Read This in English
बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमध्ये नकळत काही सवयी आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करतात. हृद्याच्या कार्यावर आपले आरोग्य अवलंबून असते. मग तुमच्या दैनंदिन धावपळीतून किमान या ’5′ सवयी दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होईल. एशियन हार्ट इन्स्टिस्ट्यूट मुंबई चे Senior Interventional Cardiologist and Head of the Department of Preventive Cardiology and Rehabilitation डॉ.निलेश गौतम यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.
- वर्षानुवर्ष एकाच प्रकारचे तेल वापरणे -
भारतीय पदार्थांमध्ये तेल अधिक प्रमाणात वापरले जाते. डीप फ्राय असो किंवा शॅलो फ्राय यामधून शरीराला फॅट्स मिळतात परिणामी हृद्यविकारांचा धोका वाढतो. हा धोका वाढू नये म्हणून 3-4 टीस्पूनपेक्षा अधिक तेलाचा आहारात समावेश करू नका. तसेच विशिष्ट दिवसांनी तेल बदलत रहा. प्र्त्येक तेलामध्ये विविध पोषणद्रव्य असतात. त्यामुळे दर 2-3 महिन्यांनी तेल बदलण्याची सवय ठेवा. सनफ्लॉवर ऑईल वापरत असाल तर ते राईस ब्रान करा. त्याच्या पुढच्या वेळेस नवीन तेलाचा समावेश करा. मग नक्की पहा हेल्दी तेलाचे ’7′ पर्याय !
रात्रीच्या जेवणानंतर गोड खाणं ही सवय ठरू शकते. यामुळे रक्तातील साखर अचानक वाढून मधूमेहाचा धोका बळावू शकतो.गोडाच्या पदार्थांमध्ये साखर, फॅट्स यांचे प्रमाण अधिक असल्याने हृद्यविकाराचा धोका वाढतो. चॉकलेटमध्येही अॅन्टीऑक्सिडंट मुबलक असल्याने अनेकांना ते आरोग्यदायी वाटते परंतू केवळ प्रमाणात खाणे हिताचे आहे.
- मसालेदार पदार्थ -
मिरची वजन घटवायला मदत करते हे तुम्हांला ठाऊक आहे. पण म्हणून त्याचा अतिवापर करणे टाळा. मिरची मसालेदार असली तरीही हृद्याचे कार्य, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. पण त्याचा वापर 1-2 टीस्पूनपेक्षा अधिक असू नये. तसेच दालचिनी, वेलची, काळामिरी हे मसाल्याचे पदार्थही अॅन्टीऑक्सिडंटयुक्त असल्याने प्रमाणात खाल्ल्यास हृद्याचे कार्य सुधारतात.
- ब्रेकफास्टला तेलकट पदार्थ -
डीप फ्राय केलेले मेदूवडे, समोसे किंवा तेलकट पराठे ब्रेकफास्टला खाणे टाळा. यामुळे पचनमार्गात बिघाड होतो. सकाळी उठल्यावर पोटाभर नाश्ता जरूर करावा पण प्रोटीन,कार्बोहायड्रेट युक्त असावा. तळकट, फॅटयुक्त पदार्थ टाळा.
- रोज रोज मांसाहार खाणे -
डॉ. निलेश गौतम यांच्या सल्ल्यानुसार, मांसाहार किंवा शाकाहार यापैकी एकाची निवड करायची असल्यास ‘शाकाहार’ निवडा. त्यामध्ये पोषणद्रव्य अधिक आणि घातक फॅट्स कमी असतात. रेड मीट टाळा. चिकन, फिश क्वचित प्रसंगी खाणे हितकारी आहे. यामधून शरीराला ओमेगा 3 फॅट्स मिळतात. या ’5′ त्रासदायक कारणांसाठी पावसाळ्यात मासे खाणे टाळाच !