एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तिच्या तुमच्याबद्दल असणार्या भावना सोप्या असतात. समोरच्या व्यक्तीच्या स्वभावातून, तुमच्याशी बोलण्याच्या, पहायच्या रितीभातींमधून त्याला तुमच्याबद्दल काय वाटत असेल याचा अंदाज लावणे शक्य आहे. मात्र लॉग डिसन्ट रिलेशनशिप किंवा केवळ फोन, मॅसेज आणि सोशलमिडीयाच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या तरूण तरूणींनी नेमक्या एकमेकांच्या मनातील भावना कशा ओळखाव्यात याकरिता या खास टीप्स (नक्की वाचा : लाँग डिस्टंस रिलेशनशिप टिकवण्यासाठी या 5 टीप्स )
- केवळ संभाषण सुरू करण्यासाठी नव्हे तर ते खूप वेळ चालत रहावे याकरिता तो प्रयत्न करत असल्यास तो तुमच्याबरोबर अधिकाधिक वेळ राहण्यास उत्सुक आहे असे समजावे. तसेच बोलणे रटाळ होऊ नये म्हणून फोटो, गाणी पाठवून तो संभाषण अधिक रोमॅन्टीक ठेवण्याचा प्रयत्न करत असल्यास तो तुमच्यामध्ये इंटरेस्टेड असल्याचे समजावे.
- तुम्हांला मेसेज करून त्याची दिवसाची सुरवात आणि शेवट होत असल्यास तो तुमच्या प्रेमात असल्याचे समजावे. तुम्हांला मेसेज करून जेवल्याची, ब्रेकफास्ट केल्याची तशीच तुमची विचारपुस करणारा मुलगा नक्कीच तुम्हांला विशिष्ट नात्यामध्ये पाहत असेल.
- मेसेज मध्ये शब्दांसोबत भावनादेखील पोहचवण्यासाठी इमोटिकॉन्सचा सतत वापर करणे हे खास संकेत आहेत. मेसेजच्या शेवटी किस, हार्टचा वापर करणे.
- कामामध्ये व्यस्त असलातरीही तुम्हांला तात्काळ रिप्लाय मिळत असल्यास किंवा तुमच्याकडून बोलणं सुरू झाल्यानंतर त्यामध्ये इंटरेस्ट दाखवणे.
- तुमच्या मेसेजला स्पष्ट आणि मोठे रिप्लाय मिळत असल्यास तो तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे असे समजावे. क्विचित कामात खूपच व्यस्त असल्यास किंवा त्याला अधिक ‘भाव’ मिळावा असे वाटत असल्यास ‘k’ असे लहान स्वरूपात मेसेज केले जातात.
- तुम्ही स्टेट्स किंवा फोटो बदलला तर तो तुम्हांला अवश्य मेसेज करून त्याबद्दलचे मत सांगत असल्यास तसेच तुमच्या प्रत्येक अपडेटबद्दल जागृत असल्यास तो तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.
- रात्री -अपरात्री किंवा तुमच्या कामाच्या वेळा माहित असूनही तुमचा दिवस कसा चालू आहे किंवा तुम्हांला तो किती मिस करतोय हे आवर्जून सांगत असल्यास तो तुमच्यामध्ये गुंतत असल्याचे संकेत देत आहे.
पण व्हॉट्सअॅपवरील या ’10′ चूका नात्यास ठरतात मारक ! हेदेखील लक्षात ठेवा.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock