Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अवयवदानाबाबत हे ’23′प्रश्न आजच तुमच्या मनातून दूर करा !

$
0
0

अवयवदानामुळे मरणानंतर अवयव स्वरूपात जीवंत राहण्याप्रमाणेच गरजूंच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्याची संधी आपल्याला मिळते. पण आपल्या समाजात अवयवदानाबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने अनेक गरजूंना उपचाराभावी आपला जीव गमवावा लागतो. पण तुमच्या मनातही अवयवदान करण्याची इच्छा असूनही मनातील काही किंतू-परंतूंंमुळे ते शक्य नसल्यास हे ’23′ गैरसमज आजच दूर करा !

१. अवयव दान म्हणजे नेमके काय?

अवयव दान ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एखादी जीवंत व्यक्ती(एखाद्या दुर्मिळ परिस्थितीमध्ये) किंवा मृत व्यक्ती(त्याचा मृत्यूपुर्वी) त्याच्या इच्छेनुसार त्याच्या शरीरातील अवयव दान करुन इतरांना जीवदान देते.दान केलेले अवयव त्यानंतर एखाद्या गरजू रुग्णाच्या शरीरात ट्रान्सप्लान्ट केले जातात. जाणून घ्या ‘अवयवदान एक महादान’

२. अवयव दान कसे करावे?

तुम्ही तुमचे अवयव दान करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा एखाद्या हॉस्पिटल अथवा सामाजिक संस्थेमध्ये(एन.जी.ओ.)तुमची नावनोंदणी करु शकता.

३. मृत्यू पश्चात अवयव दान कसे करतात?

मृत्यूनंतर अवयव दान करण्यासाठी आधीच अवयवदाना साठी नाव रजिस्टर करावे लागते.एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे नातेवाईक त्याच्या शरीरातील अवयव दान करतात.

४. अवयव दाना विषयी कुटूंबातील व्यक्तींना विश्वासात घेणे गरजेचे आहे का?

अवयव दाना विषयी तुमचे कुटूंब अथवा नातेवाईक यांना माहित असणे गरजेचे असते.कारण त्यांच्या परवानगी शिवाय अवयव दानाची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही.

५. लहान मुले अवयव दान करु शकतात का?

अर्भकापासून ते १०० वयाच्या वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही अवयव किंवा पेशींचे दान करु शकतात.मात्र हे त्यावेळी त्यांच्या शरीरातील अवयव दान करण्यासाठी कितपत योग्य आहेत यावर अवलंबून आहे. हे नक्की वाचा दूर करा ‘अवयवदाना‘ संबंधीचे हे ५ गैरसमज

६. जर एखादी व्यक्ती मद्यपान करीत असेल तर ती व्यक्ती अवयव दान करु शकते का?

मद्यपान करणा-या व्यक्तींना त्यांच्या काही अवयवांचे दान जरी करता नाही आले तरी ते डोळे किंवा त्वचा दान करु शकतात.मात्र हे त्यावेळी त्यांच्या काही तपासण्या करुन ठरवण्यात येते.

७. एखाद्या व्यक्तीला एडस् किंवा एखादा गंभीर आजार असेल तर ती व्यक्ती अवयव दान करु शकते का?

अशा वेळी डॉक्टर त्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासतात,तसेच इतर काही शरीरिक तपासण्या करतात.त्यानंतरच त्याचे अवयव दान करण्यासाठी योग्य आहेत का हे ठरवण्यात येते.

८. कुटूंबातील व्यक्ती अवयव दान करु शकते का?

प्रत्येकवेळी असे करता येत नाही.मात्र जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि ती व्यक्ती ब्रेनडेड घोषीत करण्यात आली.तर अशावेळी कुटूंबातील सदस्य अवयव दानाचा निर्णय घेऊ शकतात.

९. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दान करता येतात का?

असे करता येते मात्र त्यासाठी लवकर निर्णय घेणे आवश्यक असते.ती व्यक्ती वेंटीलेटरवर असतानाच हा निर्णय घ्यावा लागतो.कारण मृत्यूनंतर काही ठराविक वेळेतच अवयव दान करता येणे शक्य असते.

१०. ब्रेनडेड व्यक्तीचे अवयव दान केल्यानंतर जर ती व्यक्ती पुन्हा शुद्धीवर आली तर काय करतात?

कोमा मध्ये गेलेली व्यक्ती परत पुर्ववत होते मात्र ब्रेनडेड मध्ये असे घडणे शक्य नसते.कारण ब्रेनडेड व्यक्तीचा मेंदू पुर्णपणे निकामी झाल्याने त्या व्यक्तीचा जवळजवळ मृत्यूच झालेला असतो.

११. अवदान करण्यासाठी पैसे द्यावे लागते का?

अवयव दान विनामुल्य दान आहे.या दानासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही.यासाठी फक्त तुम्ही तुमचे नाव अवयव दान करणा-या संस्थांमध्ये रजिस्टर करणे आवश्यक असते.

