रोजच्या स्वयंपाकात आपण डाळ,भाजी किंवा खिचडी करताना फोडणी मध्ये हिंग वापरतो.हिंगाच्या फोडणीमुळे त्या खाद्यपदार्थांना एक खमंग स्वाद येतो.अर्थातच खमंगपणामुळे त्या खाद्यपदार्थांची रुची वाढते.हिंग या मसाल्याच्या पदार्थांमुळे अन्नाला जसा सुगंध येतो त्याचप्रमाणे अन्नामधील पोषणमूल्य देखील वाढतात.हिंगाचा आपल्या आरोग्यावर चांगला फायदा होतो.त्यामुळे स्वयंपाकात हिंगाचा वापर जरुर करा.
स्वयंपाकात हिंग वापरण्याचे फायदे-
१. अन्नाचे पचन होण्यास मदत होते
खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन व्हावे यासाठी प्राचीन काळापासून स्वयंपाकात हिंगाचा वापर करण्यात येतो.हिंगामधील अॅन्टी इनफ्लेमटरी व अॅन्टी ऑक्सीडंट्स मुळे पोट बिघडणे,एसिडीटी,पोटातील जंत तसेच इरिटेबल बोवल सिन्ड्रोम(irritable bowel syndrome)या विकारांपासून आराम मिळतो. जाणून घ्या पचन सुधारायला मदत करतील हे ’4′ पदार्थ
२. महिलांच्या समस्येवर लाभादायक-
हिंगामधील अॅन्टी इनफ्लेमटरी मुळे महिलांच्या अनियमित पाळी,पोटात व पाठीत क्रॅम्प येणे,वेदना या मासिक पाळीतील अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो.तसेच candida infection आणि leucorrhoea (योनीमार्गातून पांढरा अथवा पिवळा चिकट स्त्राव बाहेर पडणे) यासारखे विकार बरे होण्यास मदत होते.
३. पुरुषांमधील सेक्स विकार बरे होतात-
पुरुषांमधील नपूसंकता,शुक्राणूंबाबत असलेल्या समस्या,शीघ्रपतन या सारख्या सेक्स मधील समस्येवर हिंगाचा वापर लाभदायक ठरतो.एक चिमुट हिंग एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पुरुषांमधील रक्त प्रवाह सुधारतो ज्यामुळे कामवासना (लिबीडो) वाढण्यास मदत होते.
४. श्वासाच्या समस्या दूर होतात-
हिंगामुळे कफ कमी होतो.ज्यामुळे छातीतील रक्तपुरवठा सुरळीत होतो.कोरडा खोकला,डांग्या खोकला अथवा ब्रॉंकायटिस वर हिंग,मध व आल्याचे मिश्रण घेतल्यास आराम मिळतो.
५. रक्तातील साखरेचे प्रमाण होते-
जर तुम्हाला मधूमेह असेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकात हिंगाचा वापर जरुर करा.कारण हिंग एन्टी डायबेटीक आहे.हिंगामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. हे नक्की वाचा ‘हळदी’ने ठेवा रक्तातील साखर नियंत्रणात !
६. उच्च रक्तदाबावर नियंत्रण येते-
हिंगामधील कोमरिन्स(coumarins)या घटकांमुळे रक्त पुरेश्या प्रमाणात पातळ राहते ज्यामुळे गुठळ्या होत नाही व रक्तप्रवाह सुधारतो.हिंगामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराईडचे प्रमाण कमी होते.ज्यामुळे हायपरटेंशनचा धोका कमी होतो. जाणून घ्या लिंबू – रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा उत्तम घरगुती उपाय !
८. वेदनेमध्ये आराम मिळतो-
हिंगामुळे मासिक पाळी,दातदुखी,मायग्रेन मधील वेदना कमी होतात.हिंगांमध्ये एन्टी ऑस्किडेंट आणि वेदनांपासून आराम देणारे घटक असतात.वेदना होत असल्यास एक चिमुट हिंग कोमट पाण्यात मिसळून प्या.दात दुखत असल्यास हिंग व लिंबाचे मिश्रण दातांवर लावा.
९. कर्करोगाचा धोका कमी होतो-
हिंगामध्ये एन्टी ऑस्किडेंट घटक असतात.स्वयंपाकात हिंगाच्या नियमित वापराने फ्री-रेडीकल्सपासून शरीरातील पेशींचे संरक्षण होते.त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.हिंगातील घटक कर्करोगाच्या जिवाणूंच्या वाढीला विरोध करतात. हे जाणून घ्या पुरूषांनो ! या ’10′ कॅन्सरचा धोका तुम्हांला स्त्रियांपेक्षा अधिक
१०. त्वचेच्या समस्या दूर होतात-
हिंगांमध्ये एन्टी इनफ्लेमेटरी हा घटक मोठ्या प्रमाणावर असतो.ज्याचा वापर स्कीन केअर प्रोडक्टस मध्ये देखील केला जातो.ज्यामुळे त्वचा भाजण्याच्या व कॉर्न सारख्या समस्या ब-या होतात.हिंगामुळे त्वचारोगातील जिवाणूंचा नाश होतो व त्वचेला थंडावा मिळतो.
हिंगाचा वापर कसा कराल-
- एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा हिंग पावडर मिसळा व हे पाणी रिकाम्या पोटी घ्या.
- २-३ हिंगाचे खडे अथवा हिंग पावडर ताकात मिसळा व प्या.
- एक कप गरम पाण्यात एक चमचा हिंग पावडर मिसळा.या मिश्रणात एक सुती रुमाल भिजवून त्याचा शेक दुख-या भागावर द्या.
- निरोगी आयुष्यासाठी व स्वादिष्ठ अन्नासाठी दररोज स्वयंपाकात हिंगाचा वापर करा.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock