Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सर्दीमध्ये मुलांना आबंट फळे देणे योग्य आहे का ?

$
0
0

ऋतुमानानुसार होणारे बदल आजारपणांना आमंत्रण देतात.हिवाळ्यात सर्दी,खोकला या सारख्या संसर्गजन्य आजाराच्या समस्या जास्त प्रमाणात आढळतात.सर्दी खोकला झाल्यास मोठयांनाही तो त्रास सहन होत नाही तर लहान मुलांची काय अवस्था असणार.अचानक होणा-या या सर्दी आणि कफाच्या समस्येने बिचारी लहान मुले तर अगदी बेजार होतात.अशा आजारपणात मुल व्यवस्थित जेवत देखील नाहीत.त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.खरतर अशावेळी मुलांच्या पोषणाची योग्य काळजी घेणे गरजेचे असते.सर्दी-खोकला झाल्यास आबंट फळे अथवा केळी खाऊ नयेत असे ब-याचदा सांगण्यात येते. असे करणे योग्य आहे की अयोग्य हे जाणून घेऊयात थेट  तज्ञांकडून. जाणून घ्या कशी वाढवाल तुमची रोगप्रतिकारशक्ती ?

मुंबईमधील Senior Physician डॉ.कृष्णकांत देबरी यांच्या मते, ‘अनेक पालकांना असे वाटते की केळं किंवा संत्री,लिंबु खाल्याने सर्दी-खोकला बळावतो पण हा पुर्ण पणे चुकीचा समज आहे.ब-याचदा अशावेळी तज्ञ पालकांना मुलांना विटॅमिन-सी असलेली फळे खाण्यास द्या असा सल्ला देतात.केळ्यामध्ये अधिक प्रमाणात मिनरल्स असतात.त्यामुळे ती पचनासाठी उपयुक्त असतात.त्याचप्रमाणे केळ्यामुळे मुलांमधील रोग प्रतिकारशक्ती(इम्युनिटी) वाढते ज्यामुळे मुले लवकर बरी होतात.’ जाणून घ्या घरच्या घरी मिळवा सर्दी – खोकल्यापासून आराम !

केळी

केळ्यामध्ये पोटॅशियम व पाण्याचे प्रमाण भरपुर आहे.तसेच केळ्यामध्ये इलेक्ट्रोलाईटस् असतात ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस व द्रवपदार्थांचे सतुंलन राखण्यास मदत होते.सर्दी-तापात झालेली शरीरातील मिनरल्सची झीज केळी खाल्याने भरुन निघते.एका केळ्यामध्ये १०५ कॅलरिज असतात.त्यामुळे केळं खाल्यास शरीराला त्वरीत उर्जा मिळते. जाणून घ्या कफाचा त्रास दूर करेल खडीसारखेचे तुकडे !

आबंट फळे

आंबट फळांमधील विटॅमिन-सी अँन्टीव्हायरल चे कार्य करतात व त्यामुळे मुले आजारपणातून लवकर बरी होतात.संत्री,लिंबु यांसारख्या आबंटफळांमधील अँन्टीऑक्सिडेंट शरीरातील टॉक्सिन्स(विषद्रव्ये)बाहेर टाकण्यास मदत करतात.ज्यामुळे सर्दी-खोकला आपोआप बरा होतो. हे नक्की वाचा पित्ताच्या त्रासामध्ये ‘आंबट फळं’ खाणं अधिक त्रासदायक ठरतात का ?

सर्दी,खोकला किंवा ताप आल्यास मुले लवकर बरी व्हावीत व त्यांना अशक्तपणा येऊ नये यासाठी त्यांच्या शरीरातील विटॅमिन्स व मिनरल्स चे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. याचा अर्थ असा नव्हे की मुलांच्या सर्दीखोकल्यावर फक्त असे घरगुती उपाय करीत बसा.तर त्यांना लवकर आराम मिळावा यासाठी केळी,संत्री व लिंबु सोबत पोषक आहार व औषधे देखील द्या.  

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>