सौंदर्यांमध्ये ‘केस’ हे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे ‘केसगळती’ ही अनेकांच्या जीवाला घोर लावते. म्हणूनच तुमच्या केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावर योग्य उपचारपद्धतीने नियंत्रण मिळवता येते. बर्याच जणांमध्ये केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने केसगळती होते. मग अशांसाठी हीना -मोहरीच्या तेलाचे मिश्रण नक्कीच फायदेशीर ठरू शकते. केसगळती रोखण्यासाठी टाळा या ’7′ चुका !
हीना व मोहरीच्या तेलाचे मिश्रण –
केसांच्या आरोग्यासाठी ‘हीना’ अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांचा पोत सुधारतो तसेच टाळूचेदेखील पोषण होते. हीनामुळे केसांचे नुकसान टाळण्यास मदत होते. परिणामी केस चमकदार आणि दाट होतात. ( ‘हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय )
तर मोहरीचे तेल अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टीफंगल असल्याने टाळूवरील इन्फेक्शन कमी करण्यास तसेच डॅन्डरफ ( कोंडा) कमी करण्यास मदत करतात. यामुळे केसगळतीची मूळ कारणंच रोखण्यात मदत होते. परिणामी केसांचे आरोग्य सुधारते.
कसे बनवाल हे मिश्रण ?
250 ग्रॅम मोहरीचे तेल वाडग्यात गरम करा. त्यात 60 ग्रॅम हीना (मेहंदी) ची पानं मिसळून तेल पुरेसे गरम करा. पानं चॉकलेटी रंगाची होईपर्यंत मंद आचेवर तेल गरम करा. थोड्या वेळाने गॅस बंद करून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळा. आता हे तेलाचे मिश्रण हवाबंद डब्यात झाकून ठेवा.
कसे वापराल तेल ?
या तेलाच्या मिश्रणाचा नियमित टाळूवर हलका मसाज करा. यामुळे केसगळती रोखण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मसाज केल्यानंतर डोक्याला गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल गुंडाळून ठेवावा. यामुळे तेल डोक्यात झिरपण्यास मदत होते. यासोबतच केसगळती रोखणारी ‘५’ हर्बल ऑईल्स नक्की वापरून पहा.
- संबंधित दुवे
केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा
केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !
‘त्रिफळा’- केसांच्या समस्या दूर करणारा घरगुती उपाय
Translated By - Dipali Nevarekar
Source - No more hair fall! Try this henna-mustard hair oil for strong, silky hair
छायाचित्र सौजन्य – Getty Images
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.