१२. कोणते अवयव दान केले जातात?

एखादी व्यक्ती तिचे ह्रदय,यकृत,मूत्रपिंड,त्वचा,डोळे,फुफ्फुसे आणि शरीरातील पेशी दान करु शकते.अगदी दुर्मिळ परिस्थिती मध्ये आतडे देखील दान केले जाते.

१३. मृत व्यक्तीतील अवयव त्याच्या मृत्यूनंतर किती काळ जीवंत राहतात?

हे पुर्णपणे त्या अवयवाच्या स्थितीवर तसेच ते त्या मृत व्यक्तीच्या शरीरातून ते अवयव किती वेळात बाहेर काढले आहेत यावर अवलबूंन असते.मात्र असे असले तरी मृत शरीरातून बाहेर काढलेले ह्दय व फुफ्फुसे ४ ते ६ तास,यकृत १२ ते २४ तास व मूत्रपिंडे ४८ ते ७२ तास जीवंत राहू शकते.

१४. जीवंत व्यक्तीचे अवयव दान करता येतात का?

जीवंत व्यक्तीचे अवयव दान करता येतात.मात्र असे दुर्मिळ परिस्थितीत घडते.जर त्या व्यक्तीच्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला त्याच्या अवयव दानामुळे जीवदान मिळणार असेल तरच असे अवयव दान करण्यात येतात.

१५. अवयव दानासाठी आपले नाव रजिस्टर झाले आहे हे कसे कळते?

जेव्हा तुम्ही तुमचे नाव अवयवदाना साठी एखाद्या संस्थेमध्ये नोंदवता.ती संस्था तुम्हाला एक ते दोन आठवड्यामध्ये तुमचे डोनरकार्ड देते.

१६. जर एखाद्या व्यक्तीने अवयव दानासाठी नाव नोंदणी केली मात्र नंतर त्याची इच्छा बदलली तर अशा परिस्थितीमध्येही अवयव दान करावेच लागतात का?

अवयवदान हे मृत्यूनंतरही कुटूंबातील व्यक्तींच्या परवानगी शिवाय करता येत नाही.त्यामुळे नाव रजिस्टर केल्यानंतर जर तुम्हाला अवयवदान करायचे नसेल  तर तुम्ही तशी कल्पना तुमच्या कुटूंबियांना देऊ शकता.

१७. जर एखाद्या व्यक्तीला अवयव दान करण्याची इच्छा असेल मात्र त्या व्यक्तीच्या कुटूंबियांना ते मान्य नसेल तर अवयव दान करता येतात का?

मृत्यूनंतरही कुटूंबियांनी परवानगी दिली तरच अवयव दान करता येतात.त्यामुळे जर कुटूंबाला मान्य नसेल तर अवयव दान करणे शक्य नसते.

१८. जर एखाद्या व्यक्तीने त्याचे नाव मुंबई शहरात रजिस्टर केले आहे मात्र त्याचा मृत्यू इतर शहरात झाला तर त्या व्यक्तीचे अवयव तिथे दान करता येतात का?

मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे मृत शरीर कुटूंबाच्या हवाली करण्यात येते.त्यामुळे त्या व्यक्तीचा ज्या शहरात मृत्यू होतो त्या शहरात त्या व्यक्तीचे अवयव दान करता येतात.

१९. मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबियांना अवयव दानासाठी पैसे मोजावे लागतात का?

अवयव दान पूर्णपणे विनाशुल्क केले जाते.त्यामुळे या प्रक्रियेसाठी त्याच्या नातेवाईकांना पैसे भरण्याची आवश्यकता नसते.

२०. त्वचेचे दान करता येते का?

त्वचादान करता येते.जे रुग्ण गंभीर त्वचारोगाने किंवा त्वचा भाजल्याने पिडीत असतात त्यांना यामुळे जीवदान मिळू शकते.

२१. आपली संस्कृती अवयव दानाबाबत काय सांगते?

सर्व संस्कृतीमध्ये अवयव दान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगितले जाते त्यामुळे अवयव दानाला आपली संस्कृतीही प्रोत्साहनच देते. हे नक्की वाचा जुही पवार– वडिलांना जीवन दान देणार्‍या कन्येची, प्रेरणादायी कहाणी (Exclusive Interview)

२२. मृत व्यक्तीची त्वचा काढल्यानंतर ते शरीर विद्रूप दिसते का?

त्वचादान करताना फक्त त्या मृत शरीराच्या वरच्या स्तरावरीलच त्वचा काढली जाते.त्यानंतर त्या भागाला पट्टया लावल्या जातात त्यामुळे तो भाग बाहेरुन दिसत नसल्याने मृतदेह विद्रूप दिसत नाही.

२३. अवयव दानानंतर ते अवयव विकले जातात का?

अवयव दान केल्यानंतर ते विकले जात नसून एखाद्या गरजूच्या शरीरात ट्रान्सप्लान्ट करण्यासाठी पाठविले जातात.त्यामुळे एखाद्या गरजूला जीवदान मिळते.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>