Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

धुम्रपानाची सवय सोडल्यानंतर पुढील 20 मिनिटंं ते वर्षभराच्या काळात शरीरात होतात हे बदल !

$
0
0
एखादी वाईट सवय अथवा व्यसन लागते पटकन पण ती सोडणे मात्र तसे खुपच कठीण असते.धुम्रपान करणे शरीरासाठी हानिकारक असून त्यामुळे कर्करोगासारखे भयंकर आजार होतात हे माहीत असूनही अनेक लोक धुम्रपानाचे बळी ठरतात.धुम्रपानाचे व्यसन सोडणे शक्य असले तरी हे व्यसन सोडताना सुरवातीला जवळजवळ ७२ तास त्या व्यक्तीसाठी खूप कठीण असतात.कारण या काळात धुम्रपान सोडताना त्याच्या शरीरामध्ये अनेक बदल दिसू लागतात. जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेटंरचे Consultant ENT head and neck surgeon Dr Dilon Dsouza यांच्या मते स्मोकींग सोडताना शरीरात नेमके काय बदल होतात ते जाणून घेऊयात.
२० मिनीटे
जेव्हा तुम्ही स्मोक करता तुमचे ह्रदय जोरात रक्त पंप करु लागते ज्यामुळे सहाजिकच स्मोकींग करताना तुमचे ह्रदयाचे ठोके वाढतात.पण जेव्हा तुम्ही धुम्रपान करणे सोडून देता पहिल्या २० मिनीटांमध्ये तुमचे ह्रदयाचे ठोके पुर्ववत होतात.धुम्रपान करणे सोडल्याचे हे प्रमुख लक्षण आहे.
६० मिनीटे
स्मोकींग करणे सोडल्यानंतर एक तासाने तुमचे ह्रदयाचे ठोके व रक्तदाब पुर्ववत होण्यास मदत होते.रक्ताभिसरण सुधारल्याने हात व पायाची बोटे देखील उबदार होतात.मात्र या कालवधीत कधीकधी थकवा किंवा ताण जाणवतो.तसेच खूप भूक लागते,नेहमी पेक्षा भूक लागण्याचे प्रमाण वाढते किंवा थकल्यामुळे झोपून रहावेसे देखील वाटते. जाणून घ्या मैत्री, प्रेम आणि सिगारेट … , पण प्रेमात खरचं सारं माफ असतं ?
१२ तास
स्मोकींग सोडल्यानंतर धुम्रपानाच्या प्रत्येक पफ सोबत शरीरात जाणा-या कार्बन मोनोक्साईडचे प्रमाण कमी होते.त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळू लागतो.पण कार्बन मोनोक्साईड ची पातळी अचानक कमी होत ऑक्सिजनची पातळी हळूहळू वाढू लागल्याने जो बदल शरीरात जाणवतो त्याबाबत थोडे सावध राहणे गरजेचे असते. हे नक्की वाचा #सेक्स टीप 1 – उत्तम सेक्स लाईफसाठी धुम्रपान सोडा !
२४ तास
धुम्रपान सोडल्यानंतर २४ तास झाल्यावर शरीरात सकारात्मक बदल जाणवतात.या कालावधीत ह्रदयविकाराचा तीव्र झटका येण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी होते.तर ह्रदयविकार होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांहून ६० टक्क्यांवर घसरते.रक्तप्रवाह पुर्वीपेक्षा सुधारतो व रक्तातील विषद्रव्ये(टॉक्सिन्स) हळूहळू बाहेर टाकण्यास सुरुवात होते त्यामुळे तुमची शरीर प्रकृती हळूहळू सुधारु लागते.
४८ तास
दोन दिवसांनी तुमच्या वास घेणे व चव घेण्याच्या क्षमतेत वाढ होते.गंध व चव व्यवस्थित समजू लागल्याने खाण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते.त्यामुळे तुम्ही पुर्वीप्रमाणे कोणतेही पदार्थ आनंदाने व आवडीने खाऊ लागता. हे नक्की वाचा तुमची मुलं लपून सिगारेट, ड्रग्ज घेतात का ? हे ओळखण्याचे ’9′ संकेत
७२ तास
धुम्रपान सोडल्यानंतर ७२ तासांनी एक कठीण पण महत्वाचा टप्पा सुरु होतो.जिथे तुमच्या शरीरातील निकोटीनचे प्रमाण कमी होत असल्याने डोकेदुखी,मळमळ,अंगात थंडी भरणे,क्रॅप येणे असे बदल शरीरात जाणवू लागतात.काही जणांना थकवा,चिडचिड किंवा नैराश्य अश्या समस्येला देखील तोंड द्यावे लागते.
३ आठवडे
धुम्रपान सोडल्याच्या तीन आठवडयांनी किंवा २१ दिवसांनी तुमचे रक्ताभिसरण पुर्वीप्रमाणे सुरळीत होते.ज्यामुळे तुम्हाला अधिक उत्साही व फ्रेश वाटते.शरीरातील कफ बाहेर टाकला जाऊन फुफ्फुसे व श्वसनक्रिया पुर्ववत होण्यास मदत होते. जाणून घ्या धुम्रपानामुळे होतात सेक्सलाईफवर गंभीर परिणाम !
१ महिना
एक महीना पुर्ण झाल्यावर तुमच्या शरीरात धुम्रपानामुळे झालेले नुकसान हळूहळू भरुन निघू लागते.या कालावधीत कफाद्वारे विषद्रव्ये पुर्णपणे बाहेर टाकली गेल्याने कफ बाहेर निघण्याचे प्रमाण देखील कमी होत जाते.ज्यामुळे फुफ्फुसांचे कार्य अधिक चांगल्या रितीने होते.
१२ महिने
धुम्रपान सोडणे हे कठीण जरी असले तरी जर तुम्ही पुर्ण एक वर्ष धुम्रपान  करणे टाळू शकलात तर तुमच्या शरीरात चांगले बदल दिसून येतात.या कालावधीत शरीरातील सर्वच भागातील टॉक्सिन्स बाहेर टाकली गेल्याने तुमचे रक्ताभिसरण सुधारते.धुम्रपानामुळे शरीरात झालेले बिघाड पुर्णपणे सुधारण्यास अजून काही वर्षे लागणार असली तरी धुम्रपानामुळे होणारा ह्रदयविकारांचा धोका या कालावधीत ५० टक्क्यांनी कमी होतो.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>