Read This in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य : Shutterstock
भाज्या किंवा फळं बाजारात येईपर्यंत त्याचा अनेकांशी संपर्क येतो. यामुळे त्यावर काही छुप्याप्रकारे बॅक्टेरिया किंवा इतर कीटाणू वाढण्याची शक्यता दाट होते. म्हणूनच फळांचा किंवा भाज्यांचा आहारात समावेश करण्यापूर्वी ते स्वच्छ आणि काळजीपूर्वक धुणे आवश्यक आहे. अन्यथा त्यामधून विषबाधा किंवा काही आजार वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच मेदांता, मेडीसिटी- गुडगाव येथील डेप्युटी जनरल मॅनेजर – डाएटीशन डॉ. काजल पांड्या येप्थो यांनी भाज्या, फळं कशाप्रकारे धुवून घ्यावीत याबाबत हा खास सल्ला दिला आहे.
फळं आणि भाज्या नेमक्या कशाप्रकारे स्वच्छ करून वापरावे ?
- जेवण बनवण्याची सुरवात करण्यापूर्वी हात स्वच्छपणे धुणे गरजेचे आहे. यामुळे इंफेक्शन आणि बॅक्टेरियाचा धोका कमी होण्यास मदत होते.
- कटींग बोर्ड, चाकू, सुर्या, सोलाटणं, भांडी वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवावीत. तसेच वापरल्यानंतरही ती स्वच्छ करून ठेवावीत. अनेकदा कच्च्या भाज्यांवरील कीटाणू ते कापताना, सोलताना त्या स्वयंपाकघरातील साहित्यावर पसरण्याची, वाढण्याची शक्यता असते.
- तुम्ही बोर्डवर फळ किंवा भाजीची साल सोलल्यानंतर तो कचरा डब्ब्यामध्ये टाका. त्यानंतर तो पुन्हा स्वच्छ करून घ्यावा. म्हणजे त्यामधील बॅक्टेरियांचा पदार्थाशी पुन्हा संपर्क येणार नाही. परिणामी अनेक समस्या टाळण्यास मदत होईल.
- भाज्या, फळं धुताना कोणत्याही सोप/ साबण किंवा डिटरजंटचा वापर करू नका. केवळ थंड पाण्याने भाज्या / फळं स्वच्छ धुवावीत.
- जाडसर साल असणार्या फळं आणि भाज्या स्वच्छ करण्यासाठी व्हेजिटेबल ब्रशचा वापर करा.
- फळं किंवा भाज्या धुतल्यानंतर त्या सुकवण्यासाठी पेपर टॉवेलची मदत घ्या. यामुळेदेखील बॅक्टेरिया काढण्यास मदत होते.
- भाज्या/ फळं वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवा. त्यानंतर खा, कापा किंवा जेवणात वापरा.
नक्की वाचा : स्वयंपाकघरातील या ’6′ गोष्टींमुळे बिघडू शकते तुमचं आरोग्य !