Read This in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य : Shutterstock
विशी- पंचविशीत असून, करियरच्या उत्तम टप्प्यावर असूनही कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नसाल तर तुमच्या आजूबाजूच्या अनेकांच्या भूवया आश्चर्यकारकपणे उंचावतात. सिंगल असण्याचे काही आपलेच फायदे आहेत तसेच थोडे दुष्परिणामही आहेत. म्हणुनच त्या परिणामांच्या विळख्यात अडकून एकटे असताना या चूका करणे टाळा. तुमच्या आजूबाजूला असणारे अनेकजण यादरम्यान सल्ले देतात. सर्वसामान्यपणे दिल्या जाणार्या अशाच या ’6′ सल्ल्यांना तुम्ही सिंंगल असलात तरीही फारशा गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
1. इतका चिडचिडाट करू नकोस !
सिंगल असण्यामध्ये काहीच गैर नाही. उलट तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःची काळजी घेण्यास, स्वतःचा आनंद शोधण्यास समर्थ आहात. त्यासाठी तुम्हांला इतरांवर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही. अनेकदा स्वतःवर प्रेम करण्याच्या सवयीमुळे इतरांनी केलेल्या गोष्टी आवडत नाही परिणामी चिडचिडाट होतो. मात्र त्याचा अतिरेक न करताही नात टिकवता येतं त्यामुळे त्याबद्दल न्यूनगंड बाळगू नका.
2. पुढाकार घेऊ नका
नात्यामध्ये पहिलं पाऊल मुलांकडूनच उचलले पाहिजे असा काहीसा अलिखित नियम कित्येक वर्ष समाजात आहे. हे जुनाट विचार सोडून तुम्ही पहिल पाऊल उचलण्यामध्ये काहीच गैर नाही. मुलींनी प्रेमात प्रपोज करण्याचे हे फायदे जाणून घ्या आणि बिनधास्त त्याच्याजवळ प्रेमाची कबूली द्या.
3. ऑनलाईन डेटींग हे उथळ लोकांसाठी आहे
टिंडर सारख्या ऑनलाईन डेटींग अॅपवर असणारे प्रेमात उथळ असतात असा समज अनेकांमध्ये आहे. मात्र आजकाल टेक्नॉलॉजी, डिजिटल मिडीया, सोशल मिडिया अनेकांच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार, सोयीच्या माध्यमातून तुमचा जोडीदार शोधा.
4. बॉयफ्रेंंडला पटवण्यासाठी मेकअप किंवा वजनाबाबत सजग रहा
तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा मूळतच स्वतःसाठी वजन आटोक्यात ठेवणे , मेकअप करणे अगदीच योग्य आहे. मात्र इतरांना इम्प्रेस करण्यासाठी किंवा त्यांना काय आवडत यासाठी स्वतःमध्ये प्रमाणापेक्षा अधिक बदल करणे टाळा. स्वतःच्या इच्छा – आकांक्षा मारून सतत आनंदी राहता येत नाही. त्यामुळे तुमच्या विचारांशी मिळत्याजुळत्या लोकांशी मैत्री अधिक वाढवा.
5. तो तुमच्यापेक्षा स्मार्ट असावा.
डेट यशस्वी करण्यासाठी तुम्हांला नेहमी दुय्यमस्थान घेण्याची गरज नाही. त्यापेक्षा तुमच्या मताची कदर, किंमत आणि आदर असणारी व्यक्ती शोधण्यासाठी वेळ घ्या. प्रत्येकवेळी दोन व्यक्तींची मत जुळतील्चा असे नाही पण विरोधी मत असले तरीही त्याचा आदर करणे ही किमान अपेक्षा तुम्ही नात्यामध्ये ठेवण्यात काहीच गैर नाही.
6. तो तुम्हांला गिफ्ट्स देत नाही मग त्याच्यासोबत वेळ घालवणे व्यर्थ आहे
अनेकदा फ्री जेवण ही ट्रीट असते. पण क्वचित प्रसंगी किंंवा पहिल्या भेटीच्या वेळी त्याने बील भरणे ठीक अअहे. मात्र प्रत्येक वेळी त्यांच्याकडून ट्रीट घेणे चूकीचे आहे. कधीतरी त्यांंनादेखील फ्री ट्र्रीटचा आनंद घेऊ द्या. गिफ्ट्सपेक्षा ती व्यक्ती किती प्रमाणिक आहे हे गरजेचे आहे. विनाकारण किंवा आईवडीलांचा पैसा व्यर्थ गोष्टींवर उधळणे ही सवय भविष्यात घातक ठरू शकते.