Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
कांदेपोहे असोत किंवा वरण आपल्या आहारातील अनेक पदार्थ कोथिंबीरशिवाय अपूर्णच वाटतात. पदार्थांना चविष्ट करण्यासोबतच अनेक पोषणद्रव्य कोथिंबीरीमध्ये दडलेले असतात. पण बाजारातून आणलेली कोथिंबीर खुडून ठेवताना त्यावरील फुलं तुम्ही फेकून देता का ? जर तुम्ही ती फेकत असाल तर त्यातील अनेक आरोग्यदायी फायद्यांपासून तुम्ही दूर राहत आहात.
कोथिंबीरीमध्ये आरोग्यदायी गुणधर्मांसोबतच काही सौंदर्यवर्धक क्षमतादेखील आहे. म्हणूनच Fortis hospital च्या आहारतज्ञ नियाती लिखिते यांच्याकडून जाणून घ्या कोथिंबीरीच्या फुलांचे आरोग्यदायी फायदे
कोथिंबीरीची फुलं खाण्यासाठी सुरक्षित असतात. त्याला विशिष्ट आणि तीव्र गंध असतो. झणझणीत पदार्थांमधील तिखटाचा त्रास होऊ नये म्हणून कोथिंबीर फायदेशीर ठरते. यामुळे थंडावा निर्माण होण्यास मदत होते. कोथिंबीरीच्या फुलांमधून बियांची ( धण्यांची) निर्मिती होते. धणे हादेखील मसाल्याच्या पदार्थांमधील सर्रास आढळणारा एक पदार्थ आहे. जेवणानंतर बडीशेप सोबत धनाडाळ का खावी हे देखील नक्की वाचा.
कोथिंबीरीच्या फुलांमध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स आणि अॅन्टीऑक्सिडंट्स असतात. कोथिंबीरीच्या पानांप्रमाणेच त्यांच्या फुलांमध्येही डाएटरी फायबर्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, असतात. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन के ब्लड क्लोटींग करण्यास तसेच हृद्याचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात. कोथिंबीरीच्या फुलांमुळे पचन सुधारते. तसेच पानांसोबत फुलंदेखील खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधूमेहींच्या आहारात त्याचा वापर करणे हितकारी ठरते. मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !
जेवण तयार झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फुलं यांची सजावट करा. यामुळे तुमचा पदार्थ अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी होण्यासाठी नक्कीच फायदा होईल.