सुपरमॉडल, अॅक्टर आणि अॅथलिट मिलिंद सोमण याने वयाच्या पन्नाशीत जगातील एक कठीण ‘आयर्नमॅन’ स्पर्धा जिंकल्यानंतर आता नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. सद्ध्या मिलिंद सोमण मुंबई ते अहमदाबाद हे 570 किमी अंतर धावत आहे. ‘The Great India Run’ या मॅरोथॉनची सुरवात 27 जुलै रोजी अहमदाबाद येथून झाली आहे. दर दिवशी मिलिंद काही ठराविक ट्प्पा पूर्ण करतो. 7 ऑगस्ट रोजी मिलिंद मुंबईत पोहचून हा टप्पा पूर्ण करेल. (नक्की वाचा : सलग 12 वेळेस ‘आयर्नमॅन’ जिंकणार्या ‘कौस्तुभ राडकर’ची खास हेल्थ सिक्रेट्स ! )
पहिल्याच दिवशी 67 किमी धावून मिलिंदने या मॅरोथॉनची सुरवात केली आहे. उन्हा-पावसाची मज्जा घेत मिलिंद नियमित त्याचा अनुभव सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. अहमदाबादपासून सुरू झालेली ही मॅरोथॉन सिल्वासामार्गे मुंबईत संपणार आहे.
‘ The Great India Run सिल्वासामार्ग जाणार आहे, हे फारच छान आहे. यामुळे धावपटूंमध्ये चैतन्य निर्माण होण्यास तसेच इतक्या सुंदर ठिकाणी धावणे माझ्यासाठी सुखद अनुभव ठरणार आहे.’ असे मत मिंलिंदने व्यक्त केले आहे.
‘धावणं’ हा एक उत्तम व्यायाम आहे.मात्र त्याबाबत खेळ म्हणून फार गांभीर्याने पाहिले जात नाही. मिंलिंदच्या अशा उपक्रमामुळे धावपटूंना आणि या खेळाला तसेच वैयक्तिक आयुष्यात फीटानेसकडे अधिक सजगतेने पाहिले जाईल.
The Great India Run अंतर्गत 5किमी 21 किमी हाफ मॅरोथॉन असा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. ProSportify आणि MobieFit plan यांच्या प्रयत्नाने ‘The Great India Run’ हा वार्षिक कार्यक्रम धावपटूच्या मदतीसाठी आणि धावणं या खेळाबाबत अधिक जागृती निर्माण करण्याबाबत काम करते. यामधून मिळणारे उत्त्पन्न ‘Go Sports Foundation’ ला देणगीच्या माध्यमात देऊन भारतातील ऑलम्पियनसच्या उत्कर्षासाठी त्याचा वापर केला जाणार आहे.
Source: IANS
Image source: Facebook/ Instagram