शूज काढल्यानंतर दुर्गंधी येण्याची समस्या केवळ काही विशिष्ट ऋतूपुरती मर्यादीत नसते. पायाला घाम आल्यानंतर दुर्गंधी येते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये शूज काढणे त्रासदायक आणि काही वेळेस तुम्हांला खजील ठरणारे ठरू शकते. हिवाळ्याच्या दिवसात थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून अनेकजण शूज वापरणे पसंत करतात. परंतू दुर्गंधीच्या त्रासामुळे टाळाटाळ करावी लागते. अशावेळी हा त्रास कमी करण्यासाठी Kairali Ayurvedic Treatment Centre, New Delhi.चे Operations Manager डॉ. राहूल डोग्रा यांनी काही घरगुती उपाय सुचवले आहे.
पायांची दुर्गंधी कमी करण्यासाठी काय कराल ?
आलं आणि पाणी वापरून पायांची दुर्गंधी कमी करता येऊ शकते. आलं चवीला आणि स्वादाला तिखट असते. त्याचे तीक्ष्ण गुणधर्म पायांमधील शुष्कता कमी करण्यास फायदेशीर ठरते. तसेच दुर्गंधी कमी करते. आल्यामधील डिटॉक्सिफाईंग घटक घामावर नियंत्रण मिळवण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे दुर्गंधीचा त्रासही कमी होतो. यामुळे dermicidin, या प्रोटीनच्या निर्मितीला चालना मिळते. यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढवणार्या फंगस आणि बॅक्टेरियाचा त्रास कमी करण्यासाठी मदत होते. जाणून घ्या लव्हेंडर ऑईलने कशी दूर कराल पायांची दुर्गंधी
पायांची दुर्गंधी कमी करणारे हे मिश्रण कसे बनवाल ?
- एका मोठ्या आल्याच्या तुकड्याची पेस्ट करा.
- कपभर पाणी उकळा आणि त्यामध्ये 10-15 मिनिटे आल्याची पेस्ट बुडवा.
- त्यानंतर पाणी गाळा. गाळलेल्या पाण्याने रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज करा.
- मसाज केल्यानंतर तुम्ही सॉक्स घालू शकता.
- थंडीच्या दिवसात रात्री पायाला मॉईश्चर मिळवण्यासाठी आवश्यक क्रीम लावा. शूजमधून येणारी दुर्गंधी कमी करणारे झटपट उपायही आजमावून पहा
पायाची त्वचा संवेदनशील व नाजूक असल्याने थंडीच्या दिवसात रुक्षता, शुष्कता वाढते. त्यामुळे पायांना नियमित तेलाने मसाज करा. यामुळे पायाला भेगा पडणे, त्वचा सुकून बाहेर पडणे अशा समस्यांही कमी होतील. हिवाळ्याच्या दिवसात किमान घरच्या घरी पेडिक्युर करावे. पायांना दुर्गंधी येऊ नये म्हणून आठवडाभर हा प्रयोग नियमित करावा. आल्याप्रमाणेच पायाची दुर्गंधी कमी करतील हे ’7′ घरगुती उपाय
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock