पावसाळा सरला आणि आता हळूहळू ऑक्टोबर हीटच्या तडाख्याला सुरवात झाली आहे. या दिवसात अचानक चालणार्या उन पावसाच्या खेळात टॅन होण्याचा धोकाही वाढतो. मग विकेंडला घरच्या घरी काही फळांच्या मदतीने त्वचा (exfoliate) मोकळी करून सौंदर्य खुलवण्यासाठी कॉस्मोलॉजिस्ट नंदीता दास यांनी सुचवलेले हे काही उपाय नक्कीआजामावून पहा.
1.कलिंगड आणि काकडीचा मास्क
कलिंगडामध्ये पाण्याचा अंश अधिक असतो. त्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार राहण्यास मदत होते. काकडीमध्ये पाणी मुबलक असल्याप्रमाणेच ब्लिचिंग क्षमताही आढळते. यामुळे टॅन कमी करण्यास आणि त्वचेचा रंग़ हलका करण्यास मदत होते.
कसा बनवाल -:
- कलिंगड आणि काकडीचा पल्प एकत्र करा. तयार मिश्रण चेहर्यावर लावा.
- 10 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.
2.अॅव्हॅकॅडो आणि पपई
अॅव्हॅकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई घटक मुबलक असल्याने त्वचा आरोग्यदायी राहण्यास तसेच उजळण्यास मदत होते. पपई टॅन कमी करण्यास मदत करतात. तसेच व्हिटॅमिन ए घटक त्वचेला पोषण देतात.
कसा बनवाल मास्क :
- एका मोठ्या वाटीमध्ये चार टीस्पून अॅव्हॅकॅडोची पेस्ट आणि पपईची पेस्ट मिसळा.
- त्यामध्ये 1 टीस्पून बदामाचे तेल आणि 3-4 थेंब ylang-ylang essential oil मिसळा.
- या पॅकने चेहर्यावर आणि मानेवर मसाज करा. हा मास्क 5-10 मिनिटे ठेवा.
- त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. थोड्यावेळाने चेहरा सुती कापडाने कोरडा करा. त्यानंतर चेहर्यावर मॉईश्चरायझर लावा.
हा उपाय नियमित करा.
3. पीच आणि टोमॅटोचा मास्क -
पीचमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे त्वचेचे पोषण होते. पीचमधील मॉईश्चराईझिंग घटक आणि टोमॅटोमधील क्लिन्जिंक करण्याचे गुणधर्म त्वचेला अधिक तजेलदार बनवते.
कसा कराल हा पॅक:
- एक पीच आणि टोमॅटो यांची एकत्र पेस्ट करावी.
- यामध्ये एक चमचाभर मध मिसळा.
- तयार मिश्रण चेहर्यावर लावावे. त्यानंतर अर्धा तासाने चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा.
अशा घरगुती मास्कचा नियमित आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास त्वचा अधिक तजेलदार होण्यास मदत होते. टॅन काढण्यासोबतच सौंदर्य खुलवण्यात या मास्कचा उपयोग होतो.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock