ऑक्टोबर हीटनंतर वातावरणात येणारा थंडावा तुम्हांला प्रसन्न करत असला तरीही ऋतूमानात होणारा बदल सर्दी-खोकल्याचा त्रासही वाढवतो. वातावरणातील या बदलाबरोबर प्रदूषण आणि धूळ, धूर हा त्रास अधिकच वाढवतात. मग घशातील खवखव, खोकला यावर औषध-गोळ्यांचा भडिमार करण्यापेक्षा काही घरगुती उपायही करून पहा. कफ मोकळा करून खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
- का ठरते लवंग फायदेशीर ?
लवंगामध्ये फेनोलिक कम्पाऊंड्स असतात.त्यामधील दाहशामक आणि अॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे वेदना, कफाचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे घशातील खवखव कमी होण्या सोबतच खोकल्यामुळे घसा दुखत असल्यास त्याच्या वेदना कमी होतात. लवंगामधील इसेन्शिअल ऑईल श्वसनाचा मार्ग मोकळा करण्यास मदत करते.
सुक्या खोकल्यामुळे होणारा त्रासही कमी करण्यास लवंग फायदेशीर ठरते. अॅन्टीव्हायरल आणि अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकून रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
- कसा कराल लवंगाचा वापर ?
लवंग आणि सैंधव मीठाचे मिश्रण एकत्र करून चघळावे. यामुळे घरातील खवखव कमी होते. यामुळे दाह कमी होण्यास मदत होते. नाक, अन्ननलिका आणि तोंडातील मार्ग मोकळा होण्यास मदत होते. सुका खोकला किंवा दीर्घकाळ चालणार्या खोकल्याचा त्रास कमी करण्यास मदत होते. हा उत्तम घरगुती उपाय आहे.
खोकल्याचा त्रास खूप होत असल्यास लवंग भाजून ती चघळावी. लवंगाचे तेल मधात मिसळून प्यायल्यास खोकल्याचा त्रास कमी करण्यास मदत होते. घरी लवंगाचे तेल नसल्यास मधामध्ये लवंग बुडवून चोखावी. यामधील दाहशामक घटक त्रास कमी करतात.
References:
Kumar, K., Yadav, A., Srivastava, S., Paswan, S., & sankar Dutta, A. (2012). Recent Trends in Indian Traditional Herbs Syzygium Aromaticum and its Health Benefits. Journal of Pharmacognosy and Phytochemistry, 1(1).
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock