Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अश्वगंधाच्या पानांनी वजन घटवा झटपट !

$
0
0

वजन कमी करणं हे तुम्हांला आव्हान वाटत असेल तर ‘अश्वगंधा’ हे  तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.  परंतू वजन कमी करण्याची क्षमता ही फक्त अश्वगंधाच्या पानांमध्ये आहे. अश्वगंधाची मूळं ही वजन वाढवण्याचे काम करतात. ( वजन वाढवायचे 10 ‘हेल्दी उपाय ‘)

  • कसे आहे उपयुक्त ‘अश्वगंधाचे पान’ ? 
अश्वगंधाचे पान हे बहूगुणी आहे. त्यातील औषधी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारशक्ती सक्षम होते, कफ, पित्त, मधूमेहांमध्ये  वाढलेली रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास, थकवा कमी करण्यास मदत होते. तसेच अश्वगंधा पचनसंस्थेचे  कार्य सुधारण्यास मदत करते.
            पचनक्रियेला चालना मिळाल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार नियमित अश्वगंधाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे पचन सुधारते परिणामी शरीराचे मेटॅबॉलिझम वाढते  व वजन कमी होण्यास मदत होते.
  • कसे वापराल ?

अश्वगंधाची दोन मोठी पानं कुटून त्याची पेस्ट करावी. सकाळी  उठल्याउठल्या रिकाम्या पोटी ग्लासभर गरम पाण्यासोबत ही पेस्ट घ्यावी. हा प्रयोग नियमित दोन आठवडे करावा. याप्रमाणेच खायचे पानही वजन घटवण्यास मदत करते.

खबरदारीचा उपाय :

तुम्ही नियमित डाएट आणि व्यायाम केल्यास ‘अश्वगंधा’ तुम्हांला अपेक्षित निकाल देऊ शकतात. तसेच हा एक घरगुती उपाय आहे त्याला वैद्यकीय औषध समजू नका. त्यामुळे हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

संबंधित दुवे -

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Sourece  - Use ashwagandha leaves for weight loss

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>