Translated By - Dipali Nevarekar
बुटांचा वापर केल्यास त्यामधून दुर्गंधी येण्याचा त्रास अनेकांमध्ये आढळून येतो. हा केवळ उन्हाळयात किंवा पावसाळ्यात आढळणारा नव्हे तर बारमाही चालणारा त्रास आहे. त्वचेवर होणारा बॅक्टेरियांचा त्रासामुळे पायाला दुर्गंधी येण्याचे प्रमाण वाढते. घामामुळे किंवा इतर कारणांमुळे पाय ओले राहत असल्यास दुर्गंधी अधिक प्रमाणात येते. मग त्यापासून सुटका करण्यासाठी या टीप्स तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरतील. तसेच पावसाळ्यात ‘जॉगिंग’ करताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा
पायावरील घाम आणि बॅक्टेरिया यामुळे केवळ पायाला दुर्गंधी येते असे नाही. त्यासोबतच इतरही काही कारणं हा त्रास वाढवतात. बुटांमध्ये दुर्गंधी शोषून घेतली जाते. त्यामुळे त्याला मोकळे करणे फार गरजेचे आहे. म्हणूनच तुमच्या बुटांमधून दुर्गंधी कमी करण्यासाठी हे काही उपाय नक्की करून पहा.
- नेहमी तेच तेच शूज घालणे टाळा. किमान दोन शूज विकत घ्या. म्हणजे एक आड एक शूज वापरता येतील. शूजमधील घाम सुकेल आणि दुर्गंंधी कमी होण्यास मदत होईल.
- शूजमध्ये मेडिकेटेड इन्सोल वापरा. त्याच्यामुळे तुमच्या पायाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. तसेच पाय दिवसभर फ्रेश राहतील.
- घरी परतल्यानंतर शूजला दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यामध्ये कागदाचा बोळा भरू न ठेवा. तसेच शूज हवेशीर जागी ठेवा. यामुळे कागद शूजमधील मॉईश्चर शोषून घेण्यास मदत करेल. तसेच बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत होईल.
- तुमच्या शूजमध्ये रात्रभर बेकींग सोडा भुरभूरून ठेवा, बेकिंग सोड्याचा वापर अॅन्टी फंगल स्वरूपात केला जातो.
- लिंबू, संंत्र, मोसंबीच्या ताज्या साली रात्रभर शूजमध्ये ठेवा. यामुळे दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. तसेच शूजमधील दुर्गंंधी कमी होण्यास मदत होते.
- शूजमध्ये 1-2 थेंंब लव्हेंंडर ऑईलचे थेंब टाका. त्यामधील अॅन्टीबॅक्टेरियल क्षमता शूजला सुगंधित करण्यास मदत करतात.
- शूजमध्ये अॅन्टीफंगल पावडर किंवा स्प्रे मारा. या पावडरमुळे शूजमधील फंगस कमी होण्यास मदत होते.
- पावसाळ्यात तुमचे शूज खूपच भिजले असल्यास ते हेअर ड्रायरने सुकवा. त्यानंतर रात्रभर फॅनखाली ठेवा. यामुळे ते कोरडे होण्यास मदत होते.
पायाची दुर्गंधी कमी करतील हे ’7′ घरगुती उपाय मग ते नक्की आजमावून पहा.