Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सर्दी-खोकल्याच्या त्रासामध्ये दही का टाळावे ?

$
0
0

मी 26 वर्षीय तरुणी आहे. मला सर्दीचा त्रास आहे. माझ्या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार सर्दी- खोकल्याचा त्रास असल्यास दह्याचा वापर टाळावा. मला नियमित भातासोबत दही खाण्याची सवय आहे. मग मला खरंच दही टाळणे गरजेचे आहे का ? दह्यासोबतच इतर कोणते पदार्थ टाळावे? तसेच सर्दीचा त्रास कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

पावसाळ्याच्या दिवसात अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. ऋतूमानात बदल झाला की वाढणारा हा त्रास कमी करण्यासाठी नेमके काय करावे यासाठी प्रसिद्ध आहारतज्ञ नेहा चंदना यांनी हा सल्ला दिला आहे.

सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर दह्याचा वापर टाळावा. दह्यामुळे हा त्रास नक्कीच अधिक वाढतो. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात तसेच ते पचायला हलके असते. हे जरी आरोग्यदायी असले तरीही त्यामुळे कफ वाढतो. परिणामी सर्दी-खोकल्याचा त्रास अधिक बळावू शकतो. तुम्हांला सर्दी- पडसे होत असेल तर रात्रीच्या वेळेस, जेवणात दह्याचा वापर टाळावा. दही कफकारक समजले जाते. मात्र सर्दी-खोकला नसेल तर रात्रीच्या जेवणात  दही-भात किंवा ग्लासभर ताक यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. नक्की वाचा :घरच्या घरी मिळवा सर्दी – खोकल्यापासून आराम !

सर्दी-खोकल्याचा त्रास खूप वेळ राहतो. त्यामुळे किमान आठवडाभरासाठी किंवा त्रास कमी होईपर्यंत आहारात दही टाळावे. कफ वाढण्यास कारणीभूत ठरेल असेल प्रोसेस्ड फूड किंवा मीट (मांस) खाणे टाळावे. तसेच चीझ, ताक, छास यासारखे दह्या-दुधापासून तयार झालेले पदार्थ, गोडाचे पदार्थ टाळावेत. यामुळे त्रास अधिकवाढू शकतो. ( नक्की वाचा : खोकल्याच्या प्रकारानुसार करा योग्य औषधाची निवड ! )

सर्दी- खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी ताजी फळं, भाज्या यांचा आहारात समावेश करावा. सलाड, गरम सुप यामुळे हायड्रेटेड राहण्यासोबतच सर्दी-खोकला कमी करण्यासही मदत होते. सर्दीमुळे तुम्हांला खूपच त्रास होत असल्यास काही आयुर्वेदीक काढा प्या. यामुळे त्रास कमी होतो. काढा बनवताना त्यामध्ये मध, आलं, लिंबू, तुळस, हळद, अळशी, दालचिनी, लवंग, काळामिरी यांचा समावेश करू शकता.  घरच्या घरी बनवलेला हा काढा गरमागरम प्यावा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. परिणामी त्रास कमी होण्यास मदत होते. खोकल्याची ढास रात्री झोपेत का वाढते ? हेदेखील जाणून घ्या.

Image source: Shutterstock Images

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>