हसणारी- खेळणारी व्यक्ती अचानक हृद्यविकाराच्या झटक्याने जगातून कायमची निघून जाते अशा अनेक बातम्यांनी आपले मन अनेकदा विषण्ण होते. मात्र धकाधकीच्या जीवनात लहान वयातच हृद्यविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही वाढले आहे. मग लहान मुलांचा मृत्यूही हार्ट अटॅकने होऊ शकतो का ? हे जाणून घेण्यासाठी Asian Heart Institute, Mumbai च्या Head Department of Cardiology, चे Senior Interventional Cardiologist, डॉ तिलक सुवर्णा यांचा हा सल्ला नक्की जाणून घ्या.
लहान मुलांनाही हृद्यविकाराचा झटक येऊ शकतो. मात्र हा प्रकार फारच क्वचित आढळतो. प्रौढांप्रमाणे, खाण्याच्या चूकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव यामुळे congenital abnormality चा त्रास निंर्माण होतो. हा त्रास जन्मजातही असू शकतो. हृद्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा हृद्यामध्ये काही दोष असल्यास हार्ट अटॅकचा धोका असतो. काही मुलांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असल्यास genetic predisposition चा त्रास होऊ शकतो. मुलांमध्ये ही समस्या असल्यास ती प्रामुख्याने अति लठ्ठ किंवा बारीक असतात. काही जेनिटीक दोषांमुळे शरीरात कोलेस्ट्रेरॉल साचून राहण्याचे प्रमाण वाढते. वेळीच या समस्येवर लक्ष न दिल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास लहान मुलांमध्येही हृद्यविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.
लहान मुलांमधील लठ्ठपणाची समस्या हार्ट अटॅकचा धोका वाढवतात. मात्र हा लहानपणी न येता जसेजसे ते मोठे होतात तसा हा त्रास वाढतो. लहान मुलांमध्ये आजकाल घरच्या घरी खेळणे, उठता-बसता जंक फूड खाण्याची सवय यामुळे हा धोका अधिक वाढतो. म्हणूनच मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे. तसेच ज्या घरामध्ये कार्डियोव्हसक्युलर समस्या, स्ट्रोक, अशा समस्यांची पार्श्वभूमी असल्यास मुलांना कमी वयात हृद्यविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. म्हणूनच लहान मुलांच्या लठ्ठपनाकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलांना दम लागत असल्यास, छातीत दुखण्याचा त्रास असेल तर कदाचित हार्ट प्रॉब्लेम वाढत असल्याचे हे संकेत आहे.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock