ब-याचदा आपण आपल्या आजुबाजुला अशी उदाहरणे पहातो की, एखादी व्यक्ती ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याची अचानक बळी पडते.अशावेळी ती व्यक्ती त्यादिवशी नित्यनेमाची कामे करते,व्यवस्थित जेवते,गप्पा मारते आणि अचानक अॅसिडिटी झाल्यासारखे वाटुन अस्वस्थ होते,आणि चक्क हॉस्पिटल मध्ये जाण्याआधीच मृत्युमुखी पडते.ही अशी उदाहरणे ऐकली की आपला खुपच गोंधळ उडतो.मग अशा वेळी नेमके ही अॅसिडिटी आहे की हा हार्टअटॅक आहे हे कसे ओळखावे ?
Senior Interventional Cardiologist, Head of Department of Preventive Cardiology and Rehabilitation at the Asian Heart Institute डॉ.निलेश गौतम यांच्या सल्ल्यानुसार, आजकाल रुग्णांमध्ये अॅसिडिटी सारखे वाटणे मात्र तो प्रत्यक्षात हार्टअटॅक असणे याचे प्रमाण खुप वाढत आहे. याचे प्रमुख कारण आहे लोकांमध्ये ह्रदयविकाराबाबत असलेले अज्ञान व नियमित हेल्थ चेक-अप साठी त्यांनी केलेली टाळाटाळ.यावर उपाय हाच की,अॅसिडिटी व हार्टअटॅक मधला फरक जाणुन घेऊन हार्टअटॅक ची लक्षणे आढळताच त्यावर ताबडतोब योग्य उपचार करणे. जाणून घ्या व्यस्त जीवनशैलीतही कसे जपाल हृद्याचेआरोग्य
अॅसिडिटी व हार्टअटॅक यांची लक्षणे वेगवेगळी आहेत मात्र आपण ती समजुन घेण्यात नेहमी गोंधळ करतो. म्हणुनच जाणुन घेऊयात या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे?
- ब्लोटिंग हे अॅसिडिटीमध्ये एक प्रामुख्याने आढळणारे लक्षण आहे.मात्र जर तुम्हाला पहाटे/ दिवसाच्या सुरवातीला ब्लोटिंगचा त्रास होत असल्यास हे हार्टअटॅकचे लक्षण असु शकते.
- सकाळी जर तुम्हाला पोटदुखी किंवा पोटात जळजळ होत असेल तर हे देखील हार्टअटॅक येण्याचे लक्षण असु शकते.
- डाव्या हातात,त्याच्या वरच्या भागात येणारी तीव्र कळा किंवा शरीराला अचानक घाम सुटणे ही हार्ट अटॅक येतानाची लक्षणे आहेत.
जर तुम्हाला हार्टअटॅक येण्याची लक्षणे जाणवू लागली तर त्यावेळी तुम्ही नेमके काय करायला हवे?
हार्टअटॅक येताना घ्यावेत हे प्रथमोपचार-
- त्वरित एन्टासाईड घ्या. जीभेखाली ५ मिग्रॅ ची सोरबीट्रेटची (Sorbitrate) गोळी ठेवा. सोबतच एस्पिरीन गोळी झटक्या दरम्यान चघळत रहा.
- त्वरीत हॉस्पिटल मध्ये जा.डॉक्टर तुमचा ईसीजी व रक्तदाब तपासतील. काही रक्त तपासण्या तसेच कार्डिएक इनझायमी देखील केली जावू शकते.
दुसरा हार्टअटॅक टाळण्यासाठी काय कराल ?
दुसरा हार्टअटॅक टाळण्यासाठी डॉ. गौतम यांनी दिलेला हा खास सल्ला
- औषधे वेळेवर घ्या.डॉक्टरांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा.आहारात तेलकट पदार्थ खाणे टाळा.
- क्वचित प्रसंगी चिकन किंवा मासे खा.पण रेड मीट खाणे कटाक्षाने टाळा.
- नियमित व्यायाम करा.
- जर आपण स्थुल असाल तर निरोगी आयुष्यासाठी वजन कमी करा.
- धुम्रपान व मद्यापानाचे व्यसन टाळा.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock