Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
पावसाळ्यात वातावरणातील हिरवळ मनाला प्रफुल्लित करते. परंतू साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर पायाला येणारी दुर्गंधी, सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे कपड्यांच्या ओलसरपणामुळे येणारा वास दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात डोकं आणि केसांचीदेखील विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. यादिवसांत डोक्याला खाज येते, दुर्गंधी येते. या समस्येला वैद्यकीय भाषेत Smelly Hair Syndrome म्हणतात. त्यामुळे हा त्रास होणार्यांनी कोणती विशेष काळजी घ्यावी याबद्दल खास टीप्स नवी दिल्ली येथील मेडिलिक्स येथील एमडी, डरमॅटॉलॉजिस्ट आणि हेअर ट्रान्सप्लेंट सर्जन डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी दिल्या आहेत.
मग पहा पावसाळ्याच्या दिवसात केसांची दुर्गंधी कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ?
- टाळू पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्यासोबत योग्य अॅन्टीबॅक्टेरियल किंवा अॅन्टीफंगल शाम्पू वापरा. यामुळे इंफेक्शन दूर राहण्यास मदत होते. केसांमध्ये मॉईश्चर वाढवणारा शाम्पू वापरणे कटाक्षाने टाळा.
- केसांची काळजी घेण्यासोबतच आहारातही काही बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी फळं आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. ( पावसाळ्यात ‘शुष्क केस’ असणार्यांनी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे ! )
- कॅफिनयुक्त पेय टाळा. यामुळे शरीराचे तापमान वाढते. तसेच टाळूवर तेलकटपणा वाढतो. त्यामुळे खाज येण्याचे प्रमाणही वाढते.
- कामाशिवाय पावसात बाहेर पडणे टाळा. पावसात भिजल्यानंतर केस माईल्ड क्लिंजरने स्वच्छ धुवावेत. तसेच त्यांना कंडिशनर लावावे.
- ताण तणाव कमी करा. खूप ताणामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढते. परिणामी टाळूवर खाज येण्याची समस्यादेखील वाढते. ( पावसाळ्यात डोक्याला येणारी खाज कमी करण्याचे ’6′ घरगुती उपाय !)
- humidity-protective जेलचा वापर करूनदेखील केसातील अतिरिक्त मॉईश्चर कमी करण्यास मदत होऊ शकते. यामुळे केसांचा चिकटपणा कमी होईल.
केसांचे पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी ते व्यवस्थित बांधणेदेखील आवश्यक आहे. त्यासाठी पावसाळ्यातील या ’5′ झटपट पण स्टायलिश हेअरस्टाईल्स ! नक्की आजमावून पहा. पावसाळ्यातही ‘ब्युटीफूल’ राहण्यासाठी शहनाझ हुसेन यांच्या खास टीप्स !