Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

TheGreatIndiaRun च्या अंतिम ट्प्प्यावर मिलिंद सोमणला आईची साथ !

$
0
0

छायाचित्र सौजन्य –  The Great India Run / फेसबूक अकाऊंट

देशामध्ये धावणंं या खेळाबद्दल जागृती निर्माण व्हावी याकरिता The Great India Run च्या अंतर्गत अभिनेता, धावपटू मिलिंद सोमण अहमदाबाद ते मुंंबई  हे 570 किमी अंतर धावत आहे. अहमदाबाद येथून सुरू झालेली ही मॅरोथॉन सिल्वासामार्ग मुंबईत संपणार आहे. येत्या काही दिवसात मिलिंद मुंबईत पोहचेल. 27 जुलै रोजी अहमदाबाद येथून सुरू झालेल्या या मॅरोथॉनमध्ये आज ठाण्या जवळील मनोर येथे मिलिंदला त्याच्या 75 वर्षीय आईने साथ दिली आहे. उषा सोमण यांच्यासोबत धावतानाचा एक व्हिडियो मिलिंद सोमणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

मुंबई मॅरोथॉन असो किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीची आयर्नमॅन स्पर्धा, मिलिंद सोमण अनेकदा अनवाणी धावताना दिसला आहे. मिलिंदप्रमाणेच त्याची आई उषा सोमणदेखील  The Great India Run च्या मोहिमेत सहभागी होत सहावारी साडीत आणि अनवाणी धावताना दिसत आहेत. सकाळी लवकर उठून किमान व्यायाम करणे, योगाभ्यास करणे हेदेखील करणे त्रासदायक वाटणार्‍या तरुणांना उषा सोमण  यांचा हा धावण्याचा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी ठरेल. ( नक्की वाचा : पावसाळ्यात ‘जॉगिंग’ करताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा )

पिंकाथॉनसोबतही मिलिंद सोमण स्त्रीयांंमध्ये फीटनेस वाढवण्यासाठी मॅरोथॉन धावतो. ज्या वयोवृद्ध स्त्रियांना किंवा इतर सामान्य स्त्रियांनादेखील ट्रॅकसूट किंवा पंजाबी ड्रेसमध्ये धावणे शक्य नाही अशा स्त्रियांसाठी खास साड्यांची निर्मिती करत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लवकरच धावण्यासाठी वय, कपडे यासारखी कारणंं नक्कीच मागे पडतील आणि सारी बंंधन दूर सारून धावणं हा व्यायाम सार्‍यांना करणे शक्य होईल.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>