Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

केसगळती कमी करायला मदत करेल हा मिल प्लॅन !

$
0
0

 

Read This in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

 छायाचित्र सौजन्य : Shutterstock

केसगळती रोखण्यासाठी केवळ आयुर्वेदीक तेल, शाम्पू आणि कंडिशनर पुरेसा नाही. तुमच्या काही सवयींमध्येदेखील बदल करणे गरजेचे आहे. त्यासोबतच आहारात काही बदल करणे गरजेचे आहे. आहारामध्ये आयर्न आणि प्रोटीन्सचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी आहारतज्ञ प्रिया काथपाल यांनी सुचवलेला शाकाहारी मील प्लॅन नक्की आजमावून पहा. झोपेत होणारे केसांचे नुकसान टाळण्यासाठी खास एक्सपर्ट टीप्स !

  • ब्रेकफास्ट :  

आरोग्यदायी केसांसाठी प्रोटीन अत्यावश्यक आहे. त्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स आणि दूधाचा समावेश करावा. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 7 आढळते. केसगळती रोखण्यासाठी ते फायदेशीर ठरते. ओट्समध्ये आयर्न आणि ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड आढळते. त्यामुळे केसांची वाढ सुधारते. दह्यासोबतही ओट्स खाऊ शकतात. त्यामधील कॅल्शियम घटक केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

  • मिडमॉर्निंग स्नॅक:  

मिड मॉर्निंग स्नॅकमध्ये किवीसारखे सायट्र्स  फळ खावे. किवीमध्ये व्हिटॅमिन सी केसांची वाढ होण्यास मदत करते.

  • लंच :

शरीरात हिमोग्लॉबिनचे प्रमाण कमी असल्यास केसगळती वाढते. त्यासाठी आयर्नयुक्त पदार्थ, डाळी, भाज्या यांचा समावेश वाढवावा. यामुळे शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी सुधारण्यास मदत होते. वाटीभर डाळीतून तुम्हांला 3.3 मिली ग्रॅम आयर्न मिळते. चपाती, पालक किंवा सलाडसोबत त्याचा आस्वाद घ्यावा. आहारात गाजर मुबलक प्रमाणात असावे. त्यामधील व्हिटॅमिन ए टाळूचे आरोग्य सुधारतात.

  • संध्याकाळचा नाश्ता :

संध्याकाळी मूठभर अक्रोड खावेत. त्यामधील व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई घटक, मॅग्नेशियम केसांना मजबूत करतात. तसेच टाळूचे आरोग्य सुधारतात. पोषणद्रव्यांच्या अभावामुळेदेखील केसगळती वाढते.

  • रात्रीचे जेवण :  

बायोटीनच्या कमतरतेमुळे केस कमजोर होतात. त्यामुळे डाळींचा, धान्यांचा आहारातील समावेश वाढवा. रात्रीच्या जेवणात ज्वारीचा उतप्पा किंवा नाचणीचा ढोकळा यांचा समावेश करा. रात्रीच्या जेवणात भाजीत पनीरचा समावेश करा.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles