लहान मुलांमध्ये भूक न लागण्याची समस्या अनेक वेळा दिसुन येते.अभ्यास व इतर उपक्रमातील सहभागामुळे (एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिहिटीज) मुलांना दिवसभरात वेळेवर पुरेसा आहार घेणे शक्य होत नाही.सततच्या या स्पर्धेमुळे मुले मन लावून जेवत देखील नाहीत. या सर्व गोष्टींचा परिणामांमुळे त्यांच्यात भूक कमी लागण्याची समस्या निर्माण होते. योगाभ्यास त्यांना या समस्येला तोंड देण्यास फायदेशीर ठरतो.योगामुळे मुलांमध्ये भुक लागण्याचे प्रमाण वाढू वाढते.
बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हींग चे आंतरराष्ट्रीय फॅकल्टी,योग तज्ञ गौरव वर्मा यांनी सांगितलेली ही योगासने मुलांमध्ये भुकेचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात.मात्र ही आसने तज्ञांच्या देखरेखी खालीच करुन घेणे गरजेचे आहे.
१.बद्धकोनासन किंवा फुलपाखरु मुद्रा-
भुक वाढवण्यासाठी हे आसन खुप उपयुक्त ठरते.या आसनामुळे पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठतेचा त्रास दुर होतो.
कसे कराल हे आसन-
जमिनीवर बसा.पाठीचा कणा ताठ ठेवा.पाय गुडघ्यात दुमडा व तुमच्या पायाचे तळवे एकमेंकासमोर येतील असे जोडा.
आता तुमच्या हाताने पायांच्या टाचा पकडा व जास्तीत जास्त ओटीपोटा जवळ ओढुन घ्या.
हात टाचांवर ठेवून तुमचे गुडघे फुलपाखराच्या पंखांप्रमाणे वर व खाली करा.
तुम्हाला जेवढा वेळा शक्य असेल तेवढा वेळ असे करीत रहा.
लक्षात ठेवा तुमच्या पायांच्या टाचा जितक्या जास्त ओटीपोटाजवळ येतील तितका जास्त फायदा या आसनामुळे तुम्हाला मिळु शकतो.
जेवढे शक्य आहे तेवढा वेळच हे आसन करा.शरीराला ताण देऊन हे आसन करण्याचा प्रयत्न करु नका.सरावानेच तुम्ही जास्त वेळ हे आसन करु शकाल.
२.शशांकासन किंवा ससा मुद्रा-
हे आसन चिंता,काळजी दुर करण्यासाठी उपयुक्त आहे.यामुळे पोटातील अवयवांना मसाज होतो तसेच पचनसंस्था सुधारते.
कसे कराल हे आसन-
वज्रासनात बसा.तुमचे दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.
तुमचे दोन्ही हात वर उचला.हात खांद्यातुन वर सरळ रेषेत असुद्या.तळहात पुढील दिशेस ठेवा.
आता अलगद शरीराचा वरचा भाग समोर आणत हात,तळहात व डोके जमिनीला टेकवा.
हात वर करताना श्वास घ्या व हात वरुन खाली आणताना श्वास सोडा.
डोके व हात जमिनीवर टेकलेलेच राहू देत.तुम्हाला जितके शक्य आहे तेवढा वेळ या स्थितीत रहा.
पुन्हा श्वास सोडत पुन्हा हळुहळु पुर्व स्थितीत या.
चिन्मय मुद्रा-
ही मुद्रा तुमच्या शरीरातील उर्जेचा स्त्रोत सुधारते त्यामुळे पचनसंस्था सुरळीत होऊन भूक लागण्यास मदत होते. हे नक्की वाचा
निरोगी स्वास्थ्यासाठी नियमित करा सूर्यनमस्कार !
कसे कराल हे आसन
सुखासनात बसा व डोळे बंद करा.
तुमचे हात तुमच्या मांडीवर ठेवा.तळहात वरच्या दिशेला असु द्या.
अंगठा व तर्जनी एकमेकांना जोडा व इतर तीन बोटे तळहाताकडे झुकवा.हळुवार शांत उज्जायी श्वास घ्या.दोन ते तीन मिनिटे याच स्थितीत रहा.आसन करताना श्वासावर लक्ष केंद्रीत करा.
तसेच सुर्यनमस्कार केल्याने देखील मुलांना चांगला फायदा होऊ शकतो.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock