Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्वयंपाकघरातील या ’6′गोष्टींमुळे बिघडू शकते तुमचं आरोग्य !

$
0
0

Read This in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

 छायाचित्र सौजन्य : Shutterstock

रेस्ट्रॉरंट आणि कॅफेची निवड तेथील स्वच्छता पाहून करणे ही सवय चांगली असली तरीही अनेकदा आपल्या स्वयंपाकघरातदेखील स्वच्छतेबाबतच्या अनेक लहानसहान गोष्टी आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. चहाच्या कपापासून चॉपिंग बोर्डपर्यंत अनेक गोष्टी तुमच्या नकळत अनेक आजारांना आमंत्रण देतात.

1.मेलामाईन डिश

मेलामाईनच्या प्लेट्स अनब्रेकेबल असल्याने अनेकजण त्याची खरेदी करतात. मात्र गरम जेवण घेताना किंवा त्यामध्ये जेवण गरम करणे टाळा. मेलामाईन घटक उष्णतेमुळे अन्नामध्ये मिसळू शकतात. यामुळे किडनी स्टोन किंवा रेनल फेल्युअरचा त्रास वाढू शकतो. मात्र त्यामध्ये जेवण गरम करत नसाल तर त्यामध्ये मेलामाईन उतरण्याची शक्यताही कमी होते.

2.नॉन स्टिक तवा

तेलाचा कमीत कमी वापर करून जेवण बनवण्यासाठी अनेकजण नॉन स्टीकचा वापर करतात. मात्र त्याचा अतिवापर त्रासदायकही ठरू शकतो. सतत वापरामुळे त्यावरील कोटींग खराब होते. परिणामी केमिकलचा अन्नामध्ये समावेश होतो. नॉनस्टीक भांड्यावरील कोटींग कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. तसेच गॅस्ट्रो इंटेन्शियल त्रास वाढवतात. त्यामुळे नॉनस्टिकच्या भांड्यावर चरे पडलेले दिसल्यास ते भांडे वापरणे टाळा.

3.कपांमधील डाग

चहा-कॉफीच्या कपातील डाग काढण्याचा तुम्हांला कंटाळा येतो का ? तुमचे उत्तर हो असल्यास हा आळशीपणा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. वारंवार डागाळलेल्या कपातून चहा प्यायल्याने irregular bowel movement म्हणजेच शौचाचे काही आजार जडू शकतात. त्यामुळे घरच्या घरी कपामधील डाग काढण्यासाठी ते व्हिनेगार आणि बेकिंग सोड्याने स्वच्छ करावेत.

4.डागाळलेली भांडी

अनेकदा जुन्या भांड्यांवर तांबूस डाग पडलेले दिसतात. अ‍ॅल्युमिनियमची भांडी घासायला त्रासदायक असल्याने त्यावर हे डाग आढळतात. उरलेल्या अन्नाच्या कणांमुळे हे डाग पडतात आणि त्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. जेवल्यानंतर फार काळ भांडी खरकटी  ठेऊ नका. ताबडतोब स्वच्छ करण्याची सवय लावा.

5. कॉफी मेकर

दरवाज्याच्या हॅन्डलपेक्षाही कॉफीमेकरवर अधिक जंतू असतात. तेथे अधिक यीस्ट आढळतात. त्यामुळे कॉफीमेकर वापर जपूनच करावा. त्यापेक्षा थेट पातेल्यामध्ये कॉफी बनवण्याची सवय ठेवा.

6.चॉपिंग बोर्ड

तुम्ही चिकन आणि भाज्या एकाच विळीवर किंवा चॉपिंग बोर्डवर कापता का ? कच्च्या मांसातील जंतू झटपट पसरू शकतात. 10 मिनिटांनी ते दुप्पटीने वाढतात. त्यामुळे स्वच्छ चॉपिंग बोर्डचा वापर करावा.

References:

[1] Gossner, C. M.-E., Schlundt, J., Ben Embarek, P., Hird, S., Lo-Fo-Wong, D., Beltran, J. J. O., … Tritscher, A. (2009). The Melamine Incident: Implications for International Food and Feed Safety. Environmental Health Perspectives,117(12), 1803–1808.

[2] Domingo, J. L. (2012). Health risks of dietary exposure to perfluorinated compounds. Environment international40, 187-195.

[3] Sengupta, P. (2013). Potential Health Impacts of Hard Water. International Journal of Preventive Medicine4(8), 866–875.

[4] Christina Vilanova, Alba Iglesius, The coffee-machine bacteriome: biodiversity and colonisation of the wasted coffee tray leach, Scientific Reports 5, Article number: 17163 (2015) doi:10.1038/srep17163

[5] Cliver DO. Cutting boards in Salmonella cross-contamination. J AOAC Int. 2006  Mar-Apr;89(2):538-42. Review. PubMed PMID: 16640304.


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles