तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी आहे? मग त्यावर औषधोपचारांआधी ही हस्तमुद्रा नक्की करून पहा. यामुळे शरीरातील उर्जा वाढण्यास तसेच कामावरील लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. हस्तमुद्रा हादेखील योगा अभ्यासातील एक भाग आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी ब्रम्हमुद्रा म्हणजेच पूर्ण मुद्रा फायदेशीर ठरते. या हस्तमुद्रेमुळे मनाची अस्थिरता कमी होते. तसेच नकारात्मक विचारांपासून, घातक विचारांपासून तुम्ही दूर राहण्यास मदत होते.
कशी कराल ब्रम्हमुद्रा ?
पद्मासनामध्ये बसा.
दोन्ही हाताच्या मुठी वळून त्यावर अंगठा ठेवा.
हात मांड्यांवर वरच्या दिशेला ठेवा.
पोटाच्या मध्यभागा जवळ मनगटातून हात वळवून एकमेकांसमोर ठेवा.
यामुद्रेमध्ये असताना काही मिनिटे दीर्घ श्वास घ्या. यसेच स्वतःच्या श्वासाच्या क्रियेवर थोड्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा.
हस्तमुद्रा हा योगाभ्यासामधील असा प्रकार आहे की जो कुणीही, कधीही आणि कुठेही करता येऊ शकते. याकरिता विशिष्ट जागेची, स्थितीची गरज नसते. सकाळची वेळ शांत असल्याने तसेच दिवसाची सुरवात असल्याने यावेळी ब्रम्हमुद्रा करणे अधिक फायदेशीर आहे. सलग 40 दिवस ही मुद्रा केल्यास तुम्हांला फरक जाणवायला सुरवात होते.
खबरदारीचा उपाय:
- तुम्हांला कफ दोष असल्यास ही मुद्रा फार काळ करू नये.
- तुमच्या प्रकृतीनुसार कोणत्या मुद्रा आणि कशा कराव्यात याची किमान माहिती योगा अभ्यासकांकडून घ्यावी.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock