Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मेरूदंड मुद्रा करा आणि स्ट्रेस फ्री व्हा !

योगा म्हणजे केवळ एखाद्या शांत बसून स्ट्रेचिंग किंवा श्वसनाचे व्यायाम करणे इतकेच नव्हे. या पलिकडेदेखील योगाभ्यास आहे. ‘मुद्रा’ हा देखील योगासनातील एक प्रकार आहे. कोणीही, कुठेही केवळ हस्तमुद्रा करू शकतात. यामुळे शरीरातील असंतुलन कमी करण्यास मदत करतात.

मेरुदंड या हस्तमुद्रेचे अनेक फायदे आहेत. मग ती नेमकी कशी आणि कोणत्या समस्यांवर करावी याकरिता कुंडलिनी योगा एक्सपर्ट रमण शर्मा यांनी दिलेला हा खास सल्ला !

  • मेरूदंड मुद्रेचे फायदे !

ताणतणाव हा आजकाल आबालवृद्धांच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी मेरुदंड मुद्रा फायदेशीर ठरते. यामुळे ताण वाढवणार्‍या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवणे सुकर होते. मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी मेरुदंड फायदेशीर ठरते. यामुळे एकाग्रता सुधारते. तसेच दीर्घ श्वसन फुफ्फुसांना मोकळे करते, रक्त शुद्ध करण्यास मदत करते.

कशी कराल मेरुदंड मुद्रा :

  • डोळे बंद करून पद्मासनात किंवा मांडी घालून बसा.
  • पाठीचा कणा ताठ ठेवून आणि हात मांडीवर ठेवून बसा. केवळ अंगठा ताठ ठेवून बाकी चारही बोटं आत वळवून घ्या.
  • हळूहळू दीर्घश्वसन करा. या आसनामध्ये 8-10 श्वास घ्या. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.
  • त्यानंतर हात या  मुद्रेमध्ये ठेऊन सरळ करा. म्हणजे अंगठा आकाशाच्या दिशेला राहील.
  • ही मुद्रा दिवसाच्या कोणत्याही वेळी करता येऊ शकते.
  • योगासनांनंतर किंवा आधी तुम्ही या हस्तमुद्रेचा सराव करू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा -:

  • पोटभरीचे जेवण झाल्यानंतर लगेच ही मुद्रा करू नका.
  • हृद्यरोगी किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास मुद्रा करणं टाळा.

Image source: Shutterstock Images

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar



Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>