Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

फाऊंडेशनचा वापर करताना या ’4′चूका टाळा ‍!

$
0
0

मेकअप करताना फाऊंडेशनचा वापर आवर्जून केला जातो. तुम्ही बाजारातून कितीही चांगल्या प्रतीचे फाऊंडेशन विकत घेतले तरीही त्याचा वापर चूकीच्या पद्धतीने केल्यास त्वचेचे नुकसान होते. केवळ चेहर्‍यावरील डाग लपवण्यासाठी योग्य प्रमाणात फाऊंडेशनचा वापर कसा करावा हे जाणून घेण्यासाठी Marvie Ann Beck Academy च्या ब्युटी एक्सपर्ट नंदिनी अग्रवाल यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.   

  • चूकीचे प्रमाण - शुष्क त्वचेच्या लोकांमधील चेहर्‍यावरील छिद्रांमध्ये फाऊंडेशन पावडर / लिक्विड अ‍डकून राहते.  तसेच त्वचा तेलकट असल्यास फाऊंडेशन फारच ओलसर वाटते. चेहर्‍यावर फाऊंडेशन लावताना ते चेहर्‍यावर थापल्यासारखे नसावे. चेहर्‍याच्या रंगाशी आणि पोतासोबत ते मिळतेजुळते असावे. नक्की वाचा : तुमच्या त्वचेनुसार कसे निवडावे फाऊंडेशन ?
  • चेहर्‍यावर सर्वत्र समप्रमाणात फाऊंडेशन पसरवणे - चेहर्‍यावर फाऊंडेशन जाडसर स्तराप्रमाणे लावल्यास यामुळे मेकअप खूप हेव्ही वाटतो. फाऊंडेशन नीट मिसळून त्याचे काही थेंब चेहर्‍यावर केवळ आवश्यक अशा ठिकाणी योग्य प्रमाणात लावावे.
  • स्पॉट कव्हर करण्यासाठी खूप फाऊंडेशन वापरणे - चेहर्‍यावरील रंगाची  असमानता, फाईन लाईन आणि डाग कमी करण्यासाठी त्याजागी खूप प्रमाणात फाऊंडेशन लावणे या टाळा. कारण यामुळे त्या जागेवरील मेकअप हेव्ही होतो आणि अधिक लक्ष खेचले जाते. फाईन लाईन्स आणि डिसकलरेशनचा त्रास कमी करण्यासाठी प्रायमर्स आणि हाईलाईटर्सचा वापर करा.
  • फाऊंडेशनचा रंग  तुमच्या चेहर्‍यापेक्षा हलका असणे  - फाऊंडेशनची निवड करताना त्याचा रंग़ तुमच्या त्वचेच्या रंगाप्रमाणेच असावा. त्यापेक्षा हलका असू नये. फाऊंडेशनची निवड करताना तुमच्या हनुवटीशी आणि जबड्याशी मिळतीजुळती शेड निवडा. हाताच्या, मनगटाच्या रंगावरून फाऊंडेशन निवडणे चूकीचे आहे.

फाऊंडेशन लावताना ते चेहरा स्वच्छ करून मगच लावावे. त्यानंतर फिनिशिंग करण्यासाठी पावडरचा वापर करा.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>