कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी व यासाठी निधी गोळा करण्यासाठी अनेकजण ‘नो शेव नोव्हेंबर’ या मोहिमेची सुरवात झाली. या जनजागृती मोहीमेची निर्मिती कर्करोगग्रस्त रुग्णांना आवश्यक ती मदत मिळावी या उद्देशाने झाली.महागडया सलोन मध्ये जाऊन शेवींग,वॅक्सिंग,थ्रेडींग या सारख्या ग्रुमींग ट्रिंटमेंट करण्यापेक्षा तेच पैसे कर्करोगसंशोधन या महान कार्यासाठी देणे हा या मोहीमे मागचा उदात्त हेतू आहे.
नो -शेव नोव्हेंबर ही २००९ साली रेबेका हील व ब्रेट रिंगढल यांनी ना नफा तत्वावर सुरु केलेली एक संस्था आहे.दरवर्षी फक्त नोव्हेंबर महिन्यात कर्करोग प्रतिबंध,जनजागृती,संशोधन व रुग्णांची काळजी घेण्यासाठी या मार्फत देणग्या स्विकारल्या जातात.या स्विकारलेल्या देणग्या अमेरिकेतील कॅन्सर रिसर्चकडे सुपूर्द केल्या जातात.कर्करोगातील केमोथेरोपी आणि त्रासदायक चाचण्यांमधुन कर्करोग रुग्णांना केस गमवावे लागू नयेत यासाठी हा एक उपाय आहे. हे नक्की वाचा #NoShaveNovember – ’6′ मराठमोळ्यासेलिब्रिटींचे’कडक’ beard look
‘नो शेव नोव्हेंबर’ मोहीमेत सहभागी होणा-यांसाठी केस संगोपनाचे हे काही महत्वाचे सल्ले.
केस संगोपनासाठी तुम्ही या गोष्टी जरुर लक्षात ठेवा-
पुरुष दाढी वाढवू शकतात.
चौकोनी चेहरा असल्यास तुम्ही अश्या स्टाईलची दाढी ठेवा ज्यामुळे तुमचा चेहरा चौकोनी न दिसता सडपातळ दिसेल.अश्या प्रकारच्या चेह-याच्या शेपसाठी सर्वांत उत्तम प्रकार म्हणजे ट्रीम केलेली दाढी.मात्र यासाठी दाढीच्या केसांची लांबी नियमित मेन्टेन करा.
त्रिकोणी चेहरा किंवा उंच चिकबोन्स व निमुळती हनुवटी असलेल्यांनी पुर्ण दाढी ठेवल्यास तुमचे पुरुषी व्यक्तिमत्व अधिक खुलुन दिसेल.या प्रकारात जर योग्य रितीने नियमित काळजी घेतल्यास चेहरा उठावदार दिसतो. जाणून घ्या रुबाबदार दाढी वाढवण्याचे घरगुती उपाय
केस वाढवताना केसांच्या काळजीसाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. जर तुम्ही यापुर्वी कधीच दाढी वाढवली नसेल तर कृपया स्वच्छतेकडेे दुर्लक्ष करु नका.गुंता नसलेली सुटसुटीत दाढी हवी असल्यास वेळोवेळी एका चांगल्या कंगव्याने दाढीचे केस विंचरा.शॅम्पू व कंन्डिशन केल्याने देखील दाढीच्या केसांची लांबी वाढते. दाढींचे ’5′ सेलिब्रिटी पण हटके पर्याय नक्की जाणून घ्या !
आवळ्याच्या तेलाने केस वाढण्यास मदत होते.
आवळा केसांच्या वाढीसाठी गुणकारी आहे.आवळा व तिळाच्या तेलाचे मिश्रण वापरल्यास ते देखील फायदेशीर ठरते.आवळ्याच्या तेलाचा तुमच्या चेह-यावर हलक्या हाताने मसाज करा व २० मिनीटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.हा उपाय आठवड्यातून कमीतकमी चार वेळा केल्यास चांगला परिणाम दिसुन येतो.
- लांब केसांचे संगोपन
केसांची काळजी घेण्यासाठी बाजारातील उत्तम दर्जाची सौदर्य प्रसाधने व साधने वापरा.
तुमच्या केसांच्या पोतानुसार तुमच्या हेअर स्टाईलिस्ट ने सुचवलेल्या सौदर्य प्रसाधनांचाच नियमित वापर करा.
तुमच्या केसांचा पोत सुधारण्यासाठी काय योग्य आहे हे लक्षात घेवून केसांसाठी सर्वोत्तम हेअर क्रीम कंन्डिशनर व इतर साहित्य निवडा.
लांब केसांची स्वच्छता राखणे व काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.लांब केसांमध्ये गुंतागुत होणे स्वाभाविक आहे.यासाठी खास स्मुथनिंग सिरमचा वापर करा.उन्हातुन फिरताना केसांची योग्य काळजी घ्या.सुर्याच्या अतिनिल किरणांमुळे केसांचा पोत खराब होतो व केसांचा रंग देखील फिकट होतो.
तुमच्या हेअर स्टाईलिस्टच्या सल्ल्याने केसासांठी एक चांगले सनस्क्रिन लोशन निवडा व त्याचा नियमित वापर करा.
जर तुम्ही नियमित पोहणारे असाल तर प्रत्येक वेळी क्लोरिनयुक्त पाण्यातुन पोहल्यानंतर स्वच्छतेसाठी केसांना शॅम्पु व कंन्डिशनींग करायला विसरु नका.
केस वाढवताना कशी कराल केशरचना
प्रोफेशनल्ससाठी मागे बांधलेली केशरचना उत्तम दिसु शकते.मात्र ती नीटनेटकी व लेटेस्ट असावी.घाईगडबडीच्या वातावरणात अशी हेअर स्टाईल सुटसुटीत दिसते. तुम्हाला ‘हटके’ लूक देतील या ’4′ सेलिब्रिटी हेअर स्टाईल्स !!
सेलिब्रिटी स्टाईलिस्ट विकास मारवा सांगतात,“मागे बांधलेल्या केसांचा लूक ठेवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या सिरम व जेलचा वापर करा.ज्यामुळे केसांची पकड घट्ट राहते व केसांना एक प्रकारची चमक येते.
बॅक कोंब केलेला पोनीटेल किंवा इलॅस्टिक बॅन्डने बांधलेला अंबाडाही अशावेळी चांगला दिलेल.मात्र केस खुप घट्ट बांधू नका.चांगल्या प्रतीच्या हेअर बॅन्डचा वापर करा ज्यामुळे बांधताना केस तुटणार नाहीत.