Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’4′लक्षणांनी ओळखा तुम्हांला हार्ट अटॅक आलाय

$
0
0

हार्ट अटॅक हा कोणालाही आणि कुठेही येऊ शकतो. अनेकदा रुग्णाला हार्ट आल्याचे त्याच्या लक्षणांवरून ओळख़ताही येत नाही. मग अ‍ॅसिडीटी आणि हृद्यविकार्‍याच्या झटक्यातील नेमका फरक कसा ओळखाल हे देखील जाणून घ्या.हार्ट अटॅक आल्यानंतर अनेकदा त्याचे एखाद – दुसरे लक्षण आढळून येते. मात्र हार्ट अटॅकच्या नेमक्या लक्षणांबाबत Asian Heart Institute, Mumbai च्या Head of Department of Preventive Cardiology and Rehabilitation चे Senior Interventional Cardiologist  डॉ. निलेश गौतम यांनी हा सल्ला दिला आहे. सोबतच Heart attack आणि Cardiac arrest यामध्ये नेमका फरक काय असतो ? हे देखील जाणून घ्या.

1. घाम - ह्द्याला पुरवठा  होणार्‍या ऑक्सिजनमध्ये अडथळा आल्यास त्याचे संकेत मेंदूला पोहचवले जातात. ह्द्याचे कार्य सुरळीत ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये शरीरातून घाम वाहण्याचे प्रमाण वाढते. शरीरात काही बिघाड झाल्याचा हा एक संकेत असतो. त्यामुळे हार्ट अटॅकच्या वेळेस खूप घाम येणे, अस्वस्थ्य वाटणे अशी लक्षण आढळतात. त्यावेळेस तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.

2.हातामध्ये, छातीमध्ये वेदना होणं - छातीच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना होणं हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे. अनेक जणांमाध्ये या वेदना डाव्या हातांमध्येही पसरतात. या तीव्र वेदना इतर आजारांमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे तात्काळ डॉक्टरांची मदत घेण्याचा प्रयत्न करा. (नक्की वाचा -व्यस्त जीवनशैलीतही कसे जपाल हृद्याचे आरोग्य)

3.गरगरणे - मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याने अनेकदा हार्ट अटॅक दरम्यान चक्कर येते. हृद्याचे स्नायू अधिक कमजोर झाल्यास शुद्ध हरपते. अशावेळी रुग्णाला  anxiety attack ही येऊ शकतो.

4.पोटात वेदना होणं : अनेकदा हृद्यविकाराचा झटका की केवळ अ‍ॅसिडीटी म्हणजेच पित्ताचा त्रास आहे. असा समज अनेकांमध्ये होतो. त्यामागील एक लक्षण म्हणजे पोटदुखी. पोटदुखीसोबतच मळमळणे, उलट्या होणं असा त्रास जाणवत असल्यास हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे. सकाळच्या वेळेस ब्लोटिंगचा त्रास होत असल्यास हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. हृद्यविकाराचा धोका वाढवणार्‍या या भारतीय खाद्यसंस्कृतीतील काही त्रासदायक सवयी तुम्ही नक्की बदला.

हार्ट अटॅक दरम्यान एक किंवा त्यापेक्षा अधिक लक्षणं आढळू शकतात. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या मनाने काही औषध किंवा घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा  तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. हृद्यविकाराच्या झटक्याने रंगमंचावरूनच या कलाकारांनी घेतली अकाली ‘एक्झिट’ !!

 

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>