Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्त्री शरीरात या ’6′टप्प्यांवर होतात Breast च्या आकारात बदल !

$
0
0

स्त्री शरीराला त्यांचे वक्षस्ठळ अधिक आकर्षक बनवते. अनेकजण ब्रेस्टचा आकार कमी जास्त करण्यासाठी विविध उपायांची, शस्त्रक्रियेची मदत घेतात. मात्र वयोमानानुसार शरीरात होणारे बदल ब्रेस्टच्या आकारात बदल करतात. त्याच्या स्वरूपात किंवा त्वचेमध्ये बदल झाल्यास ते काही आजारांचेही संकेत  देतात. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये हा बदल प्रामुख्याने जाणवतो. त्यामुळे सेल्फ ब्रेस्ट कॅन्सरची टेस्ट नक्की घरच्या घरी करा. पण त्याशिवाय स्त्री शरीरात वयानुसार होणार्‍या बदलांमुळे ब्रेस्टच्या आकारात होणारे बदल ओळखण्यासाठी मॅक्स हॉस्पिटल्सच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. उमा वैद्यनाथ यांनी दिलेला हा सल्ला नक्की लक्षात ठेवा. तसेच जाणून घ्या स्त्रीयांच्या स्तनाबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी

1. पौगंडावस्था

मुली  वयाच्या येण्याच्या काळात त्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. प्युबिक हेअर पासून काखेतील केस वाढण्यास मदत होते. यावेळी ब्रेस्टवर निपलजवळ लहान बम्प ( पुळीच्या आकारासारखे) येतात. यासोबतच पाळीच्या दिवसात  ब्रेस्ट अधिक जाड आणि संवेदनशील होतात. 9-11 वयात शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्सच्या निर्मिती आणि प्रवाहामध्ये बदल होतात. estrogen, progesterone आणि prolactin या सारख्या हार्मोन्समुळे ब्रेस्टची वाढ आणि आकार बनण्यात मदत होते.

2.गर्भारपणाचा काळ 

मुली वयात आल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गरोदरपणाचा काळ! गरोदरपणाच्या काळामध्येही शरीरात अनेक बदल होत असतात. पहिल्या तिमाहीच्या काळात स्त्रियांचे ब्रेस्ट अधिक जाड होतात. या काळात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांच्या पातळीमध्ये वाढ होते. ब्रेस्ट्चे आकार वाढतात. सोबतच त्याला खाज येण्याचे प्रमाणही वाढते. ब्रेस्टप्रमाणेच निपल्सही वाढतात, ते अधिक काळसर होतात.

3. ब्रेस्टफिडींग

ब्रेस्टफिडिंग करणार्‍या स्त्रियांमध्ये ब्रेस्टच्या वाढीप्रमाणेच निपल्समध्ये जाडसरपणा, क्रॅक्स वाढतात. प्रसुतीनंतर ब्रेस्ट दूधाने भरलेले असते. त्यामुळे ते अधिक जड असतात. काहींना स्त्रियांना ब्रेस्टमध्ये वेदना जाणवतात.

4. गर्भनिरोधक गोळ्या

गर्भनिरोधक गोळ्या, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स यांचा शरीरावर काहीवेळेस दुष्परिणामही दिसू शकतो. यामध्ये वॉटर रिटेंशन, वजन वाढणे, ब्लोटींग  अशा समस्या वाढतात. कारण गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये  estrogen आणि progesterone हे हार्मोन्स असल्याने ब्रेस्टच्या आकारामध्ये बदल होतात. वॉटर रिटेंशनमुळे हा त्रास अधिक जाणवतो मात्र हळूहळू ब्रेस्टचा आकार पुन्हा पूर्वस्थितीत येतो. गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

5. मासिकपाळी

ओरल कॉन्ट्रासेप्टीव्ह गोळ्या घेत नसलात तरीही तुम्हांला ब्लोटींग किंवा वॉटर रिटेंशनचा त्रास होतो. मासिकपाळीच्या दरम्यान किंवा आधीही ब्रेस्ट जाड, सुजलेले आणि काहींना वेदनादायी होतात. हे अगदीच सामान्य आहे. हार्मोन्सच्या पातळीमध्ये चढउतार झाल्याने ब्रेस्टच्या आकारात वाढ होते. तर progesterone मुळे दूधाच्या ग्रंथींमध्ये सूज वाढते.

6. वाढते वय

मोनोपॉजच्या काळात स्त्रियांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. इस्ट्रोजन पातळी कमी झाल्यानंतर ब्रेस्ट सॅगिंग होण्यास सुरवात होते.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles