या.जर तुम्ही बराच वेळ काही खाल्ले नसेल तर सफरचंद किंवा पियर सारखे एखादे फळ खा.थोडा वेळाने बरे वाटू लागल्यास तुमच्या घरातील किंवा मित्रमंडळीपैकी कोणाला तरी फोन करुन तुम्हाला घरी अथवा सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी सांगा. जाणून घ्या हे ’5′ पदार्थ हेल्दी असले तरीही गरोदरपणात खाताना काळजी घ्या !

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